'पश्चिम विदर्भात आणखी सहा कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या'- 'बियाणे व नवीन पीककर्जाच्या ' चिंतेने होत आहेत आत्महत्या -किशोर तिवारी
दिनांक - १४ मे २०१५
महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त कर्जबाजारी व उपासमारीला तोंड देत असलेल्या तणावग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांना "स्मार्ट सिटी व मेट्रोरेलच्या" विकास दाखविण्यासाठी मुख्यमंत्री जर्मनी ,इस्राइल नंतर चीनसाठी रवाना होण्याच्या पुर्वसंध्येला पश्चिम विदर्भात आणखी सहा कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर आल्या आहेत यामध्ये चार शेतकरी आत्महत्या ज्या यवतमाळ जिल्यात प्रत्येक तालुक्यासाठी प्रधान सचिव स्तराचा मंत्रालयातील अधिकारी मुक्कामात असतांना झाल्याने जास्तात गंभीर परिस्थितीचा अनुभव आता सरकारला येत आहे कारण ज्या सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे घटना आज समोर आल्या आहेत त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाजावाजा करून रात्री शेतकऱ्याच्या घरी रात्री मुक्काम करून सकाळी जल शिवार कामाचा भूमिपूजन केलेल्या घोंडखेरी गावाचे आदिवासी शेतकरी जयराम पारधी यांचा समावेश असुन त्यासोबत राजूरचे आदिवासी शेतकरी सूर्यभान पेंदाम ,धानोराचे लक्ष्मन नेवारे तर ब्राह्मणवाडा येथील पालकमंत्री संजय राठोड यांचे जातबांधव मोहनलाल राठोड यांच्या तर अमरावती जिल्यातील तळेगावचे मुकेश गोंडसे व अजनगावसुर्जी येथील नरेंद्र नवले यांचा समावेश असुन यावर्षी २०१५ मध्ये शेतकरी आत्महत्याच्या आकडा विक्रमी ५५० च्यावर वर पोहचला असून सरकारी आकडेवारी सुधा आता अधिकृतपणे ४५० च्या शेतकऱ्यांनी विदर्भात तर पश्चिम विदर्भात महाराष्ट्रात सर्वात जास्त ३३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली देत असून या सर्व शेतकऱ्यांना वेळेवर कर्जमाफी ,सरकारी मदत ,खाण्यासाठी अन्न ,आजारात मदत ,मुलींच्या लग्नासाठी सरकारची मदतीचा हात ,खेड्यात हाताला काम ,मुलांच्या शिक्षणाचा खर्चामध्ये सरकार व बँकाकडून मदत मिळाली असतीतर टाळल्या गेल्या असत्या असा आरोप शेतकरी नेते किशोर तिवारी यांना केला आहे .
विदर्भ व मराठवाड्याच्या कृषी संकटाच्या मुळात असलेल्या प्रमुख कारण शेतीमालाचा कमी भाव व सतत नापीकी व तोट्याच्या शेतीमुळे झालेल्या कर्जाच्या डोंगरावर उपाययोजना करण्यास सरकार तयार नसुन ,कृषी मंत्री खडसे ह्या शेतकऱ्यांची नैतिक शक्ती कमी झाली आहे व सरकार शेतकरी आत्महत्या रोखण्यास हतबल अशी कबुली देतात त्याच आरोग्यमंत्री दीपक सावंत तणावग्रस्त शेतकऱ्यांच्या मानसिक सर्वे सरकार करणार असून आरोग्य सेवक दारोदारी जाऊन आपल्या घरात 'कोणी वेडेपणा करीत आहे का ?' असा सवाल करणार आहे . सरकारने खताची मागणी करणाऱ्या शहरातील सिनेमाहाल मध्ये मानवाचे मुत्र मोफत देण्याची घोषणा केली आहे आता या मंत्र्यांची व सल्ला देणाऱ्या अधिकाऱ्यांची मानसिक तपासणी करण्याची मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे कारण सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि पारिवारिक चिंता या कारणांमुळे पश्चिम विदर्भाच्या सहा जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख शेतकरी सर्वाधीक दु:खी असून, मानसिक तणावाखाली आहेत. ४ लाख ३४ हजार २९१ शेतकरी मोठ्या निराशेत गेले आहेत . शेतकर्यांना वाचविण्यासाठी सरकारने सर्व महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्तांना अंत्योदय अन्न सुविधा, आरोग्य, रोजगार सुरक्षा, पीक कर्ज माफी द्यावी अशी मागणी सतत होत आहे मात्र त्याला सुद्धा सरकार याला पाने पुसत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात करीत असलल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment