Sunday, July 19, 2015

विदर्भात आणखी सहा शेतकरी आत्महत्या: जुलै महिन्यात विदर्भात ३८ एकट्या यवतमाळ जिल्यात १४ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा


विदर्भात आणखी सहा शेतकरी आत्महत्या: जुलै महिन्यात विदर्भात ३८ एकट्या यवतमाळ जिल्यात १४ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा 

दिनांक :१९ जुलै २०१५
जुलै महिन्यात पाऊसाने दगा दिल्यानंतर आता विदर्भात दुबार पेरणीचे संकट अधिकच भीषण झाले आहे. मागील १५ दिवसापासून दर आठ तासाला एक कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करीत आहे. मागील ४८ तासांत आणखी सहा  शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. यामध्ये यवतमाळ जिल्यातील बोरीअरब चे श्रीकृष्ण इंगळे  ,  टाकळीचे  भाऊराव बंडेकर व बिटरगावचे राजाराम भलगे या तीन शेतकऱ्यांचा तर वाशीम जिल्यातील काक येथील महिला शेतकरी दुर्गाबाई देशमुख व मुंगडा येथील संदीप शेळके या दोन शेतकऱ्यांच्या व अमरावती  जिल्यातील पापडचे अजय खाप्रीकार यांचा समावेश असुन जुलै महिन्यातच विदर्भात ३८ तर एकट्या यवतमाळ जिल्यात १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत यापुर्वी जुन महिन्यात सुद्धा यवतमाळ जिल्यात १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची सरकारी नोंद असून यात जुलै महिन्यात यवतमाळ जिल्ह्यातील वाटखेड गावात एका पाठेपाठ एक दोन आत्महत्या झाल्या. या शेतकर्‍यांना पेरणी बुडाल्यानंतर बँकांनी तर कर्ज दिले नाही; मात्र बाजारातूनही दमडीही मिळाली नव्हती. यावर्षी विक्रमी ८२५ शेतकरी आत्महत्यांची विदर्भात नोंद झाली आहे. सरकारने तत्काळ मदत व पीककर्ज माफी घोषित केली नाही, तर मोठय़ा प्रमाणात आत्महत्या होणार असल्याची भीती विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी व्यक्त केली. शेतकरी आत्महत्यांचे राजकारण बंद करण्याची मागणीही तिवारी यांनी केली आहे. 
सध्या राष्ट्रयीकृत बँका शेतकर्‍यांना दारातही उभे करीत नसून आतातर भारत सरकारच्या वतीने   केंद्रीय वित्त सचिव डॉ. हसमुख अढिया यांनी ८ जुलै रोजी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना पत्र लिहून राष्ट्रयीकृत बँकांना पीककर्ज वाटपासाठी महाराष्ट्र सरकारने  सक्ती करू नये, अशा सूचना राज्यातील जिल्हा दंडाधिकार्‍यांना देण्याबाबत सुचविले आहे यामुळे  राष्ट्रयीकृत बँका मस्तवालपणे  शेतकऱ्यांना नकार देत आहे व बँकाविरुध्द   कारवाई करू अशी ओरड करणारे भाजप सरकारचे मंत्री आता यावर बोलण्यास तयार नाही ,ही शोकांतिका आहे ,या शेतकरी आत्महत्या विदर्भाच्या कृषी संकटाची फक्त एक चाहूल असुन स्मार्टसिटी व मेट्रोरेलचा विकासाचा नारा देणाऱ्या सरकारला एक इशारा असून त्यांनी आपली धोरणे शेतकरी व गरिबाला समोर ठेऊन बदलावी अशी मागणी तिवारी यांनी केली आहे .

विदर्भ जनआंदोलन समितीने जुलै महिन्यात आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांची यादीच माध्यमांना दिली. ती अशी आहे : दिनेश धोंडे पोरगव्हान वर्धा, संतोष चटुले शेंदूरजना, अमरावती, पांडुरंग मडावी वाटखेड, यवतमाळ , अमोल वायले शिरसगाव, यवतमाळ, श्यामराव कोराडे भिवापूर, अमरावती, सतीश सिद्धराम गोहद, वर्धा, मारोतराव येटरे पांढरी, यवतमाळ, हरिहर करडे देऊळगाव, अकोला, नारायण ठाकरे पिंपळ विहीर, अमरावती, मौह्मद अखिल सौदागर काटपूर, अमरावती, प्रकाश चव्हाण कंधारी, यवतमाळ, अंतराम टेकाम आलेन्दूर, भंडारा, सतीश पोखले रोहीखेड, बुलढाणा, मनोहर वाटखुळे पवनार, वर्धा, यादव जीवतोडे शेम्बळ, चंद्रपूर, रामराव नैताम वाटखेड, यवतमाळ, पुडलिक उखाडे किन्ही, यवतमाळ, रामचंद्र कुम्बलकर वडनेर, वर्धा, रघुनाथ इंगळे खालेगाव, बुलढाणा, मांगीलाल आडे मनोरा, वाशीम देवीदास तायडे अहमदाबाद अमरावती, बळीराम भाटकर, मोरझडी, अकोला, शालिक गेडाम वाठोडा, यवतमाळ, विलास गावंडे कलाशी अमरावती, देवीदास केट धनज, वाशिम, बापूराव झाडे रावेरी यवतमाळ, रामेश्‍वर जामनिक कलाशी, अमरावती, पुंडलिक सुकलकर दाभा पहूर यवतमाळ, प्रमोद गावंडे उटी यवतमाळ, मनोहर कलंगी सलाई वर्धा, आनंदा राठोड बोथबोडण यवतमाळ, गणेश वाघ पेणटाकली बुलढाणा ,यवतमाळ जिल्यातील बोरीअरब चे श्रीकृष्ण इंगळे  ,  टाकळीचे  भाऊराव बंडेकर व बिटरगावचे राजाराम भलगे या तीन शेतकऱ्यांचा तर वाशीम जिल्यातील काक येथील महिला शेतकरी दुर्गाबाई देशमुख व मुंगडा येथील संदीप शेळके या दोन शेतकऱ्यांच्या व अमरावती  जिल्यातील पापडचे अजय खाप्रीकर या  ३८ शेतकर्‍यांनी जुलै महिन्यात आत्महत्या केल्या.
विदभार्तील ३० लाख शेतकर्‍यांनी पेरणी केली असून फक्त जेमतेम पाच लाख शेतकर्‍यांना बँकांनी नवीन पीककर्ज दिले. खागी सावकारांकडून व खुल्या बाजारातून सुमारे २० लाख हेक्टरमधील केलेली पेरणी हातातून जात असल्यामुळे निराशेत शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सरकारने पीककर्ज माफी न देण्याचे व तसेच कापसाची व सोयाबीनची फक्त १०० रुपये व ५० रुपये केलेल्या हमीभावाच्या घोषणेमुळे अचानक शेतकरी आत्महत्यांची नवी लाट आली आहे. या सर्व शेतकरी आत्महत्या सरकारच्या चुकीच्या धोरणाचे बळी असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे.

No comments: