Saturday, February 8, 2020

यवतमाळ विधानपरीषद निवडणुक २०२०:भ्रष्ट आचारसंहितेने राजकीय व्यवस्था नासविली -किशोर तिवारी

यवतमाळ विधानपरीषद निवडणुक २०२०:भ्रष्ट आचारसंहितेने राजकीय व्यवस्था नासविली -किशोर तिवारी 

मागील २५ वर्षापासुन स्थानीय स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेमध्ये लाखो रुपये दक्षिणा वाटप करून उमेदवारी विकत घेण्याची परंपरा यावर्षी सालाबादप्रमाणे कायम ठेवण्यात पोटभरू नेत्यांनी आपल्या प्रयन्ताची पराकाष्टा करीत कायम ठेवली मात्र यावेळी मत विकत घेण्यासाठी ५ लाख की ६  लाख रुपये तसेच आजी माजी मंत्री ,आमदार यांना सुद्धा आप आपल्या परीने शिधा देण्याची ,कार्यकर्त्यांना हुजरी करण्यासाठी वेगळा प्रसाद ,मतदारांची विमानवारी ,रिसॉर्ट मधली मौज मजा राष्ट्रीय व विभागीय माध्यमांनी दिलेली अभुतपुर्व प्रसिद्धी व त्यानंतर त्यावर लिहलेले विषेय लेख यामुळे या देशात लोकशाही या स्तरावर अशा प्रकारे  राजकीय नेते नासवतील असा विचार घटनाकार भारतरन्त बाबासाहेब आंबेडकरांनाही केला नसेल .निवडणुकीमध्ये कोट्यावधी रुपयाचा पाऊस पडायचा व ते १०० पट्टीने परत काढण्यासाठी सरकार मध्ये सर्वप्रकारची ठेकेदारी व दलाली करावयाची हा प्रकार पाहणाऱ्या युवा वर्गाला क्रांतीच्या मार्गाने नेणारा असुन राष्ट्रनिर्माण चारित्र्य नीतिमत्ता यावर सतत चर्चा करणाऱ्या पक्षांनी त्यांच्याच नेत्यांमार्फत हा प्रकाराला बढावा देणे व खुले समर्थन करणे ,पैशाचा व्यवहार करण्यासाठी आपल्या संस्थाचा वापर करणे हा प्रकार घृणास्पद असल्याचे मत किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे .
मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये एक माजी विधान परिषद आमदारी विकत घेतलेल्या ठेकेदार व स्वघोषित राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्याने युती असतांना काँग्रेस उमेदवाराच्या  आपण मी उभा असतांना घेतलेले पैसे परत करीत नसल्यामुळें नाराजीमुळे विरोधात केले  आता त्याच उमेदवाराने त्याच पद्धतीने भाजपच्या मतदान नसणाऱ्या नेत्यांना प्रसाद वाटला तर लोकसभा व विधानसभेत असे हरामाचे पैशे त्रासदायक होतात असा अनुभव असतांना महाविकास आघाडीमध्ये विकास करून घेतल्याची खुली चर्चा माध्यमांनी यावेळी केली यामुळे हे नेते समाजासमोर कोणता आदर्श निर्माण करीत आहेत असा सवाल किशोर तिवारी यांनी केला आहे . 
पांढरकवड्यामध्ये  नवीनच प्रकार घडला ज्या सत्तारूढ पक्षाच्या सर्व सदस्यांनी गावाच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आर्णी या ठिकाणी विधान सभेच्या निवडणुकीमध्ये प्रवेश घेतला होता यावेळी महाविकास आघाडीची कास पकडली हा गावाच्या विकासासाठी केलेला तत्वाचा त्याग या वर्षीच्या स्थानीय स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेच्या निवडणुकीची ऐतिहासिक घटना असल्याचे मत किशोर तिवारी व्यक्त करीत भाजपच्या तत्कालीन खासदार व मंत्र्यांनी जरूर विचार करावा असा सल्ला दिला आहे . 
गरीबांना अन्न वस्त्र निवारा पिण्याचे शुद्ध पाणी ,परवडेल अशी आरोग्य सेवा ,मोफत सरकारी दर्जेदार शिक्षण सेवा ,रस्ते ,रोजगार ,जगाच्या इतर देशाप्रमाणे जगण्याचा अधिकार ,शेतकऱ्यांना सुगीचे दिवस ,दलित आणी आदिवासींच्या घरात प्रकाश यासगळ्या गोष्टी असे ३५ कोटी रुपये वाटप करून आमदारकी विकत घेणारे व या विजयामध्ये किंगमेकर होणारे कसा करणार या सर्व ठेकेदारांचा बंदोबस्त करण्याची वेळ आली असल्याचे मत किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केले . सध्या जेमतेम सात राज्यात विधान परीषद अस्तित्वात आहे सध्या या वरच्या सभागृहात येण्यासाठी जो प्रकार सुरु आहे त्याला पाहता  घटनेच्या ३०८ कलमाखाली आर्टिकल १६९(१) अन्वये जर जनतेच्या प्रतिनिधींना दुसरे सभागृह म्हणजे विधान परिषद हवे असेल किंवा नको असेल, तर तसा २/३ मतांनी ठराव पास करून बरखास्त करावे अशी मागणी शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे कृषी सल्लागार शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केली आहे . सध्या यवतमाळमध्ये विधान परिषदेचा निवडणुकीमध्ये जो खुला घोडेबाजार झाला  आहे त्यामुळे व्यथित होऊन आपण हि मागणी रेटत असल्याचा व हे आपले व्यक्तिगत मत असल्याचं  खुलासा किशोर तिवारी यांनी केला आहे . 

===============================

No comments: