सक्तीच्या कर्जाच्या वसुलीमुळे विदर्भात मागील ४८ तासात आणखी सहा शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या: शेतकरी नेते किशोर तिवारी मुख्यमंत्रि देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडल्या व्यथा
दिनाक -८ फेबुवारी २०१७
ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई येथे आपल्या सरकारचा १०० दिवसांचा लेखाजोखा मांडत होते त्याचवेळी विदर्भात मात्र सहा दुष्काळग्रस्त शेतकरी सक्तीच्या कर्जवसुलीने, नापिकीमुळे व कापसाला ,तुरीला व धानाला मातीमोल भाव मिळत असल्यामुळे यवतमाळ जिल्यातील शीरमाळ येथे ग्यानबा मोरे तर राजुर येथे प्रमोद बल्की ,चन्द्रपूर जिल्यात हळदा येथे मुरलीधर चिमूरकर तर गडचिरोली जिल्यातील कमळगावचे धर्मा आभारे ,अमरावती जिल्यातील माउली येथील सुनील गवई व वर्धा जिल्यातील उमरी येथील गोपाळ खंडाईत हे आत्महत्या करून जीवनयात्रा संपवीत होते अशा धक्कादायक घटना सामोरे आल्या आहेत . एकीकडे मुख्यमंत्री 'अलीकडेच मी डावोस येथे भरलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला जाऊन आलो. तेथे मी शेतकऱ्यांसाठी व्हॅल्यू चेन उभारण्याबाबत काही महत्त्वाच्या कंपन्यांशी चर्चा केली. यानुसार दहा लाख शेतकऱ्यांचा काही परदेशी कंपन्याबरोबर थेट करार होईल. शेतमालावर प्रक्रिया करून उत्पादने विकणाऱ्या कंपन्या १४ प्रकारची बियाणे शेतकऱ्यांना देतील व पुढल्या वर्षी २५ लाख शेतकऱ्यांशी असे करार करण्यात येणार आहेत , अशी महत्त्वपूर्ण योजना मुंबईत सह्यान्द्री येथे पत्रकारांना सांगत होते त्याचवेळी मुख्यमंत्र्यांना शेतकरी वाचवा अशी विनंती करण्याकरिता शेतकरी नेते किशोर तिवारी यांना केळापूर तालुक्यातील दहेली तांडा येथील आजारी उपासमारीला तोंड देत असलेले शेतकरी वासुदेव चव्हाण पांढरकवडा येथील स्टेट बँकने सरकारी मदत पिककर्जात कपात केल्याची तर राळेगाव तालुक्यातील माजी सरपंच सुदाम बल्की ह्यांनी महिंद्र फैनांस कंपनीने गुंड लाऊन सरकारी अधिकाऱ्यांच्या सोबत कर्जवसुली संपुर्ण यवतमाळ जिल्यात सुरु केल्याची माहिती देत होते .
विदर्भ जनांदोलन समितीने मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या गंभीर अडचणीची संपुर्ण कल्पना देऊन आपण ज्या योजना घोषित करीत आहात त्यामुळे शेतकरी नैराय कमी होत नसुन आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या संपूर्ण कर्जमाफी ,लागवड खर्च अधिक ५० % नफा असा हमीभाव तसेच या शेतकर्यांना मनरेगांतर्गत किमान १०० दिवसांचे वेतन अनुदान, दुष्काळग्रस्त शेतकर्यांना अन्न ,आरोग्य व शिक्षण सुरक्षा तात्काळ देण्याची याचना केली आहे . मुख्यमंत्र्यांनी आपण शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी निश्चत मागणीपत्र दया कारवाई करतो असे ठामपणे सांगीतले मात्र सरकार केंव्हा दिलासा देणार असा सवाल तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिला आहे.
तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या यावर्षी एकूण ३९४५३ गावां पैकी २४८११ गावे म्हणजे आसपास ६० % गावे पूर्ण खरीप पीक नष्ट झाल्यामुळे दुष्काळग्रस्त जाहीर असुन यामुळे ९० लाख शेतकरी गंभीर दुष्काळाच्या प्रभावात असुन जागतीक मंदीचा मार बसल्यामुळे नापिकीनंतर कापुस ,तुर ,सोयाबीन दुध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागले असल्याची माहिती देत सरकारने मागील तीन महिन्यापासुन केंद्र सरकारने आपली सुमारे ५००० रुपये कोटीची मदत देणे तर सोडा यावर साधी चर्चा करीत नसल्याच्या बातम्या दाखविल्या .
शेतकऱ्यांना हमीभाव वाढ ,पीककर्ज माफी ,कोरडवाहू क्षेत्रात कमी पावसाचे अन्नाचे पिक घेण्यासाठी अनुदान सोबत अन्न सुरक्षा ,मुफ्त शिक्षण सुविधा,आरोग्य सुरक्षा हे तातडीचे उपाय नसुन यासाठी सरकारने प्रामाणिक प्रयन्त करण्याची विनंती किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे .
No comments:
Post a Comment