Wednesday, July 8, 2015

भीमकुंडचे पूरग्रस्तांचे पुनर्वसनाच्या प्रस्तावावर २ वर्षांपासून बसलेल्या पुनर्वसनखात्याचा प्रधानसचिवाला राज्य मानवाधिकार आयोगाची नोटीस


भीमकुंडचे पूरग्रस्तांचे पुनर्वसनाच्या प्रस्तावावर २ वर्षांपासून बसलेल्या पुनर्वसनखात्याचा    प्रधानसचिवाला राज्य मानवाधिकार आयोगाची नोटीस  
दिनांक -९ जुलै २०१५
दोन वर्षापूर्वी  २०१३च्या  ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे संपूर्ण भीमकुंडचे शेतकरी व शेतमजूर अभयारण्याच्या पायथ्याशी असलेल्या शासकीय जमिनीवर राहण्यासाठी गेल्यावर सरकारने सर्व कुटुंबांना पट्टे  वीज व पाणी देण्याचे आश्‍वासन २४ महिन्यापूर्वी दिले होते मात्र सतत पाठपुरावा करूनही सरकारने पुनर्वसन न केल्यामुळे भीमकुंड पुरग्रस्तानी १२ मार्चला २०१४ रोजी विदर्भ जनांदोलन समितीचे किशोर तिवारी यांच्या मार्फत राज्य मानवाधिकार आयोगाकडे सरकारविरुद्ध दाद मागितली होती व या याचिकेची सुनावणी सोमवारी ७ जुलै  रोजी राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती  बुन्नरमठ यांचे समोर  अमरावती येथे  घेण्यात आली व यवतमाळ जिल्याचे युवा जिल्हाधिकारी एस पी सिंग यांनी सरकारतर्भे  शपथपत्र सादर करून जिल्यास्तरांवरील समस्या पाणी व वीज पुरवठा देण्याचे काम अंतिम   टप्प्यात असुन मागील दोन वर्षापासून पूरग्रस्तांना महसूल जमिनीचे पट्टे देऊन त्यांचे सर्व सुविधासह  पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव मंत्रालयात पुनर्वसन खात्याचे प्रधान सचिव यांचेकडे धूळ खात पडला असल्याची माहिती देंण्यात आल्यावर  राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती  बुन्नरमठ यांनी याची गंभीर दखल घेत प्रधान सचिव (पुनर्वसन ) यांना नोटीस बजावून जातीने हजर राहून तात्काळ शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले व  पुढची सुनावणी मुंबई येथे ठेवण्यात आली आहे . 

यावेळी यवतमाळ जिल्याचे युवा जिल्हाधिकारी एस पी सिंग यांच्या चमूने विषेय प्रयन्त करून पिण्याच्या पाण्याची व वीज पुरवठा देण्यासाठी वेगळा ट्रान्सफार्मर  लावल्याबद्दल  राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती  बुन्नरमठ यांनी भीमकुंडचे सरपचं माणिक गेडाम यांनी मांडला व उपसरपंच व्यंकटेश सोटपेल्लीवार  यांना विचारून चांगल्याकामाचा  उल्लेख आपल्या आदेशामध्ये केला मात्र महसूल जमिनीवरचे झाडे व कायमस्वरूपी पट्टे मिळण्यासाठी सरकारकडे  पाठपुरावा करण्यास सुद्धा सांगितले . किशोर तिवारी यांनी पिण्याचे पाणी आणण्यासाठी वीषेय प्रयन्त बी डी ओ मानकर व तात्काळ वीज  ट्रान्सफार्मर  लावल्याबद्दल वीज कंपनीचे अधिशक अभियंता  कोंडावार यांचा उल्लेख  यावेळी केला व जिल्हाधिकारी एस पी सिंग विषेय बैठक बोलावून सर्व समस्या येत्या दिवसात पूर्ण करण्याचे हमी दिल्याची माहीती सुद्धा राज्य मानवाधिकार आयोगासमोर  मांडली 

राज्य मानवाधिकार आयोगाच्या समोर भीमकुंडवासी  किरण कोलवते, गजानन मामीडवार, नारायण रेड्डीवार, विठ्ठल गावंडे, गणपतराव कन्नलवार, बालू प्रतापवार, बाळासाहेब कन्नलवार, रमेश पाटील, अतुल नगराळे, नाना नगराळे, नाना अगरुलवार, कृष्णा मारपवार, किष्टन्ना मॅकलवार, अशोक मॅकलवार, दत्ता गेडाम, कमलाबाई नैताम, किष्टाबाई गोपावार, गंगाबाई शर्लावार, वासुदेव नैताम, समितीचे सचिव मोहन जाधव, अंकीत नैताम, सुरेश बोलेनवार, नितीन कांबळे, नंदू जयस्वाल, संतोष नैताम, भीमराव नैताम हे सहभागी झाले होते.

No comments: