कीटकनाशक विषबाधा :मृतकांना आर्थिक मदत व शेतकऱ्यांना सुरक्षा किटचे वाटप --सर्व मृतकाच्या कुटूंबाना प्रत्येकी ५१ हजाराची मदत
दिनांक -७ ऑक्टोबर २०१७
दिनांक -७ ऑक्टोबर २०१७
पांढरकवडा येथील सुराणा भवनमध्ये आज शेतकरी मिशनच्या पुढाकाराने व केळापुर तालुका कृषी सहायक संघटना प्रगतीशील शेतकरी व समाजसेवक काशिनाथजी मिलमिले यांच्या मिलमिले कृषी सेवा केंद्र व बायर क्रॉप सायन्स ली .ठाणे यांच्यावतीने परीसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कीटकनाशक सुरक्षा किटचे वाटप करण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. पुढील टप्पात यवतमाळ जिल्हातील सर्व कीटकनाशक बाधाग्रस्त भागात प्रत्येक गावात कीटकनाशक सुरक्षा किटचे वाटप करण्याच्या करण्याची घोषणा यावेळी कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा मिशन अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली . या कार्यक्रमाला सहा .जिल्हाधिकारी श्रीमती एस भुवनेश्वरी ,सौ ए अभरणा उपवंनसरक्षक पांढरकवडा उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते ,तहसीलदार महादेवराव जोरवार ,कृषिअधिकारी सुरेश चव्हाण ,तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मडावी उपस्थित होते .
यावेळी कृषी भुषण शेतकरी रामकृष्ण वांजरीकर पाटील ,अरुणभाऊ ठाकरे ,बायर क्रॉप सायन्स ली .ठाणे यांच्यावतीने विभागीय प्रबंधक प्रदीप गोस्वामी ,प्रकाशभाऊ बोलेनवर ,डॉक्टर अनिल भोयर , डॉ सुनील पावडे अनिल गंधेवार आदीवासी नेते धर्मा आत्राम ,अंकीत यांनी विचार प्रगट केले .
सर्व मृतकाच्या कुटूंबाना प्रत्येकी ५१ हजाराची मदत
या अभिनव कार्यक्रमाचे संयोजक नचिकेत मिलमिले यांनी यवतमाळ जिल्हा कृषी केंद्र संचालक संघाचे अध्यक्ष प्रदीपभाऊ बनगीनवार यांचे सुचनेनुसार घोषणा केली की कीटकनाशक बाधेमुळे मृत झालेल्या सर्व कुटुंबाना प्रत्येकी ५१ हजार रुपयाची मदत देण्यात येणार आहे यावेळी केळापूर तालुक्यात पहापळ व टेंभी येथे मृत झालेल्या विठ्ठलराव पेरकेवार व प्रदीप सोयाम यांच्या कुटुंबाना प्रत्येकी ३१ हजार रुपयाची मदत नगदी स्वरूपात देण्यात आली यामध्ये प्रत्येकी १० हजार रुपये तालुक्यातील कृषी सहाय्यकांनी आपली दिवाळी साजरी न करता पगारातुन दिली असल्याची माहीती कृषी सहायक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी दिली तर केळापुर कृषी सेवा केंद्र संचालक संघातुर्भे प्रत्येकी नगदी २१ हजार रुपये देण्यात आले . यावेळी कीटकनाशक सुरक्षा किटचे वाटप काशिनाथ मिलमिले यांच्या सहकाराने करण्यात आले . शेतकऱ्यांमध्ये कीटकनाशक फवारणीवेळी दक्षता घेण्यासाठी विशेष मोहीम सुरु करण्यात येत असल्याची माहीती केळापुर कृषी सेवा केंद्र संचालक संघाचे राजु कांडूरवार ,सुशील कैलासवार ,किशोर देशट्टीवार ,आनंद चोपडा ,मिथुन गणशेट्टीवार यांनी दिली .यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते .
----------------------------------------------------------
----------------
------------
No comments:
Post a Comment