Monday, September 19, 2022

पंतप्रधानमोदींना पत्र लिहुन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या घटनेवर मोदींना पत्र वरून किशोर तिवारी यांची शेतकरी मिशन वरून हकालपट्टी

पंतप्रधानमोदींना पत्र लिहुन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या घटनेवर मोदींना  पत्र वरून किशोर तिवारी यांची शेतकरी मिशन वरून हकालपट्टी 

दिनांक १९ सप्टेंबर २०२२


अख्ख्या भारतात कृषी विकासासाठी कळसावर असलेल्या तसेच महाराष्ट्राच्या कृषी उत्पन्नात २० टक्के वाटा असलेल्या पुणे महसुल विभागातील जिंतूर तालुक्यातील युवा दशरथ लक्ष्मण केदारी गाव आळे तालुका जिंतूर जि. येथील शेतकरी यांचे संलग्न पत्र लिहून ,भारताच्या पंतप्रधानांना शेतीच्या संकटामुळे आत्महत्या करणाऱ्या पुणेकरांनी  तुमच्या वाढदिवशी कर्ज आणि शेतकऱ्यांचा सुरू असलेला नरसंहार थांबवण्याची विनंती केली होती हे प्रकरण 
किशोर तिवारी यांनी पंतप्रधान  कार्यालयात रेटल्या मुळे  महाराष्ट्र सरकारच्या कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशन अध्यक्ष या पदावरून भाजपच्या दबावाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हकालपट्टी केली व तसा आदेश तात्काळ संध्याकाळ पर्यंत विभागीय आयुक्त अमरावती यांचेकडे देण्यात आला आहे . 


किशोर तिवारी यांची नियुक्ती  भाजप सरकारचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी राज्यमंत्री दर्जा देत २०१५ मध्ये विषेय अध्यादेश काढून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केली होती त्यापूर्वी माननीय पंतप्रधान २०१४ च्या मार्च महिन्याच्या शेवटी भारतात शेतकरी आत्महत्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या दाभाडी येथे अखिल भारतीय स्तरावर सर्व माध्यमांवर सरळ प्रसारीत करून जी "चाय पे चर्चा " आयोजीत केली होती त्यामध्ये मी कृषी क्षेत्रातील जाणकार म्हणुन एकमेव अधिकृत  प्रतिनिधी संचालन करण्यास उपस्थित त्यावेळी आपण कृषी संकट संपविण्यासाठी व शेतकऱ्यांच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी संकटाची मुळ कारणे लागवडीचा खर्चात अनियंत्रित वाढ ,फारच अपुरा हमीभाव ,पीककर्जाबाबत सरकारी बँकांचा नाकर्तेपणा ,पीक पद्धतीत पर्यावरणातील बदलला अनुसरण व भारताच्या १३० कोटी जनतेच्या लागणारे डाळी तेल अन्न इतर कृषी उपजांसाठी विषेय  सवलती व प्रयन्त ,शेतकऱ्यांचे हित जपणारी पीकविमा योजना या सर्व बाबीवर तोडगा काढण्याचे आश्वासन आपण दाभाडी वरून देशाला २०१४ मध्ये दिले होते व आपण प्रामाणिकपणे या सर्वबाबींवर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयन्त सुद्धा केले मात्र बहुराष्ट्रीय कंपन्यांची चाकरी करणारी नौकारशाही व नालायक कृषी मंत्र्यांच्या भ्र्ष्ट कार्यशैलीने हे कृषी संकट फारच गडद झाली आहे ,असे किशोर तिवारी यांनी आपल्या पत्रात म्हटले होते . 

आपल्या पत्रात कृषी संकटाचे शहीद दशरथ लक्ष्मण केदारी यांनी आत्महत्या करण्याचा अगोदर एक चिठ्ठी हवाला दिला असुन त्यांनी त्यामध्ये असे लिहिले आहे की 'मी जिवनास कंटाळलो असून शेतीच्या कुठल्याच पिकाला बाजारभाव मिळत नसून कोरोना काळात बाजारभाव मिळाला नाही. त्यातच अतीपावसाने पिके वाया गेल्याने हाताला काम नसल्याने खर्चाची मारामार झाली. त्यात देणेदारीवाले थांबायला तयार नाहीत. कांद्याला योग्य भाव नाही. आम्ही भिक मागत नाही, काय करायचे ते सांगा'.'मोदी साहेब तुम्ही शेतीला हमीभाव दिला पाहीजेत. तुम्हाला शेतीवर कंट्रोल ठेवता येत नाही. शेतकरी काय करेल फायनान्सवाले दम देतात. पतपेढीवाले अपशब्द वापरतात. आम्ही कोणाकडे दाद मागायची. शेतकऱ्यासारखा जुगार कोण खेळत नाही. आज मी आत्महत्येस प्रवृत्त आहे. ते तुमच्या नकारतेमुळे. आम्हाला आमच्या हक्काचा बाजारभाव द्या, शेवटी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मोदी साहेब', असे लिहित शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतल्याचा उल्लेख केला आहे . खरतर राज्यकर्त्यांनी केलेली ही  हत्याच व सदोष वधाचा खटला सरकारवर चालविला पाहीजे मात्र सध्या लोकशाहीचे सर्व स्तंभ निकामी करण्यात सरकार यशस्वी होत आहे व न्यायव्यवस्था ,नौकरशाही ,लोकप्रतिनिधी यांचा कणा संपूर्ण वाकला असुन आता आपणच आपल्या एकाधिकारशाहीने भारत चालवीत आहात म्हणून एकदा  दशरथजी केदारी यांच्या भेट द्यावी यासाठी विनंती केली आहे जर तुम्ही वेळ काढू शकत नसाल, तर कृपया अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना या आठवड्यात त्यांच्या पुण्याच्या ३ दिवसांच्या सहलीदरम्यान मृत शेतकऱ्याच्या घरी/कुटुंबाला भेट देण्याचे निर्देश द्यावे अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली होती . 

==============================================================

No comments: