विदर्भात आणखी एका शेतकऱ्याने केले आत्मदहन: ७२ तासात सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या -पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता लक्ष घालावे -किशोर तिवारी
दिनांक -५ फेब्रवारी २०१५
विदर्भातील अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील मनारखेडच्या काशीराम इंदोरे यांनी गेल्या २८ नोव्हेंबर रोजी स्वत:ची चिता रचून स्वत:च्याच हाताने ती पेटविली होती आता यवतमाळ जिल्यातील महागाव तालुक्यातील भांब येथील शेतकरी आनंदराव साहेबराव पंडागळे (वय ४५ ) यांनी स्वत:ला चीता रचून आत्मदहन केल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे एका शेतकऱ्याने स्वत:च्या हाताने स्वत:चे सरण रचून आपली जीवनयात्रा संपविल्याची हि दुसरी घटना दुष्काळग्रस्त विदर्भाने अनुभवली आहे यामुळे बळीराजाची विपन्नावस्था अधोरेखित हतो असुन मागील ७२ तासात आनंदराव पंडागळे सह अमरावतीचे तळणी येथील रामकृष्ण भलावी व गुंजी येथील अंबादास वाहिले तर वर्धा जिल्यातील घोरदचे विजयराव तडस व कान्हेरी येथील नानाजी इंगळे तर वाशीम जिल्यातील सायखेडा येथील संजयराव गावंडे यांचा या सहा शेतकऱ्यांचा समावेश असून यावर्षी ७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून शेतीमालाचे मातीमोल भाव ,अभूतपूर्व नापिकी ,कर्जाचे ओझे त्यातच सरकारची उदासीनता ह्यामुळे नैरायात वाढ झाली असुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता लक्ष घालावे अशी मागणी विदर्भ विदर्भ जनांदोलन समितीचे निमंत्रक किशोर तिवारी यांना दिली आहे .
भांब येथील आनंदराव पंडागळे यांनी खरीप हंगामात पाच एकर कोरडवाहू शेतीत कपाशीची लागवड केली होती. कापसाचे उत्पादन हाती आले की, मोठ्या मुलीचा विवाह पार पाडण्याची स्वप्ने त्यांनी बघितली होती. परंतु दुष्काळामुळे जेमतेम तीन क्विंटल उत्पादन घरी आले. केवळ १२ हजार रुपयांत मुलीचा विवाह करू शकत नसल्याची चिंता त्यांना सतावत होती. त्यांना तीन मुली असून, मोठी मुलगी स्नेहा (वय 18), मधली गायत्री (वय 15), धाकटी पूजा (वय 13) व पत्नी सुलोचना यांच्या भवितव्याच्या काळजीने ते चिंताग्रस्त झाले होते. आपल्या राहत्या घरातच त्यांनी स्वत:ला कोंडून घेतले व दाराला कडी लावून अंगावर रॉकेल ओतून आयुष्याची राखरांगोळी केली. त्यांच्या किंकाळ्या ऐकून मदतीला धावलेल्या ग्रामस्थांना बंद घरात प्रवेश करता आला नाही. त्यांच्यावर सेंट्रल बॅंकेच्या फुलसावंगी शाखेचे ५० हजार रुपयांचे कर्ज व खासगी कर्ज असल्याचे सांगण्यात येते.
यापूर्वी विदर्भातील अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील मनारखेडच्या अल्पभूधारक वृद्ध शेतकर्याने नापिकीमुळे ओढवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करणे शक्य नसल्याने गेल्या २८ नोव्हेंबर रोजी स्वत:ची चिता रचून स्वत:च्याच हाताने ती पेटविली होती. काळजाचा थरकाप उडविणार्या या घटनेची सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी स्वत:हून दखल घेतली आहे तसेच मानवाधिकार आयोगाने सरकारला विचारणा केली आहे मात्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या संपूर्ण कर्जमाफी ,लागवड खर्च अधिक ५० % नफा तसेच या शेतकर्यांना मनरेगांतर्गत किमान १०० दिवसांचे वेतन अनुदान देण्यात यावे, दुष्काळग्रस्त शेतकर्यांना अन्न ,आरोग्य व शिक्षण सुरक्षा मिळावी याकडे दुर्लक्ष करीत असुन शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोजत असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे .
महाराष्ट्र सरकारने यावर्षी एकूण ३९४५३ गावां पैकी २४८११ गावे म्हणजे आसपास ६० % गावे पूर्ण खरीप पीक नष्ट झाल्यामुळे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत यामुळे ९० लाख शेतकरी गंभीर दुष्काळाच्या प्रभावात असुन जागतीक मंदीचा मार बसल्यामुळे नापिकीनंतर कापुस ,तुर ,सोयाबीन दुध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागले आहे शेतकऱ्यांचे नुकसान लाखोत झाले तर सरकारने सर्व शेतकर्याना सरसकट ४५०० रुपये मदत देत आपण सात हजार कोटीचे पैकेज दिले असे सांगत भिरत आहेत मात्र मागील तीन महिन्यापासुन केंद्र सरकारने आपली सुमारे ५००० रुपये कोटीची मदत देणे तर सोडा यावर साधी चर्चा करण्यास तयार नसुन यातच दररोज महाराष्ट्रात आठ ते दहा शेतकरी नैरायामुळे उपासमारीला तोंड देत आत्महत्या करीत आहेत मात्र हमीभाव वाढ ,पीककर्ज माफी ,कोरडवाहू क्षेत्रात कमी पावसाचे अन्नाचे पिक घेण्यासाठी अनुदान सोबत अन्न सुरक्षा ,मुफ्त शिक्षण सुविधा,आरोग्य सुरक्षा हे तातडीचे उपाय नसुन यासाठी येत्या दहा वर्षाचा दुष्काळमुक्तीचा व खाजगी कंपनीचे महागडी वीज उपलब्ध करण्याचे थोतांड सरकार शेतकर्यांना देत आहे म्हणून अशा आणीबाणीच्या वेळी विदर्भाच्या शेतकऱ्यांनी भारताच्या अर्थमंत्री अरुण जेटली यांना हमीभाव वाढ ,पिककर्ज मुक्ती व कोरडवाहू क्षेत्रात कमी पावसाचे पिक घेण्यासाठी अनुदान अशी तीन सूत्री असलेला एकात्मिक कार्यक्रम सादर केला असुन सरकारने यासाठी आपल्या निवडणूक आश्वासन पूर्ण करण्यासाठी व विदर्भाच्या शेतकऱ्यांना दिलेले अभिवचन पुर्ण करण्यासाठी आर्थिक तरतूदिसह घोषित करावा ,असे पत्र भारताच्या अर्थमंत्री अरुण जेटली यांना विदर्भ जनांदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी पाठविले आहे .
.
No comments:
Post a Comment