'शेतीमालाला भाव व शेतीसाठी पैसा ' द्या -सिंचनसुविधा असलेल्या शेतकरी विधवा सासु -सुनेची सरकारला मागणी -नवाकाळ
यवतमाळ पासून फक्त ३० किलोमीटर असलेल्या बारमाही सिंचनाची दहेली या गावात अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळी पैकेज घोषणा करीत होते त्याच वेळी मोरेश्वर चौधरी या ३२ वर्षाच्या युवा शेतकऱ्याने आपला कापुस मातीमोल किमतीत विकल्यानंतर आपल्या वडिलांच्या २००७ मध्ये पाऊलावर पाऊल ठेवत या खेड्यातील १७ वी शेतकरी आत्महत्याची नोंद केली मागे आपली २५ वर्षाची पत्नी व तिच्या पोटात असलेला ५ वर्षाचे बाळ तर अंगावर असलेले तिड वर्षाचे मुल सोबत निराधार विधवा आईला कीटकनाशक घेऊन निरोप दिला आणी काही प्रश्न मोरेश्वरने मागे सोडले ज्या खेड्यात सर्व शेतकरी वर्षाला खरीप व रब्बीचे पिक लगतच्या साईखेडा धरणाच्या मुबलक पाण्याने घेत आहेत त्या खेड्यात मागील ७ वर्षात १७ शेतकऱ्यानी सतत कर्जाचे ओझे वाढल्याने का आत्महत्या असा प्रश्न सर्वाना निर्माण होत परंतु लागवडीचा खर्च व शेतीमालाला भाव सोबत बँकाकडून न मिळणारे पीककर्ज याचा विचार सरकार का करीत नाही मोरेश्वरची विधवा योगिता सरकारला करीत आहे .
सध्या अख्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांची लाट आली आहे त्यांच वेळी सालाबादप्रमाणे पैकेज पिक सुद्धा आले मात्र शेतकरी आत्महत्या काही करून कमी होत नसुन आता पुन्हा त्यावर चर्चा व उपाय यावर वातानुकुल खोलीत बैठका व भोजनावळीची खैरात सुरु झाली आहे . पलंगावर सुपारी तोडत गांधीवादाची चर्चा करणारे शेतकरी नेते सुद्धा आपला पोटभरू उद्योग सुरु करण्याच्या तयारीला लागले आहे तर पुणे -मुंबई कडील सारे ngo सार्थकी लावण्यास मंत्र्यालयात गर्दी करीत आहेत मात्र याच वेळी भाजपचे केंद्राचे व राज्याचे सरकार मात्र आपले निवडनुकीचे सर्व आश्वासने विसरून शेतकऱ्यांना आत्महत्यांसाठी मोकळे सोडत आहे .
मागील वर्षी सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदिजीनी आपला निवडणूक प्रचार यवतमाळ जिल्यातील दाभाडी येथून सुरु केला व शेतकरी आत्महत्यांचे प्रमुख तीन कारणे समोर मांडली एक शेतकर्याना कृषीउपजला भाव मिळत नाही दुसरा शेतकऱ्यांची बँकाची पत संपली आहे व खाजगी सावकार त्यांना लुटत आहेत व तिसरे प्रमुख कारण म्हणजे शेतकऱ्यांची पिक पद्धती . या तीन शेतकरी आत्महत्यांच्या कारणाचा व सोबतच हमीभाव देण्यासाठी लागवड खर्च अधिक ५०% टक्के नफा ,पिक कर्ज माफी ,कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी परवडणारी पिक पद्धती देण्याचे आश्वासन वारंवार दिले मात्र जशी सत्ता आली तसाच आत्महत्यांचे प्रमुख तीन कारणे बदलून नवीन दोन कारणे केंद्र व राज्य सरकारने शोधुन काढली त्या एक शेतकऱ्यांना पाणी व वीज न मिळणे हेच दोन गोष्टी असुन हमीभाव ,पिककर्ज व चुकीची पिक पद्धती हे मुद्देच नाहीत अशी उलटकोलांटी भाजपने घेतल्याने कृषी संकट भीषण झाले आहेत .
अख्या महाराष्ट्राच्या विदर्भ ,मराठवाडा ,खानदेश व उत्तर महाराष्ट्राच्या ९० लाख हेक्टर कोरडवाहू क्षेत्रामधील एकमात्र नगदी पिक कापुस ,सोयाबीन ,तुर व धान पुर्णपणे निसर्गाने दगा दिल्याने बुडाले असून मागील ५० वर्षात सर्वात कमी उत्पन झाले असुन अभूतपूर्व दुष्काळाचा सामना ग्रामीण भागातील ३ कोटी जनता करीत असुन यांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे यांना तात्काळ अन्न सुरक्षा द्या ,जगण्यासाठी मदत द्या , लागवड खर्च अधिक ५०% टक्के नफा असा मोदींच्या आश्वासनाचा हमीभाव कापसाला व सोयाबीन द्या व त्यावर सरकारी संकलन केंद्र मार्फत खरेदी सुरु करा अशी कळकळीची मागणी विदर्भाच्या शेतकरी करीत आहेत मात्र सरकार त्यांना पुढील १० वर्षाचा दुष्काळमुक्तीचा मार्ग देत आहे यावर विचार व्हावा . महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांची कारणे सिंचन व वीज अशी ओरड करणाऱ्यांना दहेली आमंत्रित करीत आहे त्यांना एकदा दहेलीला यावे
किशोर तिवारी
विदर्भ जनांदोलन समिती
०९४२२१०८८४६
No comments:
Post a Comment