Thursday, February 6, 2020

भाजपच्या सरकारने नियुक्त केलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी हकालपट्टीपुर्वी आपल्या पदाचा राजीनामा द्यवा- किशोर तिवारी

भाजपच्या सरकारने नियुक्त केलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी हकालपट्टीपुर्वी  आपल्या पदाचा राजीनामा द्यवा- किशोर तिवारी 
दिनांक - ६ फेबु २०२०
महाराष्ट्रात सरकार  बदल्यानंतर चक्क २ महीने लोटल्यावरही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त केलेले शेकडो भाजपचे लाचार कार्यकर्ते आपले पद ,सरकारी मुंबईचा बंगला ,सरकारी कार ,सरकारचा नौकरवर्ग ,पगार भत्ते सोडत नसुन आपल्या हकालपट्टीची वाट पहात आहेत यावर शेतकरी नेते व शिवसेनेचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांनी खेद  प्रगट करीत हे कसले तुम्हचे तत्व ,आदर्श असा सवाल उपस्थित करीत सध्या शिवसेना ,काँग्रेस ,राष्ट्रवादी कांग्रेसचें सरकार आहे व सरकारचे धोरणे राबविण्याकरीता व सरकारच्या सोबत असलेल्या प्रत्येक पाईकाला जाबाबदारी देण्याकरीता मागील सरकारने नियूक्त केलेल्या राजकीय अराजकीय घटनात्मक पदावरच्या व्यक्ती सरकार पडल्यावर दुसऱ्याच दिवशी न विचारता नैयतिकतेच्या आधारे आपला राजीनामा देण्याची प्रथा आहे मात्र यावेळी भाजपच्या सत्तालोलूप्त नेत्यांनी आपली पदे कालमर्यादा घटनात्मक मुद्दा अराजकीय पद असा वाद करीत सोडल्यानाही ही बेशरमेची बाब आहे तरी लोक लाजास्तव या नेत्यांनी आपली पदे सोडावी असा आग्रह किशोर तिवारी यांनी धरला आहे .  आपली नियुक्ती शेतकरी मिशनवर मागील सरकारने अराजकीय पद म्हणुन केली होती मात्र  आपण मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यावर त्यांना आपला राजीनामा सादर केला मात्र उद्धवजी ठाकरे यांनी आपण माझ्या पुढच्या आदेशापर्यंत करा असा आदेश देत नाकारला मात्र असा राजीनामा घेऊन कोणीच जात नाही हे दुर्भाग्य आहे असा टोमणा किशोर तिवारी लगावला . 
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारमध्ये अतिशय वादग्रस्त व्यक्तींना भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी विरोध केल्यावरही नियुकत्या केल्या होता त्यांनी सरकार गेल्यावरही आपला भ्र्रष्टाचार कायम ठेवला अनेक भाजप व वर्षाबंगल्यावर धार्जिणे झालेले नेते  मी मातोश्रीच्या जवळ असल्यामुळे आपलं पद भत्ते बंगला राज्यमंत्री दर्जा महाराष्ट्राच्या हिताकरिता कायम ठेवण्यासाठी लॉबिंग करीत आहेत अशा बेशरम नेत्यांना भाजपने पद सोडण्यास सांगावे असा आग्रह किशोर तिवारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे . 
======================================


















No comments: