Monday, July 23, 2018

दीड लाखाच्यावर वरची रक्कम भरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना तात्काळ नवीन पीककर्ज द्या -किशोर तिवारी

दीड लाखाच्यावर वरची रक्कम भरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना तात्काळ नवीन पीककर्ज द्या -किशोर तिवारी 
दिनांक- २३ जुलै २०१८
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जाहीर शेतकरी कर्जमाफीसाठी दीड लाखाच्या वरची रक्कम ३० मार्च २०१८ च्या पूर्वी भरलेल्या हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी व नवीन पिककर्ज वाटप सहकार विभागाच्या व ऑनलाईन कर्जमाफीची व्यवस्था मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या  नाकर्तेपणामुळे अडली असुन ,हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची विनंती कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशन अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना केली आहे . 
एकीकडे सरकारने  कर्जमाफीसाठी दीड लाखाच्या वरची रक्कम भरण्याची शेवटची तारीख जाहीर करून व वरची रक्कम भरण्याचे आव्हान केल्यावर ज्या शेतकऱ्यांनी बाजारातून कर्ज काढून ह्या हजारो रुपयाचा भरणा केला आता त्यांना नवीन पिककर्ज देण्यास बँका नकार देत असुन वरून सरकारकडून पैसे ज्योपर्यंत येत नाही आम्ही नवीन पीककर्ज वा रक्कमही परत करीत नसल्याचे उत्तर देत आहेत आता ऑगस्ट महीना येत आहे व कर्जमाफीच्या यादीचा घोळ संपण्याच्या नाव घेत नसुन त्यातच हजारो शेतकरी जे पात्र आहेत मात्र त्यांची कर्जमाफीची रक्कम न आल्याने शेतकऱ्यांमध्ये नौकरशाहीच्या  नाकर्तेपणामुळे सरकारच्यावरील असलेला असंतोष सर्व घोळ  दूर करून कमी करावा अशी विनंती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या
आता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जाहीर शेतकरी कर्जमाफीसाठी आता कुटुंब घटक न मानता व्यक्ती हा घटक मानण्यात येणार आहे. आतापर्यंत प्रतिकुटुंब दीड लाखाच्या मर्यादेत कर्जमाफीची अट होती, मात्र आता प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरीत्या दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतलाआहे या  घोषणेचे स्वागत कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशन अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले आहे यामुळे विदर्भ मराठवाड्याचा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात दिलासा मिळणार असून आता अडलेल्या सुमारे दहा लाखावर  शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहितीही तिवारी यांनी दिली . 
यापूर्वी  कुटुंबाची थकबाकीची एकूण रक्कम दीड लाखापेक्षा जास्त असल्यास त्यांना दीड लाखावरील रक्कम आगाऊ भरल्यानंतर शासनातर्फे दीड लाख कर्जमाफीचा लाभ देण्याचा निकष होता. आता शासनाने अशा प्रकरणी कुटुंबाची अट शिथिल केली असून प्रत्येक कर्जदारास दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे यामुळे कर्जमाफीच्या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील पती/पत्नी व मुले यांना प्रत्येकी दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या अनुषंगाने एकरकमी परतफेड योजनेत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची भरावी लागणारी रक्कम कमी होणार आहे यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आव्हान किशोर तिवारी यांनी केले आहे . अनेक बँका शेतकऱ्यांना नवीन पिक कर्ज देण्यास नकार देत आहे अशा बँकांवर सरकारने कारवाई सुरु केली आहे तरी  शेतकऱ्यांचा   छळ करणाऱ्या बँक व सरकारी अधिकाऱ्यांची माहीती आपल्या मोबाईल नो. ९४२२१०८८४६ वर देण्याचे नम्र आव्हानही तिवारी यांनी केले आहे . 

===========================================================

No comments: