सरकारच्या सर्व सोयी सवलतींचा व कल्याणकारी योजनांचा लाभ आता अल्प भूधारक शेतकऱ्यांप्रमाणेच मध्यम व मोठ्या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार असून पाच एकर पर्यंत मर्यादे ची वर्षानुवर्षे चालू असलेली जाचक अट केंद्र सरकारने आता काढून टाकली : विदर्भ व मराठवाड्यातील १४ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार ....!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केले स्वागत .
दीं. १२ एप्रिल , २०१९
सरकारच्या सर्व सोयी सवलतींचा व कल्याणकारी योजनांचा लाभ आता अल्प भूधारक शेतकऱ्यांप्रमाणेच मध्यम व मोठ्या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार असून पाच एकर पर्यंत मर्यादे ची वर्षानुवर्षे चालू असलेली जाचक अट केंद्र सरकारने आता काढून टाकन्याचा निर्णय घेतला असून सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ कोणतीही शेती धारण कमाल मर्यादेची अट न ठेवता सरसकट लागू करण्यात येणार आहे . विदर्भ व मराठवाड्यातील १४ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी आज अहमदनगर येथील जाहीर सभेत ही घोषणा केली असूून भारताच्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून अल्पभूधारक शेतीची ५ एकर पर्यंत मर्यादेची अट समाप्त करण्याचा क्रांतिकारी निर्णय केंद्रातील सरकारने घेतला असून येत्या जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या शेतकी वर्षापासून आता सरकारच्या सर्व सोयी सवलतींचा योजनेचा लाभ अल्प भूधारक शेतकऱ्यांप्रमाणेच मध्यम व मोठ्या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार आहे . पाच एकर मर्यादे ची वर्षानुवर्षे चालू असलेली जाचक व भेदभाव पूर्ण मर्याद अट सरकारनेेेे आता काढून टाकन्याचा निर्णय घेतला असून सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ कोणतीही शेती धारण मर्यादेची अट न ठेवता सरसकट लागू करण्यात येणार आहे, या घोषणेचे स्वागत ह्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करणारे शेतकरी नेेेेते व शेतकरी मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले आहे .
शेतीच्या धारणेची अट रद्द करण्यात यावी किंबहुना ती काढून टाकण्यात यावी, ही मागणी महाराष्ट्र सरकारच्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन सातत्याने गेल्या तीन वर्षापासून रेटून धरली आहे. त्याचा परिणाम म्हणून नरेंद्र मोदी यांनी सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी आता अल्प भूधारक धारणे ची पाच एकर पर्यंत ची अट काढून टाकून सर्व शेतकऱ्यांना सरसकट लाभ प्राप्त व्हावा यासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण व ग्रामीण व्यवस्थेतील दुही संपविणारे पाऊल घेतले असल्याचे मत श्री किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे. अहमदनगर येथील जाहीर सभेत नरेंद्र मोदी यांनी आज ही घोषणा करून भाजपा सरकार द्वारे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती या सभेत उपस्थित हजारो शेतकऱ्यांना देताच सर्वांनी या घोषणेचे टाळ्या वाजवून स्वागत केले. स्वतंत्र भारताच्या इतिहासात भारत सरकारच्या व राज्य सरकारच्या सोयीसवलती मिळण्यासाठी जी ५ एकर पर्यंत जमीन धारणा मर्यादेची जी जाचक अट होती, ती काढून टाकण्याचा केंद्र सरकारचा आज घोषित करण्यात आलेला निर्णय हा अत्यंत दूरगामी व महत्वपूर्ण भूमिका अदा करणारा व सर्व शेतकऱ्यांना सरसकट योजनांचा लाभ उपलब्ध करून देणार पाऊल आहे. यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा समसमान फायदा मिळू शकेल अशी आशा तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
*********
किशोर तिवारी
अध्यक्ष- विदर्भ जनआंदोलन समिती
९४२२१०८८४६
Email : kishortiwari@gmail.com
No comments:
Post a Comment