Monday, May 31, 2021

घुईखेड ग्रामस्थांना स्व कमलाबाई टावरी बहुउद्धेशीय शिक्षण संस्थेतर्फे अन्न व किराणा किट सानुग्रह मदतीचे वाटप
दिनांक ३१ मे २०२१


कोरोना संकट सगळी कडे पसरले असुन शहरी तसेच ग्रामीण भागात सुध्दा या संक्रमण संकटाने धुमाकुळ घातला आहे.

स्व. कमलाबाई ब टावरी बहुउद्देशिय शिक्षण संस्था,नागपुर यांच्या स्व कमलाबाई ब. टावरी इंग्लिश स्कूल, घुईखेड यांचे मार्फत ग्रामस्थां करीता आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, मोफत शिवणकला प्रशिक्षण केंद्र, मोफत संगणक प्रशिक्षण, रोजगार मेळावा त्याच प्रमाणे शासनाचा उपक्रम सरकार आपल्या दारी, अशा विविध उपक्रम राबवित आले आहे, त्या अनुशगाने आज पुन्हा संस्थे मार्फत जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमा अंतर्गत गावातील तसेच टिटवा येथील निराधार, बेघर, आश्रित, अपंग, विधवा अशा अनेक  नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.

गरजू लोकानी या कार्यक्रमाचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला असुन श्रीमती कमलबाई ब. टावरी बहु उद्देशिय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री कृष्णकुमारजी ब. टावरी यांनी या मदतीला *"समाजाचे देणे "* संबोधले असुन ही प्रत्येक सक्षम व्यक्तिची सामजिक जवाबदारी आहे असे मत मांडले आणी अशा संकटाच्या परिस्थिती मध्ये एक-मेकना सहाय्य करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात मास्क आणी नेहमी हात स्वच्छ धूने आणि सामाजिक अंतराचे महत्व डॉ. हेमंत जाधव, माजी सभापती पंचायत समिती चांदूर रेल्वे यांनी उपस्थीत लाभार्थ्यांना पटवून दिले व सदर कार्यक्रमात त्याची अमलबजावणी सुद्धा करवून घेतली.

संस्थेचे सचिव श्री प्रेमकुमारजी ब. टावरी आणी शाळा संचालक रूपेश पां. भोयर, तसेच संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमाला मदत करणारे गावतील सहकारी डॉ. हेमंत जाधव, तसेच घुईखेड ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. वर्षा हेमंत जाधव उप सरपंच श्री. अनीलजी वानखडे, सौ. काजलताई वानखडे, सरपंच टिटवा, श्री रवींद्रजी जैन, श्री. नंदकिशोर काकडे, श्री. संदीप सोळंके, श्री धीरज नेवारे, प्रा. प्रदीप जाधव श्री सचिन मेहर, सौ. संजीवनीताई शिलनकर आणी इतर सहकारी उपस्थीत होते.

No comments: