तूर, उडद, मूगडाळीवरील निर्यातबंदी उठविण्याचा निर्णयाचे शेतकरी मिशनकडून स्वागत
दिनांक -१७ सप्टेंबर २०१७
कै वसंतराव नाईक शेती स्वा मिशनचे अध्यक्ष शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी भारताचे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या विशेष संदेशात शेतकर्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने आणखी एक घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयानुसार तूर, उडद आणि मूगडाळवरील निर्यातबंदी उठविण्याचा निर्णयाचे स्वागत केले असुन गेल्या दोन वर्षांत डाळींच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. यावर्षी देशात डाळींचे उत्पादन सुमारे २०० लाख टनांवर पोहोचले आहे. मागील काही वर्षात उडदाच्या डाळीचे उत्पादन ७ ते १० लाख टन होते, ते यंदा १८ ते २० लाख टनापर्यंत पोहोचले आहे. त्याचप्रमाणेच मूग डाळीचे उत्पादनही १५ लाख टनावरून २२ ते २४ लाख टनावर पोहोचले. याच अनुषंगाने डाळींवरील निर्यातबंदी उठविण्यातआल्या मुळे डाळ निर्यात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या निर्णयामुळे शेतकर्यांना मोठा फायदा होणार असून, त्यांना चांगली किंमत मिळू शकणार असल्याचे मत किशोर तिवारी यांनी वेळी व्यक्त केली .
मागील वर्षी महाराष्ट्रात तुर डाळीचे विक्रमी उत्पादन घेतल्यानंतरही देशात पडेल भावात तुर डाळीच्या नावावर यलो बी वा पिवळे बियाणे म्हणुन ओळखल्या जाणारे तथाकथीत डाळीची प्रचंड प्रमाणात आयात केल्यामुळे व भारताची प्रोटीनचा सर्वात जास्त मात्रा असलेले व जगात प्रचंड मागणी असणाऱ्या तुरीच्या डाळीवर निर्यातीवर बंदी टाकल्यामुळे डाळीउत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान झाले होते व देशात अन्न पुरवडा व पणन मंत्रालयातील मुठभर भ्रष्ट्र अधिकारी अनियंत्रित आयात करून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करीत असल्याची तक्रार शेतकरी मिशनमार्फत किशोर तिवारी यांनी भारताचे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटुन केली होती व शेतकर्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्याद्रुष्टीने केंद्र सरकार सर्व महत्त्वाच्या घेणार असल्याचे मोदी यांनी सांगीतल्याप्रमाणे अंबलबजावणी होत असल्यामुळें तिवारी समाधान व्यक्त केले आहे .
तिवारी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की या निर्णयामुळे शेतकर्यांना मोठा फायदा होणार असून, त्यांना चांगली किंमत मिळू शकणार असून, आगामी हंगामात पेरणीलाही प्रोत्साहन मिळणार आहे. तथापि, या डाळींची निर्यात करण्यासाठी कृषी उत्पादनांना प्रोत्साहन देणार्या कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक असल्यामुळें ही अट शिथील करण्याची मागणी तिवारी यांनी केली आहे .
सध्या केवळ सेंद्रीय डाळी आणि काबुली चण्याच्याच मर्यादित निर्यातीला परवानगी आहे. पण, आता तूर, उडद आणि मूग डाळीच्या निर्यातीचा मार्गही मोकळा झाला आहे. विदेशी व्यापार महासंचालनालयाच्या मते, या तिन्ही डाळींवरील निर्यातीचे निर्बंध आम्ही हटविले आहेत. हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू झाला आहे यामुळे देशातील बाजारात डाळीचे वाढीव भाव शेतकऱ्यांच्या पदरात अशी आशा तिवारी व्यक्त केली आहे .
२००४ मध्ये तत्कालीन भाजप सरकारने विश्व व्यापार संघटनेच्या खुल्या बाजारीकरणाच्या अटीनुसार आयात निर्यातीचे धोरणावरील निर्बंध संपविल्यानंतर भारतात पडेल भावात कापसाची प्रचंड प्रमाणात आयात झाल्यामुळे कापुस उत्पादक शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र सुरु झाल्याची आठवण ताजी करीत मागील वर्षी प्रमाणे डाळीवर आधारीत उद्योगाच्या फरसाण लॉबीसमोर शरणागती न घेता तूर, उडद आणि मूगडाळवरील निर्यातबंदी उठविण्याचा निर्णयामुळे विदर्भ -मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचे हीत जोपासले जाईल अशी अपेक्षा तिवारी व्यक्त केली आहे .
No comments:
Post a Comment