Monday, February 26, 2018

मोनसँट्रोच्या बी टी कापसाने विदर्भ-मराठवाड्यात घरा -घरात आणली खाज - ग्रामीण भागात आता सर्वांना सुरक्षा कीट देण्याची गरज

मोनसँट्रोच्या  बी टी कापसाने  विदर्भ-मराठवाड्यात  घरा -घरात  आणली खाज - ग्रामीण भागात आता सर्वांना सुरक्षा कीट  देण्याची गरज 

दिनांक -२७ फेबु २०१८
मागील वर्षी खरीप हंगामात कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झाल्यांनतर सर्व शेत मजुरांना व फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यांना सुरक्षा किट वाटपाची सुरु झालेली मोहीम आता अख्ख्या महाराष्ट्रातील कापुस उत्पादक क्षेत्राच्या ग्रामीण अमेरीकेच्या मोनसँट्रो कंपनीच्या बी टी कापसामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यांनतर बाधीत कापुस ज्या ठिकाणी ठेवण्यात येत आहे त्या ठिकाणी त्याचा संपर्कात येणाऱ्या सर्वाना ऍलर्जी व प्रचंड खाज याच्या आजाराने ग्रस्त केले असुन आता महाराष्ट्रातील कापुस उत्पादक क्षेत्राच्या ग्रामीण सर्वांना सुरक्षा कीट  देण्याची अफलातुन मागणी शेतकऱ्यांनी केल्याची माहीती कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज दिली . या हरीतक्रांती आणणाऱ्या रासायनिक शेतीचा सर्वात भयंकर सैतानी अवतार हजारो निष्पाप शेतकरी व शेतमजुरांना दिसत असतांना याच्या   प्रचन्ड वेदना व आरोग्याच्या गंभीर समस्यांना लहान लहान मुलांना ,गर्भवती महिलांना ,आजारी वृद्धांना सामोरे जावे लागत असुन आता बहुराष्ट्रीय कंपन्यांची दलाली करणारे राजकीय नेते ,शेतकरी संघटनेचे नेते ,संरक्षण देणारी अधिकारी मंडळी चुप का असा सवाल करीत किशोर तिवारी यांनी हा विनाशाचा मार्ग बदलुन शाश्वत परमपरागत शेतीवर येण्यासाठी राष्ट्रीय कृषी कार्यक्रमाची मागणी पुढे रेटली आहे . 
यावर्षी अख्ख्या महाराष्ट्रातील सुमारे ४०  हेक्टर वरील बी टी कापसाचे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर ५० टक्के कापसाचे उभे पीक  नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचे सुमारे १० हजार कोटीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्यानंतर आता बाजारात कापसाला भाव नसल्यामुळे घरात ,शेताच्या बंड्यात ठेवलेल्या बी टी कापसाच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना प्रचंड प्रमाणात त्वचाविकाराची लागण होत असुन गावातील शेतकरी ,शेतमजूर ,लहान मुले सर्वच ऍलर्जी व प्रचंड खाज याच्या आजाराने शेकडोच्या संख्यने प्राथमिक आरोग्य केंद्र ,ग्रामीण रुग्णालय ,जिल्हा रुग्णालयात तसेच खाजगी  रुग्णालयात उपचार घेत असुन यावर शेकडो कोटी रुपयाचा खर्च लागत या आरोग्याच्या संकटाला सरकारने गंभीर घेण्याची ,या हजारो त्वचाविकाराची लागण झालेल्यांची मोफत उपचार व सामान्य आरोग्याला घातक अशा बीटी कापसाच्या बियाणाच्या कंपन्यांकडून संपुर्ण नुकसान भरपाई घेण्याची  मागणी   मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली  आहे . 
यवतमाळ ,नांदेड सह वर्धा जिल्ह्यातील कापुस उत्पादक क्षेत्राचा ,ग्रामीण ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राचा दौरा केल्यांनतर किशोर तिवारी महाराष्ट्र सरकारला दिलेल्या अहवालात  बी टी कापसाचे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या कापसामधील जंतू मोठ्याप्रमाणात सक्रिय झाले असुन प्रत्येक खेड्यात सर्वच ऍलर्जी व प्रचंड खाज याच्या आजाराने शेकडोच्या लोक प्रभावित असुन उपचाराच्या नावावर अनेकांची प्रचंड लूट होत असल्याच्या तक्रारी आल्याची माहीती समोर आली आहे . 
यवतमाळ जिल्हातील  केळापुर  तालुक्यातील करंजी येथील कापुस उत्पादक शेतकरी डॉ मोतीरामजी बावणे यांनी आपण आपल्या ,शेताच्या बंड्यात ठेवलेल्या बी टी कापसाच्या संपर्कात येणाऱ्या मजुरांच्या मुलांना मोठयाप्रमाणात खाज सुरु झाल्याने मजुरांनी शेतातील आपले वास्तव सोडल्याची माहीती दिली व आपण या आरोग्याला घातक असलेल्या कापसापासुन मुक्ती मिळावी म्हणून पडेल किमतीमध्ये सोमवारला विकल्याची माहीती दिली . केळापूर येथील सरपंच कमलाबाई सिडाम यांनी माहीती दिली की या कापसामुळे होत असलेली खाज व त्वचा रोगाची दहशतीमुळे सध्या शेतात असलेल्या कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने सोडावा लागत असल्याची तक्रार केली . 
सोनबर्डी येथे घरात ठेवलेला कापुसामुळे सर्वाना खाज व त्वचा रोगाची लागण होत असल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या आंगणात कापूस ठेवला आहे मात्र त्यामुळे संपर्कात येत असलेल्याना  सर्वच ऍलर्जी व प्रचंड खाज याच्या आजाराने ग्रासले यामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याची तक्रार पहापळ येथील आरोग्य केंद्राच्या आढावा बैठकीत मिळाल्याचे तिवारी यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे . यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव व झरी तालुक्यात बी टी कापसामुळे प्रचंड प्रमाणात त्वचाविकाराची लागण शेकडो तक्रारी आल्यानंतर कै वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील डीन डॉ मनीष शिरिगिरवार यांनी या तालुक्यात विषेय चमु पाठविली आहे व यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी  ऍलर्जी व त्वचाविकाराची सर्वच औषधी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र ,ग्रामीण रुग्णालय ,उप जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून दिली असल्याची माहीती सुद्धा अहवालात देण्यात आली आहे . 
वर्धा जिल्हात काही भागात ज्या ठिकाणी कापसाचे उभे पीक वेचणीच्या त्रासामुळे ढोराना खाण्यासाठी सोडल्यांनंतर मोठ्याप्रमाणात विषबाधेच्या तक्रारी आल्याची माहीती चौकशीसाठी शेतकरी मिशनने सरकारकडे सादर केली आहे . जर हे कापसाचे बियाणे आरोग्याला घातक आहे तर यावर तोडगा काढणे काळाची गरज नाही का ?  असा सवालही किशोर तिवारी यांनी सरकारला केला आहे . 
यापूर्वी कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनने गुलाबी  बोंडअळीचा व बी टी बियाणाच्या   विषय केंद्रात व राज्यात लावून धरला होता शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई ,गुलाबी  बोंडअळीच्या संकटातुन कायम सुटका यासाठी सर्व स्तरावर पाठपुरावा सुरु केला होता  व सोबतच या बी टी कापसावरील  बोंडअळीची  समस्या निवारण कार्यक्रमात  किशोर तिवारी यांनी सरकारला शेतकऱ्यांचे गुलाबी  अळी यांचा संकटाचा सामना करण्याकरितां प्रबोधनाची मोहीम सुरु करण्याचा व या संकटाचे मूळ कारण आता निवारण करण्याकरीता उपाययोजना ,नुकसान भरपाईसाठी कारवाईची संपुर्ण माहीती त्यासाठी कृषी ,ग्रामविकास व महसुल विभागाचा सहभाग ,कापसाचे गुलाबी अळीग्रस्त पीकाना समुळ नष्ट करणे त्यामुळे  अळीचा सरसकट नाश  होईल,जमिनीमधील गुलाबी अळीच्या अंडी नष्ट करणे ,कापसाचे पीक फरतड न घेता काढून फेकणे ,मॉन्सूनपूर्व कापसाची पेरणी टाळणे ,कापसाचे पीक यावर्षी  गुलाबी अळीग्रस्त झाले असल्यास पुढच्या वर्षी  डाळीचे वा तेलबियांचे पीक घेणे,अमेरीकेचे कापसाचे बियाणे गुलाबी अळीचे निमंत्रक असल्यामुळे या कापसाच्या बियाणांच्या जागी भारतीय सरळ वाणाच्या कापसाचा पेरा करणे एकमेव उपाय कापुस उत्पादक शेतकऱ्यांसमोर असल्यामुळे सरकारने कृषी खाते ,केंद्रीय कापूस शोध संस्था ,भारतीय कृषी संशोधन परिषद ,कृषी विद्यापीठ यांना कामावर लावणे गरजेचे असुन विदेशी बियाणे कीटकनाशक कंपन्याचे कृषि क्षेत्रातील साम्राज्य संपण्याचा निर्वाणीचा सल्ला  किशोर तिवारी यांनी दिला होता मात्र सरकारच्या मस्तवाल अधिकाऱ्यांनी आजपर्यंत कोणतीही कारवाई वा कृती कार्यक्रम राबविला नसल्याने आता आरोग्याच्या समस्यांना समोर जावे लागत असल्याची खंत तिवारी यांनी व्यक्त केली आहे . 
==========================================================

Saturday, February 17, 2018

राज्यात अ-मान्यताप्राप्त किटकनाशकाप्रमाणे तणनाशकांची राजरोसपणे होत असलेली अवैद्द्य विक्री बंद करा -शेतकरी मिशनची मागणी

राज्यात अ-मान्यताप्राप्त किटकनाशकाप्रमाणे तणनाशकांची राजरोसपणे होत असलेली  अवैद्द्य विक्री बंद  करा -शेतकरी मिशनची मागणी 
दिनांक -१७ फेबु २०१८
नुकतीच आंध्रप्रदेश सरकारने कृषीचे विशेष आयुक्त यांच्या शिफारशींवर आंध्रप्रदेश राज्यात ग्लायफोसेट सारख्या गैर निवडक तणनाशकावर बंदी घातल्याने देशात पिकांच्या मधात सर्रास वापण्यात येत असलेली तणनाशकांना भारत सरकारच्या केंद्रीय कीटकनाशक मंडळाने देण्यात आलेली परवानगी ही गैर पिकांच्या व वन -गायरान क्षेत्रासाठीच मर्यादीत असल्याचे सत्य समोर आले असुन सध्या हजारो कोटींचा तणनाशकांची विक्री व वापर बेकादेशीर असुन यामुळे पर्यावरण ,आरोग्य , जलसंवर्धनाच्या गंभीर समस्या निर्माण झाल्याने बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून प्रशासकीय संरक्षणात होत असलेली अवैद्य विक्री महाराष्ट्रात तात्काळ बंद करावी अशी मागणी कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी केली आहे . 
सध्या शेतमजुरीचे भाव व गवत काढण्यासाठी मजुरांची खेड्यात वणवण यामुळे शेतकऱ्यांनी पिकादरम्यान तणनाशकांचा अनियंत्रित वापर सुरु केला आहे मात्र या तणनाशकांचा वापर करतांना पिकांना यावर विपरीत परीणाम टाळण्यासाठी अनेक सावधगिरीच्या उपाययोजना कराव्या लागतात यासाठी सध्या तणनाशक निरोधक म्हणजे हर्बीसाईड रेसीटन्स एच टी कापसाच्या व सोयाबीनचा पेरा भारत सरकारची कोणतीही मान्यता नसतांना प्रशासकीय संरक्षणात होत असल्याची लाखो तक्रारी आल्या आहेत त्यातच तणनाशकांची प्रमुख निर्माण करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच आपल्या परवानाधारक बियाणे निर्माण करणाऱ्या कंपन्यांमार्फत बेकादेशीर करीत असुन सरकारने यावर फक्त बघ्याची व सावरसावर करण्याची भुमीका घेतल्याची खंत  शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आपल्या तक्रारीत केली आहे . 
यापूर्वीही मागील वर्षी ऑक्टोबर महीन्यात यवतमाळ जिल्हात ५० च्या वर शेतकरी व शेतमजुरांचे कीटकनाशंकांच्या विषबाधेमुळे मृत्यु झाल्यांनतर ज्या अतिविषारी प्रोफिनोफोस, सायपरमेथ्रीन  एसिटामिफ्रिड , इमिडाकलोप्रिड या कीटकनाशकांच्या अनियंत्रित वापराचा मुद्दा समोर आला होता त्यांची कापुस व सोयाबीन  सारख्या पिकांसाठी भारत सरकारच्या केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता नसल्याचे सत्य समोर आले होते यावर या सर्व विक्री करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची घोषणाच त्यावेळी सरकारने केली होती मात्र आजपर्यंत एकाही  कीटकनाशक  निर्माण कंपन्यांविरुद्ध साधी कारवाई तर सोडा नोटीसही देण्यात आली या उलट कीटकनाशक  निर्माण कंपन्यांचे मालक भाजप मंत्र्यासोबत कृषी प्रदर्शनींमध्ये आमच्या शेतकऱ्यांवर या पापाचे खापर फोडत होते असा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे . 
अमेरीकेच्या तणनाशक निरोधक म्हणजे हर्बीसाईड रेसीटन्स एच टी कापसाच्या बियाणांचे तंत्र राउंड उप फ्लक्स चे निर्माते मोनसँट्रो कंपनीच राउंड उप तणनाशकांची विक्री वाढविण्यासाठी अवैद्य  तणनाशक निरोधक म्हणजे हर्बीसाईड रेसीटन्स एच टी कापसाच्या बियाणांची विक्री  राशी ,निजिऊड ,कावेरी व माहिको या कंपन्यांमार्फत करीत असल्याच्या गंभीर आरोपाची तसेच  आरोग्याला धोका असणाऱ्या ग्लायफोसेट सारख्या  तणनाशकांची भारत सरकारच्या केंद्रीय कीटकनाशक मंडळाची पिकांच्या मधील गवत नष्ट करण्यासाठी परवानगी नसतांना होत असलेली अनियंत्रित विक्रीची चौकशी करण्याची मागणी सरकारला तिवारी यांनी केली आहे .
================================================================





Friday, February 16, 2018

किशोर तिवारी -नाबाद ६१

किशोर तिवारी -नाबाद ६१ 
(किशोर तिवारी यांच्या १७ फेबु.ला येत असलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा)
प्रिय पापा 
आपणास ६०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ,आपण आम्हास गौरव व्हावा असे जीवन जगता म्हणुन आपल्याबद्दल अभिमान आहे  ,आपण आम्हाला  जीवनाचे  साधेपण , चारीत्र्य ,परमार्थ यावर सतत धडे दिले त्यामुळे जीवनमूल्यांचे मोल समजले ,आपल्या संघर्षाच्या गोष्टी मी माझ्या मित्रांना  सतत सांगत राहते म्हणूनच  माझे  अनेक  मित्र जे आपल्याला   कधीही भेटले  नाही परंतु नेहमी आपल्या वंचितांच्या लढाची खुबचं प्रशंसा करीत राहतात ,आपल्या खरतड जीवनापासुन व  आदर्शमूल्यांतुन  बरेच काही शिकले आहे ,आपल्या रंजल्या गांजल्या शेतकरी ,कोलाम ,पारधी ,विधवांच्या सुख-समाधानाकरीता सतत प्रत्यनांची व  देत असलेल्या मैत्रीची जाणीव  मला ,आईला व  अपूर्वाला नेहमी होत असते .आजी नेहमी सांगत असते ज्याप्रमाणे आजोबाला सार्वजनिक जीवनात चांगुलपणाचा आजार होता तोच तुम्हाला जडला आहे . अगदी मी व अपूर्वा फारच लहान असतानाच आपण पूर्णवेळ आंदोलकांच्या भूमिकेत सतत संघर्ष केला .आपण वारंवार तुरंगात जात होता आपले कोलामांचे ,तेंदूपत्ता मजुरांचे ,शेतकऱ्यांचे अनेक आंदोलन माझ्या डोळ्यासमोर येतात .जीवनात सत्ता ,संपत्ती ,अधिकार अनित्य असतात याचा उपयोग फक्त इतरांचे मंगल करण्यासाठीच करावा हि अमोल अशी आपण दिलेली शिदोरी ,आम्हास नेहमी योग्य मार्ग दाखवत असते . 
आम्ही प्रत्येक वर्षी जेंव्हा जेंव्हा आपल्यातील जीवनमूल्यांचे आकलन झाले असे वाटते तेंव्हा तेंव्हा आपण आम्हास  आश्चर्यचकित करण्याचे नवे मार्ग शोधता ,कठीण समयी आपल्या अडचणीतही इतरांना सतत  प्रेम, दयाळूपणा आणि प्रामाणिकतेचा अनुभव आपल्या  शुद्ध नि:स्वार्थाच्या कृतीमध्ये मला दिसला . सर्वांचा दुःखात ,अन्यायात हसत हसत शामील होण्याची कला आम्हाला आपणच दिली ,आपल्या हजारो शेतकरी विधवा बहीणी त्यांच्या पुनर्वसनाच्या आपल्याला होत असलेला वेदना यापासुन आम्ही सर्वानी जगात मानवतेचा धडा शिकला आहे . 
मागील वर्षी मी लंडनला असतांना आपल्यावर मुंबईत हृदयाची मोठी शस्त्रक्रिया झाली होती त्यात पुन्हा त्याच जोमाने गरीबाची सेवा करण्यासाठी तयार होणे सहज श्यक्य नव्हते परंतु ज्या सहजतेने या वादळातून बाहेत येऊन आज शेतकऱ्यांसाठी ,आदीम कोलाम ,पारधी यांच्यासाठी जोमाने लढत आहात याचा आम्हास अभिमान आहे . 
आपल्या मधील सहजपणा ,विचांराची स्पष्टता ,करुणामय स्वभाव ,समानता व जीवनमूल्यांचा जपण्यासाठी लढण्याची जिद्द  यामुळे  आत्मविश्वासाने जगण्यासाठी लागणारे सर्वात उत्तम धडे  तुमच्याकडून मिळाले याचा  मला अभिमान वाटतो . 
मला माहित आहे की आपल्या जीवनाचा मार्ग  नेहमीच सोप्या नव्हत्या, परंतु आपण  वारंवार दाखवुन  दिले की वादळातूनही सत्याच्या मार्गावर सतत  चालत रहानेच हाच  एकमेव मुक्तीचा पर्याय आहे . 
मी व अपूर्वा  नेहमी प्रार्थना करतो की तुम्ही आणि मम्मी एकमेकांच्या  सोबतीने जीवनाचा खरा आनंद घेत राहतील व आपण दोघे एकमेकांना शक्ती, पाठिंबा आणि प्रोत्साहनात्मक स्त्रोत राहून समाजाची सेवा करावी . 
 मला आणि अपूर्वा   देवाचे  अत्यंत आभारी आहोत की त्यांनी आम्हाला असा विस्मयकारक वडील दिले 
आपण दीर्घ आयुष्य, आपणास आरोग्य आणि समृद्धीचे जीवन मिळावे हीच देवाजवळ प्रार्थना 
आम्ही सर्वांचे  आपणास खूप खुप प्रेम !!!!!!!!!!!
सगळ्यासाठी धन्यवाद!
आपली 
आभा तिवारी -वैद्य 


====================================================================

Tuesday, February 13, 2018

अकाली पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा - नुकसान भरपाईचे वास्तव

अकाली पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा - नुकसान भरपाईचे वास्तव 
महाराष्ट्राच्या विदर्भ ,मराठवाडा ,खान्देश व उत्तर महाराष्ट्रात १० फेबु ते १४ फेबु दरम्यान  झालेल्या अवकाळी पाऊसाने व प्रचंड गारपिटीने सुमारे ४ लाख हेक्टर वरील  उभे रबीचे पीक गारद झाले आहे यापुर्वी ४४ लाख हेक्टरमध्ये  सर्वच  ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने खरिपाची पिकांचे झालेले प्रचंड नुकसान त्यातच ओखी वादळाने झालेले ऑक्टोबरमध्ये झालेले पिकांचे नुकसान शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकणारे  आहे यावेळचे आलेल्या अवकाळी पाऊसाने व प्रचंड गारपिटीने २०१४ रबी हंगामामध्ये झालेल्या नुकसानीची आठवण करून दिली आहे अर्थात त्यावेळी राज्याने केंद्राच्या मदतीने दिलेली प्रति हेक्टरी मदत सुद्धा आता चर्चेत आली आहे मात्र विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील हवालदील बळीराजा सरकारच्या मदतीच्या घोषणेने वा विरोधीपक्षाच्या नुकसान भरपाईच्या मागणीने जास्त आशादायी दिसत नसल्याचे वास्तव आहे कारण यावर्षी घोषीत झालेली ऐतिहासिक कर्जमाफी व त्यांनतर घोषीत झालेली बोंडअळीग्रस्तांना देण्यात येणारी नुकसान भरपाई प्रशासकीय उदासीनतेमुळे सरकारला तर किरकिरी करणारी ठरली त्याच बरोबर सरकार वरील विश्वासाला तडा देणारी ठरत आहे ही चिंतेची बाब आहे . अचानक सुलतानी संकटाला तोंड देत असलेल्या बळीराजाला अस्मानी संकटाला पुन्हा एकदा समोर जावे लागत आहे यावेळी पंचनामा करणारी अस्तित्वात नसलेली संदर्भहीन कृषी व महसुल यंत्रणा ,विमाकंपनीला पोसणारे नुकसान भरपाईचे निकष ,अस्मानी वा सुलतानी संकटाचे प्रत्येक वेळी होणारे  घाणेरडे राजकारण ,कोणत्याही जबाबदारीपासून मुक्त असलेली भ्रष्ट सनदी अधिकाऱ्यांची संवेदनशून्य सरकारपाडू फौजेवर गंभीर चर्चा होणे गरजेचे आहे  . 
यावेळी सरकारने ८ फेबु .ला या अवकाळी पाऊसाची व गारपिटीची पुर्वसुचना राज्यस्तरावर दिली होती मात्र या पूर्वसूचनेची कोणतीही दखल ग्रामस्तरीय सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे मला विदर्भ ,मराठवाड्याच्या दौऱ्यात दिसले नाही ,तसेच दररोज मंत्र्यांनी व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी  प्रेसनोट  काढण्यात घेतलेली आघाडी बघण्यासारखी होती मात्र हवालदील शेतकऱ्याला यात काहीच रस दिसत नाही कारण ब्लॉक स्तरावर नुकसान निश्चित करणारी विमा योजनेचे नियम ज्योपर्यंत गावस्तरावर येत नाही विमा कंपन्यांकडून मदत मिळणे सहज शक्य होणार नाही ,कार्यालयात बसुन सर्व पंचनामे करण्याची पद्धत कारण आज विदर्भ व मराठवाड्यात ६० टक्के कर्मचारी वा अधिकाऱ्यांची पदे कृषी वा महसुल विभागात रीक्त असल्याने पंचनामे कसे करावे याचे आदेशच विभागीय स्तरावरून देण्यात येत असल्याने वंचितांना वंचित वा प्रस्थापितांना मदत देणारी यंत्रणा ,आधार कार्ड व ऑन लाईनचा वेदना दायक जीव घेणारा तथाकथित पारदर्शी प्रकार यापासुन मुक्ती मिळणार नाही त्योपर्यंत वेळेवर व योग्य व्यक्तीस मदत  मिळणार  नाही हे सत्य केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी वा राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या कुबड्या घेऊन सत्तेत येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कोण सांगणार असा सवाल आज प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्त्यास येत आहे . 
महाराष्ट्राच्या विदर्भ ,मराठवाडा ,खान्देश व उत्तर महाराष्ट्रातील अल्प भूधारक कोरडवाहू शेतकरी सरकारवर अविश्वासाच्या भूमिकेने पहात आहे याला सरकारची पत वा विश्वास कायम ठेवण्यासाठी व सरकारच्या निर्णयाची अंबलबजावणी करण्याची जबाबदारी असणारी बेजबाबदार मात्र अनियंत्रित झालेली मस्तवाल नौकरशाही असल्याचा माझा मागील तीन वर्षाचा सरकारचा अनुभव आहे याचे उदाहरण जर द्यावयाचे असल्यास यावर्षी घोषीत झालेली महाराष्ट्रातील ४४ लाख हेक्टरमधील बोंडअळीमुळे नापिकी झालेल्या कापुस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारी ऐतिहासिक नुकसान भरपाई असणार कारण  शासनस्तरावर बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपये ते ३७ हजार ५०० रुपये मदत जाहीर करण्यात आली होती यामध्ये सरकारकडे १२ लाखावर शेतकऱ्यांनी बियाणे उत्पादकाकडून सुमारे ६ हजार कोटी रुपयाच्या वसुलीसाठी रीतसर तक्रारी केल्या आहेत त्याच बरोबर विमा कंपनीला सुद्धा एवढ्याच तक्रारी आलेल्या आहेत तर राष्ट्रीय आपदा कोषच्या मदतीसाठी तर कापसाच्या पेऱ्यापेक्षा जास्त क्षेत्राचे पंचनामे झाल्याने ही मदत सहज शक्य नाही असा दावा हेच अधिकारी खाजगीत करीत असल्याचे चित्र आहे त्याच प्रमाणे ऐतिहासिक कर्जमाफी मध्ये सरकारला कट करून हेच अधिकारी वारंवार अडचणीत आणत आहेत ,जबाबदारीने काम करण्याची सवय विसरलेले मूर्ख अधिकारी शेतकऱ्यांच्या अडचणी व ग्रामीण महाराष्ट्रात वंचितांच्या कबरी खोदण्याचे एकसुत्री काम करीत असल्याने बळीराजा नैऱ्यायात जात आहेत  . 
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्या मात्र त्यांच्या सरकारच्या योजनांचे तीनतेरा कसे होत आहे यावर गंभीर चिंतन करण्याची गरज आहे एकीकडे अधिकारी व कर्मचारी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वाढीव पगार घेणार मात्र दुसरीकडे त्यांना अन्न देणाऱ्या बळीराज्याला मरण्यासाठी मोकळे सोडणार यावर या अस्मानी संकटाच्या निमित्याने विचार व्हावा हीच काळाची गरज आहे 
किशोर तिवारी 
विदर्भ जनआंदोलन समिती 
०९४२२१०८८४६
kishortiwari@gmail.com
=========================================================================



































Saturday, February 10, 2018

शेतीमालाच्या हमीभावाचा प्रश्न सकारात्मक दृष्ट्टीने निकाली लावा -शेतकरी मिशनचे पंतप्रधान मोदी यांना साकडे

शेतीमालाच्या हमीभावाचा प्रश्न सकारात्मक दृष्ट्टीने निकाली लावा -शेतकरी मिशनचे पंतप्रधान मोदी यांना साकडे 
दिनांक -१० फेबु २०१८
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी १ फेब्रुवारीला सादर केलेला अर्थसंकल्प शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून तयार केलेला अर्थसंकल्प असल्याचं  सांगत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळणार ही महत्वाची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती मात्र ९ फेब्रुवारीला राज्यसभेत यावर जो खुलासा दिला त्यामुळे संभ्रमात वाढ झाली असुन कारण उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव जरी मिळणार असला तरी ज्या उत्पादन खर्चावर हा हमीभाव मिळणार आहे, तो मोजताना सरकार कडून अनेक खर्चाना वगळण्यात आल्याची होत असलेले आरोप त्यातच राज्यसभेत अर्थमंत्री अरुण जेटलींनी यावर जो खुलासा केला त्यामुळे ही घोषणा केवळ धूळफेक असल्याचा  देशभरातल्या वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी केलेला दावा खरा असल्याची भावना शेतकऱ्यांच्या नैऱ्यायात भर टाकणारी  असल्याने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ सालापर्यंत म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारचा मानस पुर्ण करण्यासाठी शेतीमालाच्या हमीभावाचा प्रश्न स्वामिनाथन आयोगाच्या अहवालात असलेल्या तरतुदीप्रमाणे शेतकऱ्यांना अपेक्षित हमी भाव देण्याची आग्रही मागणी कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी  यांनी   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे . 
 आपल्या निवेदनात किशोर तिवारी यांनी उत्पादन खर्चावर हमी भाव तर सरकार देणार आहे, मात्र उत्पादन खर्च म्हणजे शेतकऱ्याला लागवडीसाठी येणारा सारा खर्च विचारात घेऊनच  निश्चित करण्यात यावा नाहीतर शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होण्याऐवजी तोटा होईल कारण अर्थमंत्र्यांनी उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभावाची घोषणा करताना म्हटलं आहे की, सरकारनं रब्बी हंगामातच किमान आधारभूत किंमत देण्याचं आश्वासन पूर्ण केलं आहे. मात्र रब्बी हंगामात हमीभाव  देताना सरकारनं उत्पादन खर्च C-2 या मानकानुसार म्हणजे खर्च अधिक जमिनीचे भाडे खसारा न पकडता A-2+FL या मानकानुसार म्हणजे फक्त खर्च व घरमजुरी धरून पकडला आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी गेला असुन शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामाप्रमाणे खरिपातही आता उत्पादन खर्च कमीच पकडला जाईल आणि त्यावर आधारित हमी भाव दिला जाईल. ज्यातून शेतकऱ्याचे नुकसानच होणार आहे अशी भीती निर्माण झाली आहे म्हणुन शेतकऱ्यांना दीडपट हमी भाव देताना उत्पादन खर्च C-2 या मानकानुसारच दिला पाहिजे अशी स्पष्ट तरतूद स्वामिनाथन आयोगाच्या अहवालात आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी सनदी अधिकाऱ्यांनी यावेळी सरकारनं उत्पादन खर्चाची व्याख्याच बदलून टाकली आहे, त्यामुळे अर्थातच शेतकऱ्यांना अपेक्षित हमी भाव मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे कारण  हमी भावासाठी उत्पादन खर्च ठरवताना जमीन मालकी किंवा जमिनीचं भाडं ग्राह्य न धरल्यानं उत्पादन खर्च अत्यंत कमी मोजला जाईल. त्यातून शेतकऱ्यांचे नुकसानच होईल  असे किशोर तिवारी म्हटले आहे . 

किशोर तिवारी आपल्या निवेदनात उत्पादन खर्च ठरवत असताना सरकारकडून वेगवेगळे घटक ग्राह्य धरले जातात आणि त्यानुसार उत्पादन खर्चाचे वेगवेगळे प्रकारही निश्चित करण्यात आलेले आहेत त्यावरच आपला वाद मांडला असुन लागवडी पिक कर्ज  व्याज सरकारी व खाजगी वेगवेगळे असतात त्याचप्रमाणे  राष्ट्रीय स्तरावर सरसकट समान उत्पन्न येत नसल्यामुळे हमीभाव राज्यस्तरावर घोषीत करण्याची मागणी पुढे रेटली आहे ,त्याच बरोबर फक्त शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिल्याने प्रश्न सुटणार नाही कारण दीडपट हमीभाव देण्यासाठी सक्षम यंत्रणाच सध्या अस्तित्वात नसल्याचे सत्य मांडत यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र व राज्याची योजना तात्काळ सुरु करण्याची मागणी किशोर तिवारी यांनी रेटली आहे . 
=================================================