Friday, September 30, 2022

यवतमाळ जिल्ह्यात ४ दिवसात ५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या -चालू वर्षात एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २१६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या -सरकारच्या सर्वच घोषणा केवळ कागदावर

यवतमाळ जिल्ह्यात ४ दिवसात ५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या -चालू वर्षात एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २१६  शेतकऱ्यांच्या आत्महत्या -सरकारच्या सर्वच घोषणा केवळ कागदावर 

दिनांक ३०  सप्टेंबर २०२२

सर्वात जास्त पुरबुडी ,अतिवृष्टी व नापीकीचा सर्वात जास्त फटका बसलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील  मारेगाव ,घाटंजी ,आर्णी ,राळेगाव व महागाव तालुक्यातील अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचे मागील ३ महीन्यापासून सुरु झालेले आत्महत्या सत्र अधिकच तीव्र झाले असुन मागील ४ दिवसात ६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या एकट्या यवतमाळ जिल्ह्यात समोर आल्या आहेत यामध्ये रा. बोथा ता. महागाव येथील अमोल सरगर,रा. मंगरूळ ता. आर्णी येथील  हिरामण मडावी,रा. झाडगाव ता. राळेगाव येथील  जिवन थुटुरकर , रा. सोणखास ता.घाटंजी रामलू भंडारवार व रा. वडकी ता. राळेगाव मोरेश्वर गराट यांचा समावेश असुन मागील ३ महीन्यापासून यवतमाळ जिल्ह्यात दररोज सरासरी १ शेतकरी आत्महत्या करीत असुन यावर्षी एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २१६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असुन मागील तीन- चार महाराष्ट्रामध्ये सरकार जवळ जवळ नसल्यासारखे असुन एकीकडे सरकारी मदत ,अनुदान ,प्रोसाहन भत्ता ,नवीन- जुनी पीक कर्ज माफी यावर कोणतेच काम होत नसुन वर पासून खाल पर्यंत अधिकारी कर्मचारी ज्या ठिकाणी जसे जमेल तसे पैसे खाण्यात तर लोकप्रतिनिधी मिळेल ते कमीशन घेण्यात गुंतले असल्यामुळे परिस्थिती विदारक झाल्याचा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते व शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केला आहे . 
 "आपण प्रचंड अडचणीत व अवसादात असलेल्या शेतकऱ्यांच्या घरी भेट देऊन सरकारला वारंवार सुचना देऊनही मस्तवाल अधिकाऱ्यांनी परीस्थितीचे गांभीर्य वेळेवर दाखविलें नाही त्यामूळे हा शेतकऱ्यांचा नरसंहार होत असुन यवतमाळ जिल्ह्यात बहुतेक सर्वच आमदार सरकारी पक्षाकडे असल्यामुळे व त्यांच्या दिसत असलेली अभुतपुर्व उदासीनता दररोज होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांसाठी कारणीभूत ठरत आहे त्यातच एखादा  आमदार चुकुन शेतकऱ्याच्या दारावर जाऊन कुटुंबाची थट्टा केल्याच्या तक्रारी सुद्धा येत आहेत . आपण राज्याचे डमी मुख्यमंत्री एकनाथ शींदे ,सर्व आदेश देणारे खरे मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी १२ सप्टेंबरला मुंबईला गेलो होतो व मात्र त्यांनी भेट नाकारली तेंव्हा आपण आपले निवेदन डमी मुख्यमंत्र्याचे सचिव भूषण गगराणी तसेच खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव डॉ शिखर परदेसी यांना भेटून निवेदन दिले मात्र डमी मुख्यमंत्री वा रिअल डिफेकटो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१६ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या एकाही कुटुंबाला भेट दिली नाही मात्र आपण सरकारला अडचणीत आणत असल्याचा ठपका ठेवत शेतकरी मिशन वरून तातडीने  हकालपट्टी
केल्याची खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली कारण आपणास देवेंद्र फडणवीस यांनी निमंत्रीत करून शेतकरी मिशन वर काम करण्यास सांगीतले होते व त्यांनी राजीनामा देण्यास सांगीतले असते तर आपली हकालपट्टीची बातमी वहकाल पट्टीचे श्रेय घेण्यामधील चढाओढ टाळली गेली असती मात्र राजकारणात मतभेद हे समाजातील समस्या व सामाजिक न्याय यापेक्षा वरचढ झाल्याने हे होत आहे . 

विदर्भात पहिल्या नऊ  महिन्यात विक्रमी १०९२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

यावर्षी विदर्भात पहिल्या नऊ  महिन्यात विक्रमी १०९२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या आजपर्यंत सर्वात जास्तआत्महत्या २००६ मध्ये १२३१ झाल्या होत्या मात्र २०२२ मध्ये हा आकडा जर अशाच आत्महत्या दररोज होत राहिल्या तर १५०० च्या जाणार हे निश्चित असुन याला सतत अतिवृष्टी नापिकी उत्पादनात झालेली घट व प्रशासकीय धोरण ,उदासीनता प्रचंड भ्र्ष्टाचार कारणीभुत असुन २०२१ च्या दुष्काळी वर्षातच विदर्भात ११८० कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर आली होत्या मात्र २०२२ मध्ये हे आत्महत्या सत्र सततची पुरबुडी अतिवृष्टी नापिकी शेती वाढलेला खर्च यामुळे प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करणार असा प्रण घोषित केल्यामुळे विदर्भातील आत्महत्यांचे पीक व दररोज होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी "पंचसुत्री एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम "  किशोर तिवारी यांनी सादर  केला होता 
त्यामध्ये लागवडीचा खर्च ,शेतीमालाचा भाव ,जमीन व पाण्याचे पुनर्जीवन ,उत्पादकता ,बियांचे स्वातंत्र्य 'पीक पद्धती व अन्न ,डाळी ,तेलबीया या पिकांचे नगदी पिकांच्या ठिकाणी नियोजन व त्यासाठी अनुदान 'सहज मुबलक पतपुरवडा धोरण'  नुकसान भरपाई शेतकरी यांना वाचविणारी पीकविमा योजना ,प्रशासकीय ,राजकीय ,सामाजीक भ्रष्टाचाराचे ग्रामीण भागातून निर्मुलन या पाच मुद्दयांवर एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम सरकारने प्रायोगिक तत्वावर सर्वात जास्त आत्महत्या होत असलेल्या अमरावती ,यवतमाळ जिल्ह्यात लागू करावा अशी मागणी किशोर तिवारी केली असुन जोपर्यन्त लागवडी खर्च कमी होत नाही ,नवीन विकसित तंत्र ,जमिनीचे आरोग्य ,पाण्याचे नियोजन व त्याचे आरोग्य दुरुस्त होत नाही तोपर्यंत उत्पादकता वाढणार नाही त्यावर सर्वात पहिले काम करण्याचे शेतकरी मिशनने सुचविले आहे .पीक पद्धती व अन्न ,डाळी ,तेलबीया या पिकांचे नगदी पिकांच्या ठिकाणी नियोजन व त्यासाठी अनुदान यावर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी करीत सहज मुबलक पंचवार्षिक पतपुरवडा देणारे  धोरण  तसेच सततची नापीकी पुरबुडी दुष्काळ यासाठी नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या हिताची असणे गरजेचे झाले आहे यावर सुधारणा करून शेतकऱ्यांचे प्राण वाचविणारी पीकविमा योजना ताकाला लागू करण्याची सूचना किशोर तिवारी यांनी  केली होती मात्र फडणवीस सरकारने द्वेषापोटी त्याला केराची टोपली दाखविली त्यामुळेच शेतकरी आत्महत्या वाढल्याचा आरोपही किशोर तिवारी यांनी केला . 

===============================================================

Saturday, September 24, 2022

२४ सप्टेंबरला शेकडो शेतकरी विधवा शहीद शेतकरी दशरथजी केदारी यांना वाहणार श्रद्धांजली - पंतप्रधान मोदीजींना लिहलेल्या पत्राची दाखल घेण्यासाठी करणार गांधीगीरी आंदोलन

२४ सप्टेंबरला शेकडो शेतकरी विधवा शहीद शेतकरी   दशरथजी केदारी यांना वाहणार श्रद्धांजली - पंतप्रधान मोदीजींना लिहलेल्या पत्राची दाखल घेण्यासाठी करणार गांधीगीरी आंदोलन   

दिनांक २४ सप्टेबर २०२२

अख्ख्या भारतात कृषी विकासासाठी कळसावर असलेल्या तसेच महाराष्ट्राच्या कृषी उत्पन्नात २० टक्के वाटा असलेल्या पुणे महसुल विभागातील आळे  येथील शेतकरी  दशरथ केदारी यांनी सुसाईड नोट लिहून भारताच्या पंतप्रधानांना शेतीच्या संकटामुळे आत्महत्या करणाऱ्या  शेतकऱ्यांचा सुरू असलेला नरसंहार थांबवण्याची विनंती केली होती परंतु त्याच्या सुसाईड नोटची साधी दखलही नाकर्त्या केंद्र व राज्य सरकारने घेतली नसुन दिनांक २४ सप्टेंबरला भारताची शेतकरी आत्महत्यांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे शेकडो शेतकरी विधवा कृषी संकंटांवर लक्ष वेधण्यासाठी शाहिद झालेल्या दशरथ केदारी यांना श्रद्धांजली देणार असुन ,पंतप्रधान मोदिजींच्या प्रतिमेवर फुल वाहुन गांधीगिरीचे आंदोलन करणार असल्याची  माहीती  विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या  अपर्णाताई  मालीकर, सरस्वतीबाई  अंबरवार, रेखा गुरणूले,  भारती पवार, शिला मांडवगडे ,चंद्रकला मेश्राम, माया वैद्य , शोभा करलुके ,अंजुबाई भुसारी ,निर्मला शेंडे ,नंदा भेंडारे, वंदना शेंडे बबिता आगरकर ,रंजना गुरणूले ,ज्योती जिद्देवार, रंजना खडसे,अर्चना राऊत, बेबीताई बैस, संगीता पंचलेनवार गिता राठोड ,कविता सिडाम, मंगला बेतवार, वंदना गावंडे, उमा जिड्डेवार ,गीता चिंचोलकर, रमा ठमके, वंदना मोहुर्ले , कमल सुरपाम ,इंदुबाई आष्टेकर यांनी दिली .हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम स्व जानकीबाई तिवारी सभागृह ,छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पांढरकवडा येथे २४ सप्टेंबरला दुपारी २ वाजता आयोजीत करण्यात आला आहे असल्याची माहिती शेतकरी विधवा संघटनेच्या प्रवक्त्या सुशीलाताई आस्वले यांनी दिली . 

आत्महत्या करण्यापुर्वी आपल्या सुसाईड नोट मध्ये  शहीद दशरथ लक्ष्मण केदारी यांनी आत्महत्या करतांना  लिहिले आहे की 'मी जिवनास कंटाळलो असून शेतीच्या कुठल्याच पिकाला बाजारभाव मिळत नसून कोरोना काळात बाजारभाव मिळाला नाही. त्यातच अतीपावसाने पिके वाया गेल्याने हाताला काम नसल्याने खर्चाची मारामार झाली. त्यात देणेदारीवाले थांबायला तयार नाहीत. कांद्याला योग्य भाव नाही. आम्ही भिक मागत नाही, काय करायचे ते सांगा'.'मोदी साहेब तुम्ही शेतीला हमीभाव दिला पाहीजेत. तुम्हाला शेतीवर कंट्रोल ठेवता येत नाही. शेतकरी काय करेल फायनान्सवाले दम देतात. पतपेढीवाले अपशब्द वापरतात. आम्ही कोणाकडे दाद मागायची. शेतकऱ्यासारखा जुगार कोण खेळत नाही. आज मी आत्महत्येस प्रवृत्त आहे. ते तुमच्या नकारतेमुळे. आम्हाला आमच्या हक्काचा बाजारभाव द्या, शेवटी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मोदी साहेब', असे लिहित शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतल्याचा उल्लेख केला आहे . खरतर राज्यकर्त्यांनी केलेली ही  हत्याच व सदोष वधाचा खटला सरकारवर चालविला पाहीजे मात्र सध्या लोकशाहीचे सर्व स्तंभ निकामी करण्यात सरकार यशस्वी होत आहे व न्यायव्यवस्था ,नौकरशाही ,लोकप्रतिनिधी यांचा कणा संपूर्ण वाकला असुन आता आपणच आपल्या एकाधिकारशाहीने भारत चालवीत आहात म्हणून एकदा  दशरथजी केदारी यांच्या भेट द्यावी यासाठी विनंती केली आहे जर तुम्ही वेळ काढू शकत नसाल, तर कृपया अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना या आठवड्यात त्यांच्या पुण्याच्या ३ दिवसांच्या सहलीदरम्यान मृत शेतकऱ्याच्या घरी/कुटुंबाला भेट देण्याचे निर्देश द्यावे अशी विनंती शेतकरी विधवा संघटनेच्या सचीव कविता सिडाम  यांनी केली आहे 

 सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी संकटाची मुळ कारणे लागवडीचा खर्चात अनियंत्रित वाढ ,फारच अपुरा हमीभाव ,पीककर्जाबाबत सरकारी बँकांचा नाकर्तेपणा ,पीक पद्धतीत पर्यावरणातील बदलला अनुसरण व भारताच्या १३० कोटी जनतेच्या लागणारे डाळी तेल अन्न इतर कृषी उपजांसाठी विषेय  सवलती व प्रयन्त ,शेतकऱ्यांचे हित जपणारी पीकविमा योजना या सर्व बाबीवर तोडगा काढण्याचे आश्वासन मोदीजीनी  दाभाडी वरून देशाला २०१४ मध्ये दिले होते व त्यांनी  प्रामाणिकपणे या सर्वबाबींवर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयन्त सुद्धा केले मात्र बहुराष्ट्रीय कंपन्यांची चाकरी करणारी नौकारशाही व नालायक कृषी मंत्र्यांच्याभ्रष्ट  कार्यशैलीने हे कृषी संकट फारच गडद झाले  आहे व हेच मुद्दे शहीद दशरथ केदारी यांनी आपल्या सुसाईड नोट मध्ये उपस्थित केले असुन लक्ष वेधण्यासाठीच आपण देशाचे हे आंदोलन करीत असल्याची माहीती शेतकरी विधवा  अपर्णाताई  मालीकर व सरस्वतीबाई  अंबरवारयांनी यावेळी दिली 

===============================================================

Wednesday, September 21, 2022

पांढरकवडा येथे २२ सप्टेंबरला शिवसेना प्रवक्ते यांचा उपोषण सत्त्याग्रह

पांढरकवडा येथे २२ सप्टेंबरला शिवसेना प्रवक्ते यांचा  उपोषण सत्त्याग्रह

दिनांक २१ सप्टेंबर २०२२

पांढरकवड्यातील राजकीय, सामाजीक व प्रत्येक ठिकाणी साचलेली घाण दूर करण्यासाठी ,शहरातील गुंडाराज ,लँड माफीया ,खंडणी वसुली करणाऱ्या असामाजिक उपद्रवाचा बंदोबस्त करण्यासाठी , तसेच आंबेडकर वस्तीसह सर्व प्रलंबित घराचे पट्टे देण्याबाबत ,सर्वांना निराधार व अन्न सुरक्षा मिळण्याबाबत ,नगरपरिषदेमध्ये मागील पाच वर्षात आलेल्या निधी व कंत्राट सह केलेल्या खर्चाची स्वतंत्र ऑडीट व चौकशी करण्यासाठी तसेच पोलीस बंदोबस्तात राजरोसपणे सुरु असलेला वरळी मटका ,क्रिकेटचा मटका बंद करण्यासाठी सामाजीक कार्यकर्ते व शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी २२ सप्टेंबरला बौद्ध विहार  समोर ,आंबेडकर वॉर्ड पांढरकवडा येथे उपोषण सत्त्याग्रह करणार आहेत त्यांच्यासोबत आदिवासी नेते अंकीत नैताम सुद्धा सहभागी होतील 

मागील ३० वर्षापासुन जमिनीच्या पट्ट्याचा प्रश्न प्रलंबित 
मागील ६० वर्षापासुन नझुल जागेवर दलीत व मादगी समाजाचे शेकडो कुटुंब राहत आहे .संपुर्ण चौकशी करून व कायदेशीर बाजु तपासल्यानंतर तसेच नगर परिषदने जमिनीचे पटटे व घरकुल देण्याचा प्रस्ताव दिल्ल्यानंतरही पैसे देत नसल्यामुळे या अतिशय गरीब वंचीत लोकांना त्यांच्या टक्काचे घरकुला पासुन वंचित ठेवत आहेत .आम्ही मागील २० वर्षापासुन प्रशासनाचा दारावर चपला घासत आहोत मात्र आम्ह्चे काम फुकटात करण्यास कोणीही करत नसुन आता आम्हाला भर पावसात रस्त्यावर उपोषण करावे लागत आहे ,आतातरी अधिकाऱ्यांनी जागावे अशी विनंती प्रकाश रामटेके, भाऊराव मेश्राम, मिराबाई खोब्रागडे, सुभद्राबाई काळे, मंगला खोंडे, जगदीश प्रजापती, दत्ता उत्कंडे, चिनय्या अवणुरवर, संतोष रामटेके, पवन मेश्राम यांनी केली आहे . 

आदीवासी व आदिम आदीवासी जमिनीच्या पट्ट्यापासून व घरकुला पासून प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रलंबीत 

आदीवासी व आदिम आदीवासी जमिनीच्या पट्ट्यापासून व घरकुला पासून प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रलंबीत असुन याला अधिकार्यांच्या नाकर्तेपणा जबाबदार असल्याचा आरोप आदिवासी नेते अंकीत नैताम यांनी यावेळी केला जर सरकारने आम्ह्चे अधिकाराचे घरकुल व जमिनीचे पट्टे दिले नाही तर आम्ही हे उपोषण सत्त्याग्रह आमरण उपोषणामध्ये पुढे सुरु ठेवु असा गंभीर इशारा यावेळी विशाल मेश्राम, सुधाकर जंगलवार, माया मेश्राम, रमेश आत्राम, रेशमा गेडाम, देवनाथ गेडाम, काशिनाथ उपरे, व्यंकटी सातुरवार,मलय्या अवणुरवार, नरसिंग कुटलवार, अशोक गुम्मडवार, रवि कनकुटंलावार, नरसिंग कुरेवार, राजंना बतलवार हणमंतू अडूरवार, देवाजी रामटेके, समाधान रामटेके, रवि रामटेके, वसंतराव रामटेके, संतोष गेडाम,दशरथ मेश्राम, महेश गेडाम नंदकुमार वड्डे या वंचीत दलीत व माडगी समाजाच्या नागरीकांनी यावेळी दिला . 

प्रशासकीय अनागोंदी कारभार  व राजरोसपणे सूर असलेला भ्रष्टाचारा समुळ समाप्त करा -किशोर तिवारी 
पोलीस बंदोबस्तात राजरोसपणे सुरु असलेला वरळी मटका ,क्रिकेटचा मटका बंद तात्काळ बंद करणे ,खंडणी व ब्लॅक मेल करून लुटणाऱ्यांची टोळी शहरात सक्रिय झाली आहे .चिड्डीमार गॅंग बिनधास्त हैदौस गावात घालत असुन आई बहिणींचे रस्त्यावर फिरणे कधीं झाले आहे .कॉलेज व शाळेच्या रस्तावर गुंड मुलीना त्रास देतात मात्र पोलीस २४ तास फक्त वसुली करतात अशा परिस्थितीमध्ये आता जनतेनी कायदा हातात घेण्याची वेळ आली असून जर उपोषण सत्त्याग्रहानंतरही परिस्थिती बदलली नाही तर आम्ही अधिकाऱयांना "बदडा आंदोलन 'सुरु करू असा इशारा किशोर तिवारी यांनी यावेळी दिला 
===============================================================







Monday, September 19, 2022

पंतप्रधानमोदींना पत्र लिहुन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या घटनेवर मोदींना पत्र वरून किशोर तिवारी यांची शेतकरी मिशन वरून हकालपट्टी

पंतप्रधानमोदींना पत्र लिहुन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या घटनेवर मोदींना  पत्र वरून किशोर तिवारी यांची शेतकरी मिशन वरून हकालपट्टी 

दिनांक १९ सप्टेंबर २०२२


अख्ख्या भारतात कृषी विकासासाठी कळसावर असलेल्या तसेच महाराष्ट्राच्या कृषी उत्पन्नात २० टक्के वाटा असलेल्या पुणे महसुल विभागातील जिंतूर तालुक्यातील युवा दशरथ लक्ष्मण केदारी गाव आळे तालुका जिंतूर जि. येथील शेतकरी यांचे संलग्न पत्र लिहून ,भारताच्या पंतप्रधानांना शेतीच्या संकटामुळे आत्महत्या करणाऱ्या पुणेकरांनी  तुमच्या वाढदिवशी कर्ज आणि शेतकऱ्यांचा सुरू असलेला नरसंहार थांबवण्याची विनंती केली होती हे प्रकरण 
किशोर तिवारी यांनी पंतप्रधान  कार्यालयात रेटल्या मुळे  महाराष्ट्र सरकारच्या कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशन अध्यक्ष या पदावरून भाजपच्या दबावाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हकालपट्टी केली व तसा आदेश तात्काळ संध्याकाळ पर्यंत विभागीय आयुक्त अमरावती यांचेकडे देण्यात आला आहे . 


किशोर तिवारी यांची नियुक्ती  भाजप सरकारचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी राज्यमंत्री दर्जा देत २०१५ मध्ये विषेय अध्यादेश काढून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केली होती त्यापूर्वी माननीय पंतप्रधान २०१४ च्या मार्च महिन्याच्या शेवटी भारतात शेतकरी आत्महत्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या दाभाडी येथे अखिल भारतीय स्तरावर सर्व माध्यमांवर सरळ प्रसारीत करून जी "चाय पे चर्चा " आयोजीत केली होती त्यामध्ये मी कृषी क्षेत्रातील जाणकार म्हणुन एकमेव अधिकृत  प्रतिनिधी संचालन करण्यास उपस्थित त्यावेळी आपण कृषी संकट संपविण्यासाठी व शेतकऱ्यांच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी संकटाची मुळ कारणे लागवडीचा खर्चात अनियंत्रित वाढ ,फारच अपुरा हमीभाव ,पीककर्जाबाबत सरकारी बँकांचा नाकर्तेपणा ,पीक पद्धतीत पर्यावरणातील बदलला अनुसरण व भारताच्या १३० कोटी जनतेच्या लागणारे डाळी तेल अन्न इतर कृषी उपजांसाठी विषेय  सवलती व प्रयन्त ,शेतकऱ्यांचे हित जपणारी पीकविमा योजना या सर्व बाबीवर तोडगा काढण्याचे आश्वासन आपण दाभाडी वरून देशाला २०१४ मध्ये दिले होते व आपण प्रामाणिकपणे या सर्वबाबींवर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयन्त सुद्धा केले मात्र बहुराष्ट्रीय कंपन्यांची चाकरी करणारी नौकारशाही व नालायक कृषी मंत्र्यांच्या भ्र्ष्ट कार्यशैलीने हे कृषी संकट फारच गडद झाली आहे ,असे किशोर तिवारी यांनी आपल्या पत्रात म्हटले होते . 

आपल्या पत्रात कृषी संकटाचे शहीद दशरथ लक्ष्मण केदारी यांनी आत्महत्या करण्याचा अगोदर एक चिठ्ठी हवाला दिला असुन त्यांनी त्यामध्ये असे लिहिले आहे की 'मी जिवनास कंटाळलो असून शेतीच्या कुठल्याच पिकाला बाजारभाव मिळत नसून कोरोना काळात बाजारभाव मिळाला नाही. त्यातच अतीपावसाने पिके वाया गेल्याने हाताला काम नसल्याने खर्चाची मारामार झाली. त्यात देणेदारीवाले थांबायला तयार नाहीत. कांद्याला योग्य भाव नाही. आम्ही भिक मागत नाही, काय करायचे ते सांगा'.'मोदी साहेब तुम्ही शेतीला हमीभाव दिला पाहीजेत. तुम्हाला शेतीवर कंट्रोल ठेवता येत नाही. शेतकरी काय करेल फायनान्सवाले दम देतात. पतपेढीवाले अपशब्द वापरतात. आम्ही कोणाकडे दाद मागायची. शेतकऱ्यासारखा जुगार कोण खेळत नाही. आज मी आत्महत्येस प्रवृत्त आहे. ते तुमच्या नकारतेमुळे. आम्हाला आमच्या हक्काचा बाजारभाव द्या, शेवटी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मोदी साहेब', असे लिहित शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतल्याचा उल्लेख केला आहे . खरतर राज्यकर्त्यांनी केलेली ही  हत्याच व सदोष वधाचा खटला सरकारवर चालविला पाहीजे मात्र सध्या लोकशाहीचे सर्व स्तंभ निकामी करण्यात सरकार यशस्वी होत आहे व न्यायव्यवस्था ,नौकरशाही ,लोकप्रतिनिधी यांचा कणा संपूर्ण वाकला असुन आता आपणच आपल्या एकाधिकारशाहीने भारत चालवीत आहात म्हणून एकदा  दशरथजी केदारी यांच्या भेट द्यावी यासाठी विनंती केली आहे जर तुम्ही वेळ काढू शकत नसाल, तर कृपया अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना या आठवड्यात त्यांच्या पुण्याच्या ३ दिवसांच्या सहलीदरम्यान मृत शेतकऱ्याच्या घरी/कुटुंबाला भेट देण्याचे निर्देश द्यावे अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली होती . 

==============================================================

पंतप्रधान मोदीजींना पत्र लिहुन शेतकरी दशरथजी केदारी यांची आत्महत्या- महाराष्ट्राच्या शेतकरी मिशनने मोदींना आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेटीसाठी पत्र

पंतप्रधान मोदीजींना पत्र लिहुन शेतकरी दशरथजी केदारी यांची आत्महत्या- महाराष्ट्राच्या शेतकरी मिशनने मोदींना  आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेटीसाठी पत्र 

दिनांक १९ सप्टेबर २०२२


अख्ख्या भारतात कृषी विकासासाठी कळसावर असलेल्या तसेच महाराष्ट्राच्या कृषी उत्पन्नात २० टक्के वाटा असलेल्या पुणे महसुल विभागातील जिंतूर तालुक्यातील युवा दशरथ लक्ष्मण केदारी गाव आळे तालुका जिंतूर जि. येथील शेतकरी यांचे संलग्न पत्र लिहून ,भारताच्या पंतप्रधानांना शेतीच्या संकटामुळे आत्महत्या करणाऱ्या पुणेकरांनी  तुमच्या वाढदिवशी कर्ज आणि शेतकऱ्यांचा सुरू असलेला नरसंहार थांबवण्याची विनंती केली.

किशोर तिवारी जे महाराष्ट्र सरकारच्या कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशन अध्यक्ष असुन  ज्यांची भाजप सरकारचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी राज्यमंत्री दर्जा देत २०१५ मध्ये विषेय अध्यादेश काढून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नियुक्ती केली होती त्यापूर्वी माननीय पंतप्रधान २०१४ च्या मार्च महिन्याच्या शेवटी भारतात शेतकरी आत्महत्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या दाभाडी येथे अखिल भारतीय स्तरावर सर्व माध्यमांवर सरळ प्रसारीत करून जी "चाय पे चर्चा " आयोजीत केली होती त्यामध्ये मी कृषी क्षेत्रातील जाणकार म्हणुन एकमेव अधिकृत  प्रतिनिधी संचालन करण्यास उपस्थित त्यावेळी आपण कृषी संकट संपविण्यासाठी व शेतकऱ्यांच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी संकटाची मुळ कारणे लागवडीचा खर्चात अनियंत्रित वाढ ,फारच अपुरा हमीभाव ,पीककर्जाबाबत सरकारी बँकांचा नाकर्तेपणा ,पीक पद्धतीत पर्यावरणातील बदलला अनुसरण व भारताच्या १३० कोटी जनतेच्या लागणारे डाळी तेल अन्न इतर कृषी उपजांसाठी विषेय  सवलती व प्रयन्त ,शेतकऱ्यांचे हित जपणारी पीकविमा योजना या सर्व बाबीवर तोडगा काढण्याचे आश्वासन आपण दाभाडी वरून देशाला २०१४ मध्ये दिले होते व आपण प्रामाणिकपणे या सर्वबाबींवर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयन्त सुद्धा केले मात्र बहुराष्ट्रीय कंपन्यांची चाकरी करणारी नौकारशाही व नालायक कृषी मंत्र्यांच्या भ्र्ष्ट कार्यशैलीने हे कृषी संकट फारच गडद झाली आहे ,असे किशोर तिवारी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे . 

आपल्या पत्रात कृषी संकटाचे शहीद दशरथ लक्ष्मण केदारी यांनी आत्महत्या करण्याचा अगोदर एक चिठ्ठी हवाला दिला असुन त्यांनी त्यामध्ये असे लिहिले आहे की 'मी जिवनास कंटाळलो असून शेतीच्या कुठल्याच पिकाला बाजारभाव मिळत नसून कोरोना काळात बाजारभाव मिळाला नाही. त्यातच अतीपावसाने पिके वाया गेल्याने हाताला काम नसल्याने खर्चाची मारामार झाली. त्यात देणेदारीवाले थांबायला तयार नाहीत. कांद्याला योग्य भाव नाही. आम्ही भिक मागत नाही, काय करायचे ते सांगा'.'मोदी साहेब तुम्ही शेतीला हमीभाव दिला पाहीजेत. तुम्हाला शेतीवर कंट्रोल ठेवता येत नाही. शेतकरी काय करेल फायनान्सवाले दम देतात. पतपेढीवाले अपशब्द वापरतात. आम्ही कोणाकडे दाद मागायची. शेतकऱ्यासारखा जुगार कोण खेळत नाही. आज मी आत्महत्येस प्रवृत्त आहे. ते तुमच्या नकारतेमुळे. आम्हाला आमच्या हक्काचा बाजारभाव द्या, शेवटी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मोदी साहेब', असे लिहित शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतल्याचा उल्लेख केला आहे . खरतर राज्यकर्त्यांनी केलेली ही  हत्याच व सदोष वधाचा खटला सरकारवर चालविला पाहीजे मात्र सध्या लोकशाहीचे सर्व स्तंभ निकामी करण्यात सरकार यशस्वी होत आहे व न्यायव्यवस्था ,नौकरशाही ,लोकप्रतिनिधी यांचा कणा संपूर्ण वाकला असुन आता आपणच आपल्या एकाधिकारशाहीने भारत चालवीत आहात म्हणून एकदा  दशरथजी केदारी यांच्या भेट द्यावी यासाठी विनंती केली आहे जर तुम्ही वेळ काढू शकत नसाल, तर कृपया अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना या आठवड्यात त्यांच्या पुण्याच्या ३ दिवसांच्या सहलीदरम्यान मृत शेतकऱ्याच्या घरी/कुटुंबाला भेट देण्याचे निर्देश द्यावे अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे 

===============================================================

Sunday, September 11, 2022

Vidarbha reports 7 more farmer suicides in 72 hours –Record 1060 farmers’ suicides in 2022

Vidarbha reports 7 more farmer suicides in 72 hours – Record 1060 farmers’ suicides in 2022

Dated 11 September 2022

The record rain coupled with heavy damages of crop in Maharashtra has restarted farmers suicides spiral in vidarbha which is epicenter of farmers suicides in India .Vidarbha reported seven more farmers killed themselves in last 72 hours even  Maharashtra government has given increased compensation for the damage caused due to recent heavy rain  and started  CM Kisan Yojana like PM Kisan Yojna  ,farm activist Kishore Tiwari informed today .

The recent seven farmers who killed themselves are

 1. Sudhir Golar of Pandharkawda district .Yavatmal

2. Ratanlal Dhurve of Nardu District Amravati

3. Pravin More of Lonbahel  District.Yavatmal

4. Gunwant Madavi of Amboda  District. Wardha

5. Roshan Mahekar of Mahadevpura District Amravati District

6. Sovinda Raut of Navegaon Dam District Gondia

7.Maroti Nahgamkar of.Ghosari  District Chandrapur

Taking toll 1060 in the year 2022 where as  26 farmers have committed suicide in the last 13 days, out of which 14 suicides have committed suicide in the last seven days and 8 farmers have committed suicide in Maregaon taluka of Yavatmal district alone, tiwari added. .

After West Vidarbha Farmers Suicide spiral Reaches Eastern Vidarbha Paddy Belt – Politician ignored  the farm suicide issue 

In last 25 years more than 28,000 farmers suicides reported in the dry land cotton and soybean farmers in West Vidarbha but same time paddy farmers in East Vidarbha suicides in very less than 3000 but recent years farmers suicides increased in east Vidarbha too and 2022 farmer suicides are at par with west Vidarbha which is alarming for the Govt., all political parties who wants to make agrarian crisis and farm suicides at the time of poll are now are currently keeping silent on these suicides, tiwari said.

Maharashtra in last 5 years mega loan waivers were given to farmers by state govt. whereas central govt. has started direct cash subsidy to farmers along with Prime Minister's Irrigation Scheme, Prime Minister's Crop Insurance Scheme, Electricity subsidy, food security, health security, education subsidy but farm distress in rural Vidarbha and Marathwada of region Maharashtra is getting worst ,as core issues of agrarian crisis are not resolved by state is the only  reason of ongoing farm crisis and farmers suicides is main. Kishore Tiwari informed today.

Kishore Tiwari welcomed the announcement of  Maharashtra Chief Minister Eknathrao Shinde that Maharashtra farmers will be free from suicide, and as he has announced Chief Minister Shetkari Samman Yojana, if he is concerned about the farmers of Vidarbha Marathwada, he should address  the root cause of agricultural crisis and present distress which are 

1. Reduction in production cost, regeneration of land and water quality, increase in productivity, freedom of seeds. Environment friendly sustainable agriculture.

2. The change in cropping pattern and direct cash incentive for  food, pulses, oilseeds in the place of cash crops.

3.Reformes in farm credit policy  ,Easy abundant crop loan to and removal of RBI and Nationalized Bank    anti-farmer policy of CIBIL .

4. farmers friendly Crop insurance scheme to save exploitation of dying  farmers

5. Elimination of administrative, political and social corruption from rural areas

Kishore Tiwari added that unless the cost of cultivation is not reduced, the newly developed techniques are not introduces, soil health, protective irrigation are not aadressed the productivity will not increase. Demanding an immediate decision on the planning of pulses and oilseed crops in place the cash crop area and the subsidy for the same, the policy of providing five-year farm credit policy and the crop insurance scheme that saves the lives of farmers should be implemented immediately along with ongoing uncontrolled administrative, political and social corruption in stopped which has completely spoil the economic, mental, physical, spiritual and social health of rural Vidarbha.


Sunday, September 4, 2022

विदर्भात अतिवृष्टी व नापिकीमुळे मागील ८ दिवसात १६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या -चालू वर्षात विक्रमी एकहजार ३२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या -शेतकरी मिशनने सरकारला दिला "पंचसुत्री एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम "

विदर्भात अतिवृष्टी व नापिकीमुळे मागील ८ दिवसात १६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या -चालू वर्षात विक्रमी एकहजार ३२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या -शेतकरी मिशनने सरकारला दिला "पंचसुत्री एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम  "

दिनांक ४ सप्टेंबर २०२२
विदर्भात मागील सात दिवसात १६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुर्देवी घटना समोर आल्या असुन यामध्ये मागील चार दिवसात ११ आत्महत्या समोर आल्या असुन तसेच एकट्या यवतमाळ जिल्ह्याचा मारेगाव तालुक्यात ४८ तासात ६ शतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत त्यांची यादीच कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी  सरकारला सादर केली आहे ती खालीलप्रमाणे आहे ,


१. संतोष चव्हाण रा. चिल्ली ता. महागाव जिल्हा यवतमाळ 

२. गजानन जाधव रा. आजनगाव ता.आर्वी जिल्हा वर्धा 

३. जियालाल राऊत रा. पारडी ता. लाखांदूर जिल्हा गोंदीया 

४. अजय टोपे रा.मलंपाडी ता. एटापल्ली जिल्हा गडचिरोली 

५. गिरधारी भेंडारकार रा. ता.सडकर्जूनी जिल्हा भंडारा 

 ६. अनिल ठाकरे रा. लाकठू ता.धारणी जिलखा अमरावती 

७.विनायक दुधे रा. ता. नेर जिल्हा यवतमाळ 

८. शिवदास वानखेडे रा. उडखेड ता.मोर्शी जिल्हा अमरावती 

९.विजय रोखडे रा.नवेगाव पेट ता.चिमूर जिल्हा चंद्रपूर 

१०.प्रल्हाद दमाहे रा.नवेगाव ता.व जिल्हा गोंदिया ,या शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर आली आहेत 

११. पुंडलीक रुयारकर रा. गदाजी  बोरी तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ 

१२ सतीश वासुदेव बोथले  रा म्हैस दोड़का तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ 

१३ . गजानन नारायण मुसळे  रा नरसाला तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ 

१४. सचिन सुभाष बोढेकर रा रामेश्वर तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ 

१५ . हरिदास सूर्यभान टोनपे शिवणी धोबे तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ 

१६ . तोताराम अंगत चिचुलकर  रा दांडगांव तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ 

विदर्भात पहिल्या आठ महिन्यात विक्रमी १०३२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

यावर्षी आजपर्यंत सर्वात जास्त आत्महत्या २००६ मध्ये १२३१ झाल्या होत्या मात्र २०२२ मध्ये हा आकडा जर अशाच आत्महत्या दररोज होत राहिल्या तर १५०० च्या जाणार हे निश्चित असुन याला सतत अतिवृष्टी नापिकी उत्पादनात झालेली घट व प्रशासकीय धोरण ,उदासीनता प्रचंड भ्र्ष्टाचार कारणीभुत असुन ,आपण २ सप्टेंबरला  यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव  तालुक्यात म्हैसदोडका ,नरसाळा ,रामेश्वर ,गदाजी बोरी येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना भेट दिली असता त्यावेळी या घरांना प्रशासन ,पोलीस ,कृषी ,ग्रामविकास ,आरोग्य सारख्या विभागाचा जिल्ह्यापासून तालुका पातळीचा एकही अधिकारी पोहचला नव्हता तसेच दौऱ्याच्या वेळही उपस्थित नव्हता यावरून शेतकरी आत्महत्या विषयी अधिकारी किती उदासीन आहेत हे दिसते अशी खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे . सरकारने मदत जाहीर केली मात्र एकही शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही ,कर्जमाफीचा लाभ सुद्धा मिळालेला नाही ,अन्न -आरोग्य -शिक्षण सुरक्षा मिळत नसल्याच्या तक्रारी सर्वानी केल्या . गावात कृषी सहायक ,तलाठी ,ग्रामसेवक ,आरोग्य सेवक ,शाळेचे शिक्षक कोणीही गावात राहत नाहीत व महिन्यातुन एक दिवस वा दोन दिवस येत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी किशोर तिवारी यांना यावेळी  केल्या . 

शेतकरी मिशनने सरकारला दिला "पंचसुत्री एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम  "
२०२१ च्या दुष्काळी वर्षातच विदर्भात ११८० कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर आली होत्या मात्र २०२२ मध्ये हे आत्महत्या सत्र सततची पुरबुडी अतिवृष्टी नापिकी शेती वाढलेला खर्च यामुळे प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करणार असा प्रण घोषित केल्यामुळे विदर्भातील आत्महत्यांचे पीक व दररोज होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी "पंचसुत्री एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम " शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सादर  केला असुन यामध्ये 
१. लागवडीचा खर्च ,शेतीमालाचा भाव ,जमीन व पाण्याचे पुनर्जीवन ,उत्पादकता .बियांचे स्वातंत्र्य 
२. पीक पद्धती व अन्न ,डाळी ,तेलबीया या पिकांचे नगदी पिकांच्या ठिकाणी नियोजन व त्यासाठी अनुदान 
३. सहज मुबलक पतपुरवडा धोरण 
४. नुकसान भरपाई शेतकरी यांना वाचविणारी पीकविमा योजना 
५. प्रशासकीय ,राजकीय ,सामाजीक भ्रष्टाचाराचे ग्रामीण भागातून निर्मुलन 

या पाच मुद्दयांवर एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम सरकारने प्रायोगिक तत्वावर सर्वात जास्त आत्महत्या होत असलेल्या अमरावती ,यवतमाळ जिल्ह्यात लागू करावा अशी मागणी किशोर तिवारी केली असुन जोपर्यन्त लागवडी खर्च कमी होत नाही ,नवीन विकसित तंत्र ,जमिनीचे आरोग्य ,पाण्याचे नियोजन व त्याचे आरोग्य दुरुस्त होत नाही तोपर्यंत उत्पादकता वाढणार नाही त्यावर सर्वात पहिले काम करण्याचे शेतकरी मिशनने सुचविले आहे .पीक पद्धती व अन्न ,डाळी ,तेलबीया या पिकांचे नगदी पिकांच्या ठिकाणी नियोजन व त्यासाठी अनुदान यावर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी करीत सहज मुबलक पंचवार्षिक पतपुरवडा देणारे  धोरण  तसेच सततची नापीकी पुरबुडी दुष्काळ यासाठी नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या हिताची असणे गरजेचे झाले आहे यावर सुधारणा करून शेतकऱ्यांचे प्राण वाचविणारी पीकविमा योजना ताकाला लागू करण्याची सूचना शेतकरी मिशनने  केली आहे . 
सध्या सुरु असलेला अनियंत्रित प्रशासकीय ,राजकीय ,सामाजीक भ्रष्टाचारामुळे ग्रामीण विदर्भातील आर्थीक ,मानसिक ,शारीरिक ,आध्यत्मिक ,सामाजिक आरोग्य पूर्णपणे बिघडले असुन गावापासून दिल्ली -मुंबई पर्यंत लोकप्रतिनिधी व सर्वच स्तराचे अधिकारी -कर्मचारी सरकारी पैशाची लूट करीत आहेत त्यामुळे आर्थीक ,मानसिक ,शारीरिक ,आध्यत्मिक ,सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत जर यावर तात्काळ नियंत्रण झाले नाही तर आज आत्महत्या करणारे युवा शेतकरी ग्रामीण जनता या तिजोरीच्या लुटीच्या भागीदारांचे मुडदे पाडतील असा इशारा किशोर तिवारी यांनी आपली "पंचसुत्री एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम "मध्ये दिला आहे . 

===============================================================