विदर्भात पुन्हा दुष्काळाचे सावट - सरकारच्या उदासीनतेमुळे जुलै महिन्याच्या १६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
दिनांक -१२ जुलै २०१५
विदर्भात कापूस कापूस सोयाबीन उत्पादक जिल्यात जुन महिन्यातील पेरणी पावसाने मागील २० दिवसाने दडी दिल्याने बुडाल्यामुळे जुलै महिन्याच्या सुरवातीलाच १६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर आल्याअसुन सरकार फक्त घोषणांचा पाऊस पाडत असुन दुबार पेरणीग्रस्त कर्जबाजारी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असुन जर येत्या एक दोन दिवसात पाऊसाने व सरकारने कृपा केली नाही तर विदर्भातील २० लाख एकरातील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार अशी भीती शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे .
मागील तीन दिवसात विदर्भात ९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून यात यवतमाळ जिल्यातील वाटतखेडचे रामराव नैताम व किन्हीचे पुंडलिक उघाडे तर वर्धा जिल्यातील पवनारचे मनोहर वाट्खुळे व वडनेरचे रामचंद्र कुंभलकर , बुलढाणा जिल्यातील खाळेगावचे रुघुनाथ इंगळे ,अमरावती जिल्यातील अमदाबाद गावचे देविदास तायडे ,वाशीम जिल्यातील मनोरा येथील मांगीलाल आडे तर अकोला जिल्यातील मोरझाडी येथील बळीराम भटकर व चंद्रपूरचे शेम्बळ येथील यादव जीवतोडे याचा समावेश आहे .यापुर्वी याच जुलै महिन्यात यवतमाळ जिल्यातील ४ तर अमरावती व वर्धा जिल्यातील प्रत्येकी दोन शेतकऱ्यांनी आत्म्हत्या केल्याचे घटना समोर आल्या होत्या यामध्ये यवतमाळ जिल्यातील वाटखेड येथील आदीवासी शेतकरी पांडुरंग मडावी ,पांढरीचे मारोतराव एटरे ,शिरसगावचे अमोल वहिले , टाकळी येथील महीला शेतकरी गुजाबाई मडावी तर अमरावती जिल्यातील शेन्दुर्जाना संतोष चतुले व भिवापुरचे श्यामराव कोकार्डे आणी वर्धा जिल्यातील पोरगव्हाणचे दिनेश भोंडे व गोह्दाचे सतीश सिदराम यांचा समावेश असुन यावर्षी एकट्या विदर्भात ८१२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असुन ,एकीकडे शेतकरी विक्रमी संख्येत आत्महत्या करीत आहेत तर सारे सरकार सत्कार स्वागत विदेशवारी मध्ये गुंतले असल्यामुळे मस्तवाल अधिकाऱ्यांच्या नाकार्त्यामुळे हवालदील शेतकरी मरत असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे .
सरकारने शेतकऱ्यांना पिककर्ज देण्याचे वा दुबार पेरणीग्रस्तांना बियाणे देण्याचे सर्व आश्वासने हवेत विरली असून एकीकडे सहकारी बँकांना निधी दिल्याची घोषणा होत मात्र आतापर्यंत सहकारी बँकांनी थकितकर्जाचे पुनर्वसन केले नसुन नवीन पिककर्ज वाटप सुरु होत नसुन सहकार मंत्री चक्क झोपले आहेत ,मागील वर्षी विदर्भाच्या ५० लाख कर्जबाजारी व दुष्काळग्रस्त असल्यामुळे या शेतकऱ्यांमधून फक्त २० टक्के मागील वर्षीच्या २०१४-१५ थकितदारांना पीककर्ज पुनर्वसन योजनेचा लाभ मिळाला असुन मागील तीन वर्षापासून सतत नापिकी ,दुष्काळ व अतिवृष्टीचा मार बसणारे ४० लाख तणावग्रस्त शेतकरी नवीन पिककर्जा पासुन वंचित राहिले आहे त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्व शेतकऱ्याने १५ जून पर्यंत नवीन पीककर्ज मिळणार अशी सरकारची घोषणा हवेत विरली असून आता मागील तीन वर्षापासून सतत नापिकी ,दुष्काळ व अतिवृष्टीचा मार बसणारे थकितदार ४० लाख तणावग्रस्त शेतकरी यांनी काय करावे यावर सरकारने बोलावे एकीकडे मुख्यमंत्री कर्जमाफीचा विचार चालू आहे अशी पुंगी सोडतात तर अर्थमंत्री सुधीर मूनगणट्टीवार सातबारा कोरा करता येत नाही कारण तिजोरी रीकामी आहे असा हवाला देतात या सरकारने विदर्भाच्या कृषी संकटाचा व शेतकरी आत्महत्यांचा गांभीर्य गमावले असुन सरकारच्या उदासीनतेमुळे जास्त शेतकरी मरत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे . यावर्षी सर्व २०१२-१३,१३-१४,व १४-१५ चे थकित पीककर्ज ,मध्यम मुदतीचे सर्व प्रकारचे कृषी कर्ज व तारण कर्ज यांचे पुनर्वसन करण्याची मागणी शेतकरी करीत असून नौकरशाहीच्या समोर शरणागती घेतलेल्या सरकारने यावर जाणून बुजून मौन धारण केले आहे यामुळे येत्या महिन्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती तिवारी व्यक्त केली आहे
जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा करण्यात येत असुन नाले खोदून व जमिनीत ओलावा आणल्याने महाराष्ट्राचे कृषी संकट संपणार ही सरकारची दिवाळखोरी असून यावर्षी बारमाही सिंचनाची सोय असणार्या हजारो शेतक र्यांना कापूस, सोयाबीन , धानाला व तुरीला भाव न मिळाल्यामुळे झालेले नुकसान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहावे व ९० टक्के शेतकरी बँकेचे थकबाकीदार आहेत, लाखो शेतकरी आर्थिक संकटामुळे मुलींचे लग्न, मुलांचे शिक्षण, आजारांवर उपचार करण्यास दमडीही नाही,अन्न व चारा याची सोय सुद्धा नाही व अतिशय अडचणीत असलेले शेतकरी मायबाप सरकार मदतीला येईल, अशी भोळी आशा करणार्या शेतक र्यांना नितीन गडकरी शेतक र्यांनी सरकार व देवावर आता मदतीसाठी पाहू नये तर त्याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पिककर्ज व दुष्काळग्रस्त व तणावग्रस्त मदतीचे पॅकेज मिळणार नाही, असा निरोप देतात यामुळेच मागील तीन महिन्यात शेतकरी आत्महत्या मोठय़ा प्रमाणात वाढल्या असुन याला विदर्भाचे केंद्र व राज्यातील नेतेच जबाबदार असुन हेच विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्या ह्या शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे व शेतक र्यांच्या तोट्याच्या शेतीमुळे झालेल्या कर्जामुळे होत असून आपण यावर गुंतवणूक अधीक ५0 टक्के नफा या सुत्राने कृषीमालाला आधारभूत किंमत व सर्व शेतक र्यांना नवीन कर्ज देऊ असे आश्वासन दिले होते. आता चुप का असा सवाल किशोर तिवारी यांनी केला आहे.
मागील वर्षी महाराष्ट्र सरकारने एकूण ३९ हजार ४५३ गावांपैकी २४ हजार ८११ गावे म्हणजे जवळपास ६0 टक्के गावांमध्ये पूणर्त: खरीप पीक नष्ट झाल्यामुळे दुष्काळग्रस्त जाहीर होते यामुळे ९0 लाख शेतकरी गंभीर दुष्काळाच्या प्रभावात असून जागतिक मंदीचा मार बसल्यामुळे नापिकीनंतर कापूस, तूर, सोयाबीन व दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागले आहेत आणी यावर्षीसुद्धा खरीप हंगाम तसाच जात आहे , अशा आणिबाणीच्या वेळी विदर्भाच्या शेतकर्यांनी भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांना हमीभाव वाढ, पीककर्ज मुक्ती व कोरडवाहू क्षेत्रात कमी पावसाचे पीक घेण्यासाठी अनुदान अशी तीन सुत्री असलेला एकात्मिक कार्यक्रम सादर करण्यासाठी किशोर तिवारी यांनी विनंती केली होती मात्न सरकारने हमीभाव वाढ व पीककर्जमाफी देणार नाही हे स्पष्ट केल्यामुळे तणावग्रस्त शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment