हिवाळी अधिवेशनाच्या धामधुमीत विदर्भात ४० शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या :दुष्काळाने मरण झाले स्वस्त नेते मात्र भोजनावळीत मस्त
यावर्षी दुष्काळामुळे शेतकर्यांचे मरणच स्वस्त झाले आहे. हातचे पीक गेल्याने शेतकरी देशोधडीला लागले आहेत. सततची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे हताश शेतकरी टोकाचे पाऊल उचलत मरणाला कवटाळत आहेत.एकीकडे सरकार हजारो कोटीचे पैकेज व पैकेज देत आहे तर दुसरीकडे उपासमारीला तोंड देत असलेले दररोज दोन दुष्काळग्रस्त शेतकरी चालु अधिवेशनाच्या पहिल्या दोन आठवड्यात आपली जीवन यात्रा आत्महत्या करून संपविली आहे अशा ४० शेतकऱ्यांची नावे विदर्भ जनांदोलन समितीने दिली असुन आज पर्यंत सत्ताधारी वा विरोधकांचा एकही नेता यांच्या दारावर गेला नसुन मात्र हे सारे नेते या दरम्यान विदर्भ दर्शन व भोजनावळीत मग्न असल्याचा आरोप शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे .
विदर्भात अधिवेशन दरम्यान आत्महत्या केलेल्या शेतकय्रांची यादी
अ.क्र नाव गाव तालुका जिल्हा
१) संदीप मारोतराव नागले घाटलाडकी चांदुरबाजार अमरावती
२) श्रीकृष्ण मनिराम मडावी रामपुर अकोट अकोला
३) आप्पाजी निनावे बपेरा भंडारा भंडारा
४) राजु उकंडराव सोंगे वाईगौळ मानोरा वाशिम
५) सुरेंद्र भिमराव निकम चमक परतवाडा अमरावती
६) प्रभाकर निसन भोसले केकतपुर अमरावती अमरावती
७) शैलेश दत्तु थेरे बामर्डा मारेगांव यवतमाळ
८) तात्याजी उध्दव सोनुले नवरगांव मारेगांव यवतमाळ
९) सुरेश जयसिंग जाधव साखरा दिग्रस यवतमाळ
१०) हंसराज उकंडराव भगत घारफळ बाभुळगांव यवतमाळ
११) पांडुरंग तानबा हिवसे खराडी भंडारा भंडारा
१२) नामदेव आकाराम खंडारे माधान चांदुरबाजार अमरावती
१३) कचरु डोमाजी तुपसुंदरे रामपुर धामणगांव रेल्वे अमरावती
१४) वामन संपत राउत चांडोळ बुलढाणा बुलढाणा
१५) उमाशंकर विश्वनाथ काटकर अंजनी लोणार बुलढाणा
१६) केशव जंगलु चौधरी बोरगांव कळमेश्वर नागपुर
१७) रेवनाथ जयराम बारसागडे नगरी गडचिरोली गडचिरोली
१८) सचिन भुजंगराव राऊत सिरजगांव चांदुररेल्वे अमरावती
१९) तुकाराम बाबुलाल चव्हाण भोपापुर दारव्हा यवतमाळ
२०) सुरज अशोक भोयर अंजी घाटंजी यवतमाळ
२१) मोरेश्वर भारत चौधरी दहेली घाटंजी यवतमाळ
२२) तुसळाबाई रामचंद्र मुन पार्डी कळंब यवतमाळ
२३) शैलेश विठ्ठल बोभाटे खापरी वर्धा वर्धा
२४) संजय पंडीत थोरात येडशी वाशिम वाशिम
२५) हाजुसिंग रामचंद्र पवार वरंदळी दिग्रस यवतमाळ
२६) दिपक मनोहर झाडे पहेलानपुर सेलु वर्धा
२७) बंडु विठोबा डहाळकर वाढोणाबाजार राळेगांव यवतमाळ
२८) जगन कसनदास चव्हाण भिवापुर चांदुररेल्वे अमरावती
२९) दिनेश शंकरलाल जयस्वाल कोथळी मोताळा बुलढाणा
३०) शंकर उध्दव चौधरी साखरा वणी यवतमाळ
३१) गजानन नथ्थुजी धवस कुर्ली वणी यवतमाळ
३२) निळकंठ रागो लेडांगे टाकळी वरोरा चंद्रपुर
३३) रुपेश अशोक धवणे फाळेगांव बाभुळगांव यवतमाळ
३४) राष्ट्रपाल ढोरे काचनगांव हिंगणघाट वर्धा
३५) रामदार किसन मेश्राम शेंदुरजनाबाजार तिवसा अमरावती
३६) श्रीकृष्ण देवसा गुजर माळशेलु मंगरुळपिर वाशिम
३७) रामदेव बळीराम चेपटकर वाघोडा पारशिवणी नागपुर
३८) शरद डोमाजी कावडे चिखली राळेगांव यवतमाळ
३९) सुनिल श्रीराम युवनाते अंबोरा कारंजा घाडगे वर्धा
४०) मोतीराम किसन अढाव पातुर्डा संग्राणपुर बुलढाणा
विदर्भात दररोज दोन मराठवाड्यात दररोज तीन शेतकरी आत्महत्या करीत असताना दिल्लीचे सरकार मात्र महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या कमी झाल्या असा दावा करीत आहे हा प्रकार तर शेतकऱ्यांना अधिक निराश करणारा आहे एकीकडे सरकारने कर्ज वसुली रोखली असल्याचा दावा केला आहे तर याउलट बँकांचे कर्मचारी गावांगावात मध्ये नोटीस घेऊन फिरत आहे. कर्मचार्यांनाही शेतकर्यांच्या परिस्थितीची जाणीव आहे. परंतु त्यांचाही नाईलाज आहे. वरिष्ठ अधिकारी मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही.
शेतकर्यांना दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका बसत आहे. सुरूवातीला अतवृदष्टी. गारपिट आणि नंतर यावर्षीखरिपात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्यांच्या हातात काहीच लागले नाही. त्यातच जे पीक आले त्यांना भावच मिळत नाही.
दुबार-तिबार पेरणी करूनही अपुरा पाऊस आल्याने संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. गतवर्षी ज्यांना १०० पोते सोयाबीन झाले त्यांना यंदा दोन क्विंटलही सोयाबीन झाले नाही. महागडे बियाणे, निंदण, खुरपण करून पीक शेतात बहरले होते. मात्र किडी आणि दुष्काळी परिस्थितीने संपूर्ण शेत उद्ध्वस्त झाले आहे. आता या शेतकर्यांना बँका त्रस्त करून सोडत आहे. अनेकांनी पेरणीसाठी पीक कर्ज घेतले होते. काहींनी ट्रॅक्टर तर काहींनी मोटरसायकलसाठी कर्ज घेतले होते. परंतु दुष्काळी परिस्थितीने कर्ज फेडू शकले नाही. बँकांनी आता वसुली मोहीम सुरू केली आहे.
कापसाला खासगी व्यापारी अतिशय कमी भावात मागत आहेत आणि अत्यल्प उत्पादन झालेला कापूस बाजार समितीत नेणे खर्चाला परतवडत नाही. अशातच वसुलीच्या तगाद्यापोटी शेतकर्यांना काय करावे, सुचेनासे झाले आहेत. बँकेचे वसुली अधिकारी म्हणतात, आम्हाला वसुलीचे टारगेट आहे. त्यामुळे आता शासनाने किमान ही वसुली तरी थांबवावी, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे .
No comments:
Post a Comment