महाराष्ट्राच्या ९० लाख शेतकर्यांना मोदी सरकारने वार्यावर सोडल्यावर आता अकाली पावसाने अख्खे रब्बीचे पिक बरबाद केले - विदर्भात ४८ तासात आणखी सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या
एकीकडे लोकसभेत महाराष्ट्राच्या भाजपच्या सरकारच्या विकासाची दिशा दर्शविणारा पहिला अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या ९० लाख दुष्काळग्रस्त शेतकर्यांना कापूस हमीभावात वाढ व पीक कर्जमाफी या मागण्यांना या सोयीस्कररीत्या केराची टोपली दाखवत होते त्याचवेळी वरुण देवाने सुद्धा पाऊस व गारपिटीचा सतत दोन दिवस कहर करून २० लाख हेक्टरमधील उभे रुब्बीचे गहू ,चना ,तूर , भाजीपाला व फळबागांचे प्रचंड नुकसान केले असून या दोन्ही धक्काने विदर्भात वर्धा ,यवतमाळ व बुलढाणा या जिल्यात प्रत्येकी दोन शेतकऱ्यांनी असे सहा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याचे वृत्त समोर आले आहे यात यवतमाळ मधील भान्सरा येथील विश्वनाथ सिगन्चुडे तर बिजोरा येथील रमेश राजने यांचा समावेश असून वर्धा जिल्यात अलीपुरचे गुणवान गिरोडे व दहेगावचे पंकज दाते तर बुलढाणा जिल्यात मोहताळा येथील मनोज ताटवे तर घुसर या गावचे गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे . यावर्षी विदर्भात १२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून अकाली पावसाच्यामुळे झालेल्या नापिकीची मार वं मोदी सरकारने दिलेला दगा शेतकऱ्यांना आत्महत्यांना आमंत्रण देणारा असल्याचा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी केला आहे.
विदर्भात होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांचे रहस्य माहीत करण्यासाठी विरोधी पक्षात असताना आपला गळा ओरडून ओरडून कोरडा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३ मार्चला यवतमाळ जिल्यात भेटीला येत असुन मला आता खरे खरे कारण सांगा असा निरोप अधिकाऱ्यांना दीला असुन मात्र निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकरी आत्महत्या ह्या शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे व शेतकर्यांच्या तोट्याच्या शेतीमुळे झालेल्या कजार्मुळे होत असून आपण यावर गुंतवणूक अधीक ५० टक्के नफा या सुत्राने कृषीमालाला आधारभूत किंमत व सर्व शेतकर्यांना नवीन कर्ज देऊ ह्या दोन्ही आश्वासनांना पूर्तता करण्यासाठी आता चुप का असा सवाल किशोर तिवारी यांनी केला आहे . भाजपला स्वामिनाथन आयोग व नरेंद्र जाधव समितीच्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केलेल्या शिफारशी पाहण्याची वेळ नाही व भ्रष्ट अधिकाऱ्यांची चर्चा करून मुख्यमंत्री काय साधणार कारण अशा शेतकरी आत्महत्या पर्यटनाचा पंतप्रधान मनमोहन सिंग ,राहुल गाधी व अनेक पुर्वीच्या मुख्यमंत्र्यांचा भेटीचा अनुभव शेतकरी आत्महत्यामध्ये वाढ होण्यामध्येच झाला असुन आता चर्चा बंद व आश्वासनपूर्ती करा असा सल्लाही तिवारी यांनी दिला आहे .
यावर्षी महाराष्ट्र सरकारने एकूण ३९ हजार ४५३ गावांपैकी २४ हजार ८११ गावे म्हणजे जवळपास ६0 टक्के गावांमध्ये पूर्णत: खरीप पीक नष्ट झाल्यामुळे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. यामुळे ९0 लाख शेतकरी गंभीर दुष्काळाच्या प्रभावात असून जागतिक मंदीचा मार बसल्यामुळे नापिकीनंतर कापूस, तुर, सोयाबीन व दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागले आहेत. अशा आणीबाणीच्या वेळी विदर्भाच्या शेतकर्यांनी भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांना हमीभाव वाढ, पिककर्ज मुक्ती व कोरडवाहू क्षेत्रात कमी पावसाचे पीक घेण्यासाठी अनुदान अशी तीन सूत्री असलेला एकात्मिक कार्यक्रम सादर करण्यासाठी किशोर तिवारी यांनी विनंती केली होती मात्र सरकारने हमीभाव वाढ व पीककर्जमाफी देणार नाही असे स्पष्ट केले आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात तरी आपण शेतकर्यांना पीककर्जमाफी द्या अशी मागणी किशोर तिवारी केली आहे
No comments:
Post a Comment