किशोर तिवारी -नाबाद ६१
(किशोर तिवारी यांच्या १७ फेबु.ला येत असलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा)
प्रिय पापा
आपणास ६०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ,आपण आम्हास गौरव व्हावा असे जीवन जगता म्हणुन आपल्याबद्दल अभिमान आहे ,आपण आम्हाला जीवनाचे साधेपण , चारीत्र्य ,परमार्थ यावर सतत धडे दिले त्यामुळे जीवनमूल्यांचे मोल समजले ,आपल्या संघर्षाच्या गोष्टी मी माझ्या मित्रांना सतत सांगत राहते म्हणूनच माझे अनेक मित्र जे आपल्याला कधीही भेटले नाही परंतु नेहमी आपल्या वंचितांच्या लढाची खुबचं प्रशंसा करीत राहतात ,आपल्या खरतड जीवनापासुन व आदर्शमूल्यांतुन बरेच काही शिकले आहे ,आपल्या रंजल्या गांजल्या शेतकरी ,कोलाम ,पारधी ,विधवांच्या सुख-समाधानाकरीता सतत प्रत्यनांची व देत असलेल्या मैत्रीची जाणीव मला ,आईला व अपूर्वाला नेहमी होत असते .आजी नेहमी सांगत असते ज्याप्रमाणे आजोबाला सार्वजनिक जीवनात चांगुलपणाचा आजार होता तोच तुम्हाला जडला आहे . अगदी मी व अपूर्वा फारच लहान असतानाच आपण पूर्णवेळ आंदोलकांच्या भूमिकेत सतत संघर्ष केला .आपण वारंवार तुरंगात जात होता आपले कोलामांचे ,तेंदूपत्ता मजुरांचे ,शेतकऱ्यांचे अनेक आंदोलन माझ्या डोळ्यासमोर येतात .जीवनात सत्ता ,संपत्ती ,अधिकार अनित्य असतात याचा उपयोग फक्त इतरांचे मंगल करण्यासाठीच करावा हि अमोल अशी आपण दिलेली शिदोरी ,आम्हास नेहमी योग्य मार्ग दाखवत असते .
आम्ही प्रत्येक वर्षी जेंव्हा जेंव्हा आपल्यातील जीवनमूल्यांचे आकलन झाले असे वाटते तेंव्हा तेंव्हा आपण आम्हास आश्चर्यचकित करण्याचे नवे मार्ग शोधता ,कठीण समयी आपल्या अडचणीतही इतरांना सतत प्रेम, दयाळूपणा आणि प्रामाणिकतेचा अनुभव आपल्या शुद्ध नि:स्वार्थाच्या कृतीमध्ये मला दिसला . सर्वांचा दुःखात ,अन्यायात हसत हसत शामील होण्याची कला आम्हाला आपणच दिली ,आपल्या हजारो शेतकरी विधवा बहीणी त्यांच्या पुनर्वसनाच्या आपल्याला होत असलेला वेदना यापासुन आम्ही सर्वानी जगात मानवतेचा धडा शिकला आहे .
मागील वर्षी मी लंडनला असतांना आपल्यावर मुंबईत हृदयाची मोठी शस्त्रक्रिया झाली होती त्यात पुन्हा त्याच जोमाने गरीबाची सेवा करण्यासाठी तयार होणे सहज श्यक्य नव्हते परंतु ज्या सहजतेने या वादळातून बाहेत येऊन आज शेतकऱ्यांसाठी ,आदीम कोलाम ,पारधी यांच्यासाठी जोमाने लढत आहात याचा आम्हास अभिमान आहे .
आपल्या मधील सहजपणा ,विचांराची स्पष्टता ,करुणामय स्वभाव ,समानता व जीवनमूल्यांचा जपण्यासाठी लढण्याची जिद्द यामुळे आत्मविश्वासाने जगण्यासाठी लागणारे सर्वात उत्तम धडे तुमच्याकडून मिळाले याचा मला अभिमान वाटतो .
मला माहित आहे की आपल्या जीवनाचा मार्ग नेहमीच सोप्या नव्हत्या, परंतु आपण वारंवार दाखवुन दिले की वादळातूनही सत्याच्या मार्गावर सतत चालत रहानेच हाच एकमेव मुक्तीचा पर्याय आहे .
मी व अपूर्वा नेहमी प्रार्थना करतो की तुम्ही आणि मम्मी एकमेकांच्या सोबतीने जीवनाचा खरा आनंद घेत राहतील व आपण दोघे एकमेकांना शक्ती, पाठिंबा आणि प्रोत्साहनात्मक स्त्रोत राहून समाजाची सेवा करावी .
मला आणि अपूर्वा देवाचे अत्यंत आभारी आहोत की त्यांनी आम्हाला असा विस्मयकारक वडील दिले
आम्ही सर्वांचे आपणास खूप खुप प्रेम !!!!!!!!!!!
सगळ्यासाठी धन्यवाद!
आपली
आभा तिवारी -वैद्य
====================================================================
No comments:
Post a Comment