टिटवी येथील शेतकरी आत्महत्येची पंतप्रधान कार्यलयाकडून दखल : शेतकरी मिशनची टिटवीला भेट
कोणतीही तक्रार केली नाही - विद्या प्रकाश मानगावकर
दिनांक -२२ सप्टेंबर २०१७
चार दिवसापुर्वी टिटवी तालुका घाटंजी (यवतमाळ ) येथे युवा शेतकरी प्रकाश मानगावकर यांनी आर्थिक विवंचनेतुन पानपत्र लिहून गळफास घेतला व त्याचे प्रतीसाद राष्ट्रीय स्तरावर उमटल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने गंभीर दखल घेत महाराष्ट्राच्या शेतकरी मिशन शेतकऱ्याच्या घरी व गावातील सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करून अहवाल देण्याच्या सुचनेनंतर आज टिटवी येथे शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी प्रशासनाच्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत भेट दिली प्रकाश मानगावकर यांच्या पत्नी विद्या ,मुलगी धनश्री ,भाऊ रजनीशराव मानगावकर यांचेशी आत्महत्येच्या कारणांची मीमांसा केली. यावेळी तिवारी पत्नी विद्या यांना तात्काळ मदत दिली सरकारतर्फे दोन्ही मुलगी व मुलगा यांचे के. जी. पासुन पी जी पर्यंत संपुर्ण खर्च सरकार उचलणार असुन व प्रकाश माणगावकर यांच्या पत्नी यांना शासकीय नौकरीमध्ये लवकरच सामाऊन घेणार असल्याचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप दिला . प्रकाश मानगावकर यांची मुलगी धनश्री हीला १२वीच्या शिक्षणासाठी दिलासा संस्थे तर्फे विजुताई धस यांनी १० हजार रुपयाच्या धनादेश यावेळी दिला .
कोणतीही तक्रार केली नाही - विद्या प्रकाश मानगावकर
मोदी सरकारच आपल्या पतीच्या आत्महत्येसाठी जबाबदार आहेतव त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नसुन या विषयांवर आपण आजपर्यंत तक्रार केली नसल्याची माहीती प्रकाश मानगावकर यांच्या पत्नीने यावेळी दिली .
प्रकाश मानगावकर यांनी आत्महत्या ही विदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणींवर व ग्रामीण भागावर होत असलेल्या उदासीनतेचे प्रतीक असुन सरकारला एक इशारा असल्याची टिका यावेळी गावातील शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यानी आरोग्य ,नापीकी ,बेरोजगारी ,प्रशासनातील सावळागोंधळ यावर समस्यांचा भडीमार केल्यांनतर तिवारी व्यक्त केली .
किशोर तिवारी यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी नितीन इंगोले ,तहसीलदार गजानन अहमद ,तालुका कृषी अधिकारी आर वि मालोदे ,मंडळ अधिकारी सी बी चांगडे ,गट विकास अधिकारी आरेवार ,ठाणेदार पारवा पोलीस स्टेशन ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ उमरे ,आरोग्य अधिकारी डॉ धरमेश चव्हाण उपस्थित होते .
यावेळी शेतकरी नेते गोपाळराव उमरे व रजनीश मानगावकर ,भाजपा नेते विठ्ठलराव लालसरे ,किशोर कळसकर ,प्रकाश नखाते ,बाजीराव मेश्राम ,माणिकराव दलाल व गजाननराव लालसरे यांनी शिवणी आरोग्य केंद्र व पारवा पोलीस स्टेशन बरेच लांब व अडचणीचे असल्याची तक्रार केली तसेच वन्यप्राण्यांमुळे शेती करणे कठीण झाल्याची समस्या मांडली .
तंटामुक्ती व दारूबंदी चळवळीच्या प्रमुख महीला कार्यकर्त्या सौ ताराबाई वासुदेव बोथे यांनी टिटवी येथे १० ते १२ व्यक्ती घाटंजीवरून खोक्याने दारू घरोघरी विकत असल्याची गंभीर तक्रार मांडली व यावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली . कोलाम पोडावरील ५० आदीवासी शेतकऱ्यांनी २००३ पुर्वीपासून पेरा असतांना जमीनीचे पट्टे दिले नसल्याची तक्रार केली तर शेकडो तेंदूपत्ता तोडणाऱ्या आदिवासींना बोनस २०१५ पासुन देण्यात आला नसल्याची तक्रार केली . शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी एका महीन्यात सर्व तक्रारी मार्गी लावण्याचे आदेश अधिकाऱ्यांना यावेळी दिले .
===========================================
No comments:
Post a Comment