Friday, November 7, 2014

काँग्रेसला आठवले शेतकरी तर भाजपला पडला विसर


काँग्रेसला आठवले शेतकरी तर भाजपला पडला विसर-किशोर तिवारी  

दिनाक -८ नोव्हेंबर  २०१४
राजकारणात सत्ताभोगु राजकीय पक्ष शेतकऱ्यांचा प्रश्नांचा बाजार आपल्या निवडणुकीसाठी कसा करतात व नंतर त्याच बळीराजाला आत्महत्या करण्यास कसे सोडून देतात याचा चांगला अनुभव विदर्भाच्या नापिकीग्रस्त शेतकऱ्यांना होत आहे . 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या , कापसाला सहा हजार भाव, नापिकीग्र्सताना मदत ,थकित पिक कर्जमाफीची  या मागण्या  गेल्या १५ वर्षांपासून भाजपचे नेते करीत होते मात्र मागील आठवड्यात  गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असताना कधीही या  प्रश्नांवर  आवाज न उठवलेल्या काँग्रेसने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपणच शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे दावा करून  काँग्रेसला आता बळीराजाची आठवण झाली. नवे सरकार स्थापन होताच ​गेल्या पंधरवड्यात शेतकऱ्यांची स्थिती बदलल्याचा आव काँग्रेसने आणला. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्यांची कैफियत मांडली एरवी सत्तेत असताना प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना मागील १५ वर्षात राज्यात झालेल्या ४०,००० हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसल्या नाहीत त्यांच्या यवतमाळ जिल्यात  ११ हजारावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मात्र एकाही शेतकऱ्याचा दारावर गेले नाही आज जे शहाणपण व शेतकऱ्यांचे दुख त्यांनी १५ वर्षाच्या सत्तेत चाणले असते तर काँग्रेसची हि दशा झाली नसती कमीत त्यांचे पुत्र राहुल बाबांचा दारूण पराभव तर झाला नसता अशी टीका मागील २० वर्षापासून शेतकऱ्यांच्या याच प्रश्नांवर सतत लढणारे शेतकरी नेते यांनी केली आहे .  

काँग्रेसने कापूस खरेदी सुरू झाली नसल्याने शेतकरी विवंचनेत आहेत. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी कमी किंमतीत कापूस खरेदी करणे सुरू केले. या पार्श्वभूमीवर कापसाला साडेपाच हजार ते सहा हजार रुपये भाव देऊन तात्काळ खरेदी सुरू करावी तसेच, मका, धान, ज्वारी आणि डाळ खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे तसेच पावसामुळे लहरीपणामुळे सोयाबीन उत्पादकांना जबर फटका बसला. दुबार पेरणीनंतरही पीक हातात आले नाही. अनेक जिल्ह्यांतील सोयाबीन उत्पादक उद्ध्वस्त झाले. त्यांना तातडीने एकरी १० हजार रुपये मदत द्यावी तसेच, कोकणातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी हि  प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची मागणी रास्त असुन विदर्भ जनांदोलन समितीने  त्यांना आपला खुला पाठींबा दिला आहे व सरकारने तात्काळ पाऊले उचलावी अशी विनंती सुद्धा केली  आहे . 


 सत्ता आली व शेतकऱ्यांचा  भाजपला पडला विसर 




शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखा , कापसाला सहा हजार भाव दया , नापिकीग्र्सताना मदत ,थकित पिक कर्जमाफीची  या मागण्या घेऊन निवडणुकीच्या पूर्वी मोर्च्यावर मोर्चा काढणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या विषयावर बोलण्याचे टाळत आहेत . ज्या मोदींनी वर्धा येथे लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु करतांना लागवड खर्च अधिक ५० % नफा असा भाव देऊ ,सर्व कोरडवाहू दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे पिककर्ज व वीज बिल माफ करू असे आश्वासन जनतेला वारंवार दिले होते मात्र मागील चार महिन्यात पंतप्रधान मोदींना या सर्व आश्वासनाचा पार विसर पडला आहे तसेच अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ असा चक्रात शेतकरी फसला आहे , त्यामुळे राज्याच्या सर्व भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले, संकटात आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्ज माफी योजना राबवावी. निवडणुकीपूर्वी भाजपने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढला होता, आता सत्तेत आल्याने न्याय देण्यासाठी तात्काळ पावले उचलावी, याची आठवणही किशोर तिवारी  यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली.

No comments: