Sunday, September 4, 2022

विदर्भात अतिवृष्टी व नापिकीमुळे मागील ८ दिवसात १६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या -चालू वर्षात विक्रमी एकहजार ३२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या -शेतकरी मिशनने सरकारला दिला "पंचसुत्री एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम "

विदर्भात अतिवृष्टी व नापिकीमुळे मागील ८ दिवसात १६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या -चालू वर्षात विक्रमी एकहजार ३२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या -शेतकरी मिशनने सरकारला दिला "पंचसुत्री एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम  "

दिनांक ४ सप्टेंबर २०२२
विदर्भात मागील सात दिवसात १६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुर्देवी घटना समोर आल्या असुन यामध्ये मागील चार दिवसात ११ आत्महत्या समोर आल्या असुन तसेच एकट्या यवतमाळ जिल्ह्याचा मारेगाव तालुक्यात ४८ तासात ६ शतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत त्यांची यादीच कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी  सरकारला सादर केली आहे ती खालीलप्रमाणे आहे ,


१. संतोष चव्हाण रा. चिल्ली ता. महागाव जिल्हा यवतमाळ 

२. गजानन जाधव रा. आजनगाव ता.आर्वी जिल्हा वर्धा 

३. जियालाल राऊत रा. पारडी ता. लाखांदूर जिल्हा गोंदीया 

४. अजय टोपे रा.मलंपाडी ता. एटापल्ली जिल्हा गडचिरोली 

५. गिरधारी भेंडारकार रा. ता.सडकर्जूनी जिल्हा भंडारा 

 ६. अनिल ठाकरे रा. लाकठू ता.धारणी जिलखा अमरावती 

७.विनायक दुधे रा. ता. नेर जिल्हा यवतमाळ 

८. शिवदास वानखेडे रा. उडखेड ता.मोर्शी जिल्हा अमरावती 

९.विजय रोखडे रा.नवेगाव पेट ता.चिमूर जिल्हा चंद्रपूर 

१०.प्रल्हाद दमाहे रा.नवेगाव ता.व जिल्हा गोंदिया ,या शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर आली आहेत 

११. पुंडलीक रुयारकर रा. गदाजी  बोरी तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ 

१२ सतीश वासुदेव बोथले  रा म्हैस दोड़का तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ 

१३ . गजानन नारायण मुसळे  रा नरसाला तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ 

१४. सचिन सुभाष बोढेकर रा रामेश्वर तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ 

१५ . हरिदास सूर्यभान टोनपे शिवणी धोबे तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ 

१६ . तोताराम अंगत चिचुलकर  रा दांडगांव तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ 

विदर्भात पहिल्या आठ महिन्यात विक्रमी १०३२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

यावर्षी आजपर्यंत सर्वात जास्त आत्महत्या २००६ मध्ये १२३१ झाल्या होत्या मात्र २०२२ मध्ये हा आकडा जर अशाच आत्महत्या दररोज होत राहिल्या तर १५०० च्या जाणार हे निश्चित असुन याला सतत अतिवृष्टी नापिकी उत्पादनात झालेली घट व प्रशासकीय धोरण ,उदासीनता प्रचंड भ्र्ष्टाचार कारणीभुत असुन ,आपण २ सप्टेंबरला  यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव  तालुक्यात म्हैसदोडका ,नरसाळा ,रामेश्वर ,गदाजी बोरी येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना भेट दिली असता त्यावेळी या घरांना प्रशासन ,पोलीस ,कृषी ,ग्रामविकास ,आरोग्य सारख्या विभागाचा जिल्ह्यापासून तालुका पातळीचा एकही अधिकारी पोहचला नव्हता तसेच दौऱ्याच्या वेळही उपस्थित नव्हता यावरून शेतकरी आत्महत्या विषयी अधिकारी किती उदासीन आहेत हे दिसते अशी खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे . सरकारने मदत जाहीर केली मात्र एकही शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही ,कर्जमाफीचा लाभ सुद्धा मिळालेला नाही ,अन्न -आरोग्य -शिक्षण सुरक्षा मिळत नसल्याच्या तक्रारी सर्वानी केल्या . गावात कृषी सहायक ,तलाठी ,ग्रामसेवक ,आरोग्य सेवक ,शाळेचे शिक्षक कोणीही गावात राहत नाहीत व महिन्यातुन एक दिवस वा दोन दिवस येत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी किशोर तिवारी यांना यावेळी  केल्या . 

शेतकरी मिशनने सरकारला दिला "पंचसुत्री एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम  "
२०२१ च्या दुष्काळी वर्षातच विदर्भात ११८० कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर आली होत्या मात्र २०२२ मध्ये हे आत्महत्या सत्र सततची पुरबुडी अतिवृष्टी नापिकी शेती वाढलेला खर्च यामुळे प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करणार असा प्रण घोषित केल्यामुळे विदर्भातील आत्महत्यांचे पीक व दररोज होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी "पंचसुत्री एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम " शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सादर  केला असुन यामध्ये 
१. लागवडीचा खर्च ,शेतीमालाचा भाव ,जमीन व पाण्याचे पुनर्जीवन ,उत्पादकता .बियांचे स्वातंत्र्य 
२. पीक पद्धती व अन्न ,डाळी ,तेलबीया या पिकांचे नगदी पिकांच्या ठिकाणी नियोजन व त्यासाठी अनुदान 
३. सहज मुबलक पतपुरवडा धोरण 
४. नुकसान भरपाई शेतकरी यांना वाचविणारी पीकविमा योजना 
५. प्रशासकीय ,राजकीय ,सामाजीक भ्रष्टाचाराचे ग्रामीण भागातून निर्मुलन 

या पाच मुद्दयांवर एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम सरकारने प्रायोगिक तत्वावर सर्वात जास्त आत्महत्या होत असलेल्या अमरावती ,यवतमाळ जिल्ह्यात लागू करावा अशी मागणी किशोर तिवारी केली असुन जोपर्यन्त लागवडी खर्च कमी होत नाही ,नवीन विकसित तंत्र ,जमिनीचे आरोग्य ,पाण्याचे नियोजन व त्याचे आरोग्य दुरुस्त होत नाही तोपर्यंत उत्पादकता वाढणार नाही त्यावर सर्वात पहिले काम करण्याचे शेतकरी मिशनने सुचविले आहे .पीक पद्धती व अन्न ,डाळी ,तेलबीया या पिकांचे नगदी पिकांच्या ठिकाणी नियोजन व त्यासाठी अनुदान यावर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी करीत सहज मुबलक पंचवार्षिक पतपुरवडा देणारे  धोरण  तसेच सततची नापीकी पुरबुडी दुष्काळ यासाठी नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या हिताची असणे गरजेचे झाले आहे यावर सुधारणा करून शेतकऱ्यांचे प्राण वाचविणारी पीकविमा योजना ताकाला लागू करण्याची सूचना शेतकरी मिशनने  केली आहे . 
सध्या सुरु असलेला अनियंत्रित प्रशासकीय ,राजकीय ,सामाजीक भ्रष्टाचारामुळे ग्रामीण विदर्भातील आर्थीक ,मानसिक ,शारीरिक ,आध्यत्मिक ,सामाजिक आरोग्य पूर्णपणे बिघडले असुन गावापासून दिल्ली -मुंबई पर्यंत लोकप्रतिनिधी व सर्वच स्तराचे अधिकारी -कर्मचारी सरकारी पैशाची लूट करीत आहेत त्यामुळे आर्थीक ,मानसिक ,शारीरिक ,आध्यत्मिक ,सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत जर यावर तात्काळ नियंत्रण झाले नाही तर आज आत्महत्या करणारे युवा शेतकरी ग्रामीण जनता या तिजोरीच्या लुटीच्या भागीदारांचे मुडदे पाडतील असा इशारा किशोर तिवारी यांनी आपली "पंचसुत्री एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम "मध्ये दिला आहे . 

===============================================================



No comments: