लोकसभेचे मतदान झालेल्या दुष्काळग्रस्त भागात आचारसंहितेला शिथिल करा-किशोर तिवारी
दिनांक - २० एप्रिल २०१९
लोकसभेच्या मतदानाच्या पहील्या व दुसऱ्या टप्यात अती दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यात निवडणूक आटोपली असुन ग्रामीण शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील आदर्श आचारसंहितेला तात्काळ शिथिल करावी त्यामुळे दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी व शेत मजुरांना अन्न सुरक्षा ,आरोग्य सुरक्षा ,रोजगार ,पाणी ,चारा व नवीन पिककर्ज इत्यादी मदत व पुनर्वसनाच्या कामावर बंधने टाकणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आढावा घेता येईल कारण अनेक मस्तवाल सनदी अधिकारी व भ्रष्ट कर्मचारी निवडणूक आटोपल्यानंतरही मदत व पुनर्वसनाच्या कामाना आदर्श आचारसंहितेची कामे निवडणूक आयोग नावावर रोखत असल्याने कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज मुख्य निवडणूक आयुक्तांशी केली आहे .
आदर्श आचारसंहितेची अंबलबजावणी १० मार्च पासुन दुष्काळग्रस्त विदर्भ मराठवाड्यात दररोज ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असुन हा आकडा २९२ वर गेला आहे कारण अन्न सुरक्षा ,आरोग्य सुरक्षा ,रोजगार ,पाणी ,चारा व नवीन पिककर्ज यांचे प्रश्न निवडणुकीचे काम समोर करून मस्तवाल सनदी अधिकारी व भ्रष्ट कर्मचारी टाळत आहेत त्यामुळे धोरणात्मक निर्णय वळगता दत व पुनर्वसनाच्या कामाना गती देण्या करीता लोकसभेच्या मतदानाच्या पहील्या व दुसऱ्या टप्यात अती दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यात निवडणूक झालेल्या भागात आदर्श आचारसंहितेला शिथिल करण्याची गरज आहें असे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे .
आदर्श आचारसंहितेची अंबलबजावणी १० मार्च पासुन सुरु झाल्यांनतर अनेक दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकरी व शेत मजुरांचे पाणी व चारा तसेच मजुरीसाठी हाल होत असल्याच्या तक्रारी आल्यावर मदत व पुनर्वसनाच्या कामाना आदर्श आचारसंहितेचा नावावर का रोखत आहात अशी विचारणा केल्यावर मस्तवाल कामचोर अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाचे कारण समोर केल्यामुळे किशोर तिवारी यांनी हा वाद आपण निवडणूक आयोगापुढे नेला होता व निणर्य झालेले सर्व मदत व पुनर्वसनाच्या कामाना आचारसंहितेचा नावावर अधिकाऱ्यांनी रोखल्याचे निदर्यांत आणले मात्र निवडणूक आयोगाने लक्ष न दिल्याचे किशोर तिवारी यांनी स्पष्ट केले .
चारा व पाणी नसल्यामुळें विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकरी व शेत मजुरांना जनावरे मातीमोल किमतीत विकावी लागत असुन अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचा नावावर डोळे झाक करीत असल्याच्या प्रचंड तक्रारीं येत आहेत मात्र सारे राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये गुंतले असुन दुष्काळग्रस्त शेतकरी व शेत मजुरांना वाऱ्यावर सोडले आहे त्यातच रोजगार हमी योजनेची कामेच उपलब्ध नसल्यामुळे प्रचंड उपासमार होत असल्याची खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली .
=================================================
No comments:
Post a Comment