Monday, June 6, 2016

एस .बि. आय बँक सर्व थकित व नवीन पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करणार :सावरखेडा "सुलभ पीककर्ज वाटप मेळाव्यात" घोषणा

एस .बि. आय बँक सर्व थकित व नवीन पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करणार  :सावरखेडा "सुलभ पीककर्ज वाटप मेळाव्यात" घोषणा 
दिनांक ७ जुन २०१६
यवतमाळ जिल्ह्यातील नापिकीग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यास अनेक अडचणी येत  असल्याच्या तक्रारी येत आल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे सूचनेवरून वसंतराव नाईक शेतकरी मिशनने  कडून किशोर तिवारी यांनी  बँकासमोर सुलभ पीककर्ज मेळावे घेण्याची सुरवात केली असुन  राळेगाव तालुक्यातील सावरखेडा येथील  एस .बि. आय बँकेसमोर सोमवारी दिनांक ६ जूनला सरकारच्या व बँकेच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये  त्यां परिसरातील लोणी ,बंदर ,सराटी ,वरध ,सावरखेडा  व रिधोरा येथील शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी समोर व बँकाच्या नाकर्तेपणामुळे होत असलेल्या त्रासाच्या अडचणीचा डोंगरच समोर रचला त्यावेळी एस .बि. आय बँकेचे जिला समन्वयक सतीश कुमार यादव यांनी सावरखेडा येथील  एस .बि. आय बँकेने ४५ % पीककर्ज वाटप केले असुन येत्या १५ दिवसात सर्व थकित व नवीन पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याची घोषणा केली ,बँकेला हे काम सरळ व सहज करण्यासाठी महसुल ,कृषी ,ग्राम विकास विभागाकडून कर्मचारी देण्याची घोषणा उपविभागीय अधिकारी संदीप अपार ,उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत नाईक ,गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी केली तर तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांनी शेतकऱ्यांना सातबारा महसुली कागदपत्रे तात्काळ देण्याचे आश्वासन यावेळी दीले 

सावरखेडा येथील आदिवासी शेतकरी  मारोतराव आत्राम यांनी  एस .बि. आय बँकेने पीककर्जाचे पुनर्वसन करून  रुपये ७७,००० हजार मंजूर केले मात्र त्यांच्या हातात फक्त २२००० हजर दिले व ५५००० हजार पीककर्ज खात्यात जमा केले अशी गंभीर तक्रार  मिशनचे प्रमुख किशोर तिवारी यांना यावेळी दिली यावर  एस .बि. आय बँकेचे जिला समन्वयक सतीश कुमार यादव यांनी  आत्राम यांचे तीन खाती असुन सर्वच थकित असुन त्यांना ईतर खात्यावरील थकित कर्जाचे नाममात्र व्याज घेऊन उरलेली रक्कम देण्याची घोषणा यावेळी केली  व यवतमाळ जिल्यात  एस .बि. आय बँकेच्या ३० शाखेत शेतकऱ्यांना अडचणी असल्यास त्यांनी  क्षेत्रीय कार्यालय यवतमाळ येथे वा त्यांच्या मोबाईल नंबर -९४२१३९१८९३ वर आपला अडचणी एस एम एस sms  करून द्याव्या असे आवाहन यावेळी केले . 
यावेळी नापिकीग्रस्त शेतकऱ्यांना  सरकारने कर्जाचे पुनर्वसन केल्यानंतरही व मुद्रांकशुल्कही माफ केल्यानंतर    बँकाकडून त्रास होत असुन यावर सरकार फार गंभीर असुन शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची घोषणा वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे प्रमुख  किशोर तिवारी यांनी  यावेळी केली 

यावेळी बोलताना तिवारी यांनी राज्य अग्रीम बँकेने आता पुनर्वसन व पीककर्ज वाटपाची अंतिम तारीख ३१ जुलै केल्यामुळे मराठवाडा व विदर्भातील १४ जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पेरणीपुर्वी पीककर्ज मिळणे अधिकृतपणे कठीण झाले असल्याची खंत व्यक्त व्यक्त केली . मराठवाडा व विदर्भातील १४ जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची व मदतीची रक्कम थकित पीककर्जात जमा करण्यात येत असुन राष्ट्रीयकृत बँकांनी पुनर्वसन आदेशाप्रमाणे  नवीन पीककर्ज वाटप न करता संपूर्ण थकित कर्ज कागदोपत्री जमा करून नवीन  वाढीव पीककर्ज वाटप केले असुन यामुळे वाटप कागदावर १ लाख असेल तर शेतकऱ्याला गहाण  खर्च जाता हातात फक्त १० ते १५ हजार मिळत असल्याची सर्व तक्रारीवर आपण फौजदारी कारवाई करणार असल्याचे संकेत किशोर तिवारी यावेळी दिले . 

मराठवाडा व विदर्भातील १४ जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सर्च रिपोर्ट व गहाणखत न घेता फक्त शपथपत्रावर नवीन पीककर्ज देण्याची घोषणा बँकांनी आदेश नाहीत म्हणून केराच्या टोपलीत टाकली असल्याची माहिती येत असुन यावर किशोर तिवारी खेद प्रगट करीत आता शेतकऱ्यांचा आसुड्च या मस्तवाल बँकांना  सरळ करणार अशा इशारा त्यांनी यावेळी दिला . 


राष्ट्रीयकृत  बँकांच्या असह्कारावर व पीककर्ज वाटपाच्या पुनर्वसनाच्या बाबतीत होणारा झळ मागीलवर्षापेक्षा वाढला असून जर  राष्ट्रीयकृत  बँकांनी पीककर्ज वाटपासाठी ३१ जुलेची वाट पाहिलीतर ५० टक्के क्षेत्रात शेतकरी पेरणीच करू शकणार नाही व जर पेरणी केलीतर त्याला दामदुपट्टीने खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावे     लागणार आहे पुन्हा शेतकरी आत्महत्यांना निमंत्रण देण्याचा हा प्रकार असुन महाराष्ट्रातील मराठवाडा व विदर्भातील १४ जिल्ह्यात यावर्षीचा अभुतपुर्व दुष्काळ व मागील तीन वर्षापासुन होत असलेली सतत नापिकीमुळे होत असलेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांच्या दारावर जाणे ही काळाची गरज असल्याचे  मिशनचे प्रमुख किशोर तिवारी यांनी यावेळी सांगितले . 
=============================================================

No comments: