Saturday, September 9, 2017

शेतकरी मिशन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची दारी :शासकीय मदत देण्याचे आदेश

शेतकरी मिशन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची दारी :शासकीय मदत देण्याचे आदेश 
दिनांक -९ सप्टेंबर २०१७
यवतमाळ जिल्हातील करंजी व सिंगलदिप येथे एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविण्याच्या वृत्ताची गंभीर दखल घेत कै वसंतराव नाईक शेती स्वा मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी भाजपचे नेते माजी जी.प . सद्यस्य रॉकेशभाऊ नेमनवार ,भाजपचे नेते डॉ बी झेड बावणे ,आदीवासी नेते अंकित नैताम ,तलसीलदार महादेवराव जोरवार , गटविकास अधिकारी मधुकरराव घसाळकर ,प्रशांतरावं बावणे ,विशालराव झोटींग यांच्या सोबत करंजी व सिगलदीप या ठिकाणी भेट देऊन करंजी येथील मोहन चव्हाण व सिंगलदिप येथील राजू टेकाम यांच्या  कुटुंबांची सांत्वना कडून त्यांच्या  अडचणींनी  विचारपुस केली . 
यावेळी मुंबईच्या ग्रँड मराठा फोंडेशन तर्फे या कुटुंबाना आर्थीक मदतीचे वाटप करण्यात आले . करंजी येथील आत्महत्याग्रस्त चव्हाण यांच्या बी एस सी चा अभ्यासक्रमात असणाऱ्या मुलीचा पुढील शिक्षणाचा संपुर्ण खर्च 
मुंबईच्या ग्रँड मराठा फोंडेशन उचलणार असल्याची माहीती संस्थेचे   रोहीत शेलाटकर  यांनी यावेळी दिली . 
करंजी येथील शेतकरी मोहन चव्हाण यांनी तणनाशकची फवारणी केल्यानंतर संपुर्ण पऱ्हाटी  चिमुन संपुर्ण खराब झाली होती व  त्यानंतर ४ एकरात ४० हजाराचे रासायनिक खत वापरूनही कोणतीही सुधारणा न झाल्यामुळें नैराश्यात गेल्याने आत्महत्या केल्याची माहीती कुटुंबीयांनी दिल्यावर किशोर तिवारी या  प्रकरणाची संपुर्ण चौकशीची आदेश उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते यांना दिले तसेच करंजी व सिंगलदिप येथील दोन्ही आत्महत्या कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या कुटुंबामधील असल्यामुळे या कुटुंबाना शासकीय मदत व संपुर्ण पिककर्ज देण्याची घोषणा किशोर तिवारी यांनी यावेळी केली 
=======================================================











No comments: