शेतकरी पॅकेजमधील भ्रष्टाचाऱ्याच्या पंतप्रधान मनमोहन सिंगांचे आदेश-सकाळ वृत्तसेवा
Monday, August 02, 2010 AT 12:00 AM (IST)
http://www.esakal.com/esakal/20100802/4689045898211056923.htm

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आर्थिक संकटात सापडलेला विदर्भातील शेतकरी आत्महत्या करू लागला. त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 1 जुलै 2006 रोजी विदर्भातील आत्महत्याग्रस्त 6 जिल्ह्यांसाठी तीन हजार 750 कोटी रुपयांचे, तसेच राज्य शासनाने ऑक्टोबर 2006 मध्ये एक हजार 75 कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले होते. या पॅकेजमधील 25 टक्के रक्कम शेती औजारे व बियाणांवर, तर 75 टक्के रक्कम सिंचनावर खर्च करण्यात आला. परंतु, सिंचनाची कामे मजुरांकडून करण्याचे आदेश असताना, ती कामे कृषी विभागाने यंत्राद्वारे करून घेतली. यात अधिकाऱ्यांनी मजुरांची खोटी नावे व खोट्या सह्या करून प्रचंड भ्रष्टाचार केला होता. या घोटाळ्याबाबत विदर्भ जनआंदोलन समितीने खासदार हंसराज अहीर यांना माहिती दिली.
श्री. अहीर यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन त्यांना शेतकरी पॅकेजमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत माहिती देऊन सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे पंतप्रधानांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
No comments:
Post a Comment