Wednesday, November 19, 2014

महाराष्ट्रातील कोरडवाहू दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना मागणीपत्र

विदर्भ जन आंदोलन समिती 
११,त्रिसरन नगर ,खामला ,नागपूर-४४० ०२५
संपर्क -०९४२२१०८८४६   ई -मेल -kishortiwari@gmail.com 
=============================================================================
संदर्भ -दुष्काळ -शेतकरी आत्महत्या २०१४                  महत्वाचे          दिनाक -२०नोहेंबर    २०१४
प्रती,

श्री. देवेन्द्र  फडणवीसजी 
मुख्यमंत्री , महाराष्ट्र ,
मंत्रालय ,मुंबई -४०००३२





संदर्भ -महाराष्ट्रातील विदर्भ -मराठवाड्यासह इतर कोरडवाहु भागात सुमारे ६० लाख हेक्टरमध्ये सलग पडलेला दुष्काळ व होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या . 
विषय -महाराष्ट्रातील कोरडवाहू दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने तात्काळ  देण्याकरीता मागणीपत्र 

महोदय ,
सादर नमस्कार ,
आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याने आमचे स्वप्न पुर्ण झाले कारण विदर्भाचे दुखाने जाणणारा 'जाणता राजा ' महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला मागील १५ वर्ष आपण विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर व आदिवासींच्या प्रश्नांवर सतत सोबत लढा दिला आहे व मागील लोकसभा व विधानसभेत निवडणुकीत आम्हीं शेतकऱ्याच्या व आदिवासींच्या हिताकरीता आपल्या विनातीवरून विनाशर्त पाठींबा दिला होता त्यामुळे या  आपुलकीने हे मागणीपत्र पाठवीत आहे ,आपण २९ नोहेम्बरला अमरावतीला येत आहात अशी माहिती विभागीय आयुक्तांनी मला दिली आहे व मी त्यांची स्वखर्चाने भेट घेऊन पोटतिडकीने  मागील १५  वर्षात विदर्भाच्या कृषी संकटाचा झालेला बाजार व ११ हजारावर झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या व सरकारने न केलेल्या उपाययोजनांचा व  मेलेल्या  शेतकऱ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांची यादीच दिली आहे .  
आपण शेतकरी वाचवा व या कोरडवाहु शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यास गंभीर आहात हे वाचून आनंद झाला व यासाठी अत्यंत जरुरी  मागण्या व मुद्दे देणे मला गरजेचे वाटते ,ते  खालील प्रमाणे आहेत 
-कोरडवाहु शेतकऱ्यांच्या  प्रमुख मागण्या 
१.सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी वीस हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई वा मदत देणे 
२. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सात-बारा कोरा करणे 
३. कोरडवाहु शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेमधून प्रती हेक्टरी १०० दिवसाची मजुरी सरळ अनुदान रूपाने देणे 
४. कापूस -सोयाबीन   - धानासाठी  राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या शिफारशी प्रमाणे हमीभाव देण
५-सर्व आदिवासीना तात्काळ खावटी देणे   
दुष्काळग्रस्त आदिवासी  शेतकऱ्यांच्याना व शेतमजुरांना सरसकट खावटी वाटप   करणे 
६- आरोग्य सेवा 
सर्व दुष्काळग्रस्त  शेतकऱ्यांच्याना व शेतमजुरांना २०१३ च्या यादी नुसार बी पी  एल चे  कार्ड देऊन मोफत वैद्दकिय सेवा  सर्व दवाखान्यात मोफत देणे 
७..सर्व दुष्काळग्रस्त  शेतकऱ्यांच्याना व शेतमजुरांनावृद्धाना व विधवा  मासीक अनुदान -सर्वदुष्काळग्रस्त  शेतकऱ्यांच्याना व शेतमजुरांना शेतकरी विधवा ,परितक्त्या महिलांना दरमहा कमीतकमी हजार रुपये मासीक अनुदान व सरकारी नौकर सारखे प्रत्येक महीन्याला १ तारखेला बँकेतून देण्याची योजना .

आपण या मागण्या तात्काळ पुर्ण कराव्या व शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या रोखाव्या हि नम्र विनंती . 
आपला नम्र

किशोर तिवारी 
अध्यक्ष 
विदर्भ जन आंदोलन समिती 

No comments: