दहेगाव येथील "सरकार आपल्या दारी" कार्यक्रमाला हजारोंची उपस्थिती :कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचा पडला सडा
दिनांक ३ जानेवारी २०१८
राळेगाव तालुक्यातील वडकी परीसरातील महाराष्ट्रात सर्वात जास्त विक्रमी २३ शेतकरी आत्महत्या मागील दशकात नोंद झालेल्या दहेगाव (कुंभा ) येथे प्रशासनाच्या सतत उपक्षेने व उदासीनते आदीवासी ,कोलाम पारधी, शेतकरी यांच्या कडुन आदिवासी विकास ,ग्राम विकास ,कृषी ,महसुल ,परिवहन महामंडळ ,वन ,आरोग्य ,सहकार ,वीज ,सिचन ,शिक्षण ,पोलीस , अन्न सुरक्षा या विभागाच्या प्रचंड तक्रारी घेऊन ३ जानेवारीला हजारो नागरीकांनी हजेरी लाऊन कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांचा सरकार आपल्यादारी कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिला. महाराष्ट्र सरकारच्या बळीराजा चेतना अभियानाचा एक भाग म्हणून ग्रामीण जनतेच्या विकासाच्या व लोककल्याणाच्या योजना राबविणाऱ्या विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना गावाच्या चावडी हजर करून सर्व तक्रारीचे समाधान करण्यासाठी असा अभिनव उपक्रम शेतकरी मिशन तर्फे आयोजित करण्यात येत असुन हळुहळु सर्व राजकीय पक्षाच्या व सामाजिक संघटनांच्या सहकार्याने या मोहीमेला गती आली असुन व जिल्हा प्रशासनाने अशा कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन करण्यास पुढाकार घेतला असल्यामुळे सर्व विभागाचे अधिकारी या सरकार आपल्यादारी कार्यक्रमाला उपस्थित रहात असल्यामुळे एक चळवळ म्हणुन समोर येत आहे .
वडकी - दहेगाव परिसरातील जिल्हा परीषद सदयस प्रीतीताई संजय काकडे ,जयपाल पेंदोर ,लीलाधर काळे ,शेषराव ताजने ,रुक्माबाई जुमनाके ,भाजप सरचिटणीस अनिल नंदुरकर ,शारदानंद जैस्वाल , विठ्ठल वडस्कर व निखिल साळखे यांच्या पुठाकाराने भाजप नेते डॉ मोतिरामजी बावणे करंजीकर ,रामदास परचाके ,सदाशिव मडावी ,सुदाम बल्की,सुरज मडावी ,रामस्वरूप पाझारे ,आदिवासी नेते धर्माजी आत्राम ,लेतुजी जुनघरे ,अंकीत नैताम ,चंद्रभान उदे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित सरकार आपल्यादारी कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी संदीप अपार , गटविकास अधिकारी खेडकर , तहसीलदार किरण गांगुर्डे सह प्रकल्प अधिकारी डाखोरे ,वन अधिकारी पवार साहेब जनतेच्या तक्रारीचे समाधान केले

दहेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर डॉक्टरांसह २१ पैकी १६ कर्मचारी नसुन डॉ भगत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासावरील संडास व बाथरुम निकामी असुन जिल्हा आरोग्य अधिकारी सतत विनंती करूनही कोणतीही व्यवस्था वा सुधार करण्यास तयार नाही अशी व्यस्था मांडली तर जिल्हा परीषद सदयस प्रीतीताई संजय काकडे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाने आरोग्य व शिक्षण विभागाकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले असल्याची तक्रार केली . ,जयपाल पेंदोर ,लीलाधर काळे ,शेषराव ताजने ,रुक्माबाई जुमनाके यांनी दहेगावात एकही बस येत नसल्यामुळे शाळेच्या मुलं मुलीसह सर्वांना बससाठी कुंभा वा ३ किमी राष्ट्रीय महामार्गावर जावे लागत असल्याची तक्रार केली तेव्हा परिवहन महामंडळकडुन बस नसल्यामुळे बंद केल्याचे सांगण्यात आले एक महिन्यात बस चालु करण्याची सुचना यावेळी किशोर तिवारी यांनी दिली .
पारधी व दलीत वस्तीत घाणीचे साम्राज्य असुन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट असल्याची तक्रार महिलांनी केल्यावर जिल्हा परीषद सदयस प्रीतीताई संजय काकडे यांनी या पारधी व दलीत समाजाच्या भगीनींसोबत वस्तीची पाहणी केली व तेथील नरकावस्था जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्याला मांडण्याची माहीती दिली .
भाजप नेते संजय काकडे यांच्या प्रयन्तामुळे दहेगाव व गारगोटी सिंचन प्रक्लपाला केंद्रीय सिंचन मंत्री नितीन गडकरी यांनी रु ३३० लाखाचा निधी दिला असुन येत्या सहा महीन्यात काम पुर्ण होत असल्याची माहीती यावेळी भाजप अनिल नांदुरकर यांनी दिली .
===============================================

No comments:
Post a Comment