Saturday, September 9, 2017

शेतकरी मिशनची आपले सरकार केंद्र, महा ई सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटरवर भेटी

शेतकरी मिशनची  आपले सरकार केंद्र, महा ई सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटरवर भेटी 
दिनांक -९ सप्टेंबर २०१७

अनेक शेतकऱ्यांनी आपले सरकार केंद्र, महा ई सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर तसेच काही खासगी केंद्रांद्वारे शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे  अर्ज भरतांना प्रचंड हेलपाटे व आर्थिक भुरदंड पडत असल्याची तक्रार केल्यानंतर कै वसंतराव नाईक शेतकरी मिशन अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यवतमाळ जिल्यामधील खासगी केंद्रांद्वारे भेटी देण्याच्या सपाटा लावला असुन आज ग्रामपंचायत अडणी येथील केंद्रावर भाजपचे नेते माजी जी.प . सद्यस्य रॉकेशभाऊ नेमनवार ,भाजपचे नेते डॉ बी झेड बावणे ,आदीवासी नेते अंकित नैताम ,तलसीलदार महादेवराव जोरवार , गटविकास अधिकारी मधुकरराव घसाळकर ,प्रशांतरावं बावणे ,विशालराव झोटींग यांच्या सोबत भेट दिली ऑन लाईन कर्जमाफी अर्ज भरून घेतले यावेळी एका शेतकऱ्याला अर्ज लोड करण्यास सरासरी ५ ते दहा मिनिटे लागत असून सुरवातीला इंटरनेट कनेक्टिविटी बरोबर नव्हती मात्र ३ दिवसापासून गती वाढली असुन आता पर्यंत ८० टक्के लोडींग काम झाल्याची माहीती यावेळी देण्यात आली . 
अडणी कॉमन सर्व्हिस सेंटरवर जमलेल्या शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंमध्ये सर्व अडचणीचे शेतकरी येतील व २००९ ते २०१६ पर्यंत पीककर्ज थकीत असलेले व बँकांनी पुर्नगठीत केलेले २०१७च्या हंगामात एकही हप्ता न भरलेले शेतकरी पात्र असल्याची माहीती यावेळी तिवारी यांनी दिली . घरात वडील व १८ वर्षावरील सर्व वेगवेगळी सातबारा असणारी मुले  स्वतंत्रपणे कर्जमाफी पात्र असुन मयत शेतकऱ्यांचे वारस यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहीती दिली . 
अर्ज भरल्यानंतर एका अर्जामागे दहा रुपये सरकार देणार आहे. त्यामुळे अर्ज भरताना पैसे देण्याची शेतकऱ्यांना गरज नसल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केले. तरी देखील कोणाकडून पैशांची मागणी झाल्यास किंवा कामकाजाबाबत हलगर्जीपणा झाल्याच्या तक्रारी आल्यास या तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधित केंद्रांवर कारवाई करुन त्यांचा परवाना रद्द  तात्काळ करण्याचा सूचना यावेळी तिवारी यांनी दिल्या. 
==============================================
============
=========

No comments: