Saturday, February 17, 2018

राज्यात अ-मान्यताप्राप्त किटकनाशकाप्रमाणे तणनाशकांची राजरोसपणे होत असलेली अवैद्द्य विक्री बंद करा -शेतकरी मिशनची मागणी

राज्यात अ-मान्यताप्राप्त किटकनाशकाप्रमाणे तणनाशकांची राजरोसपणे होत असलेली  अवैद्द्य विक्री बंद  करा -शेतकरी मिशनची मागणी 
दिनांक -१७ फेबु २०१८
नुकतीच आंध्रप्रदेश सरकारने कृषीचे विशेष आयुक्त यांच्या शिफारशींवर आंध्रप्रदेश राज्यात ग्लायफोसेट सारख्या गैर निवडक तणनाशकावर बंदी घातल्याने देशात पिकांच्या मधात सर्रास वापण्यात येत असलेली तणनाशकांना भारत सरकारच्या केंद्रीय कीटकनाशक मंडळाने देण्यात आलेली परवानगी ही गैर पिकांच्या व वन -गायरान क्षेत्रासाठीच मर्यादीत असल्याचे सत्य समोर आले असुन सध्या हजारो कोटींचा तणनाशकांची विक्री व वापर बेकादेशीर असुन यामुळे पर्यावरण ,आरोग्य , जलसंवर्धनाच्या गंभीर समस्या निर्माण झाल्याने बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून प्रशासकीय संरक्षणात होत असलेली अवैद्य विक्री महाराष्ट्रात तात्काळ बंद करावी अशी मागणी कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी केली आहे . 
सध्या शेतमजुरीचे भाव व गवत काढण्यासाठी मजुरांची खेड्यात वणवण यामुळे शेतकऱ्यांनी पिकादरम्यान तणनाशकांचा अनियंत्रित वापर सुरु केला आहे मात्र या तणनाशकांचा वापर करतांना पिकांना यावर विपरीत परीणाम टाळण्यासाठी अनेक सावधगिरीच्या उपाययोजना कराव्या लागतात यासाठी सध्या तणनाशक निरोधक म्हणजे हर्बीसाईड रेसीटन्स एच टी कापसाच्या व सोयाबीनचा पेरा भारत सरकारची कोणतीही मान्यता नसतांना प्रशासकीय संरक्षणात होत असल्याची लाखो तक्रारी आल्या आहेत त्यातच तणनाशकांची प्रमुख निर्माण करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच आपल्या परवानाधारक बियाणे निर्माण करणाऱ्या कंपन्यांमार्फत बेकादेशीर करीत असुन सरकारने यावर फक्त बघ्याची व सावरसावर करण्याची भुमीका घेतल्याची खंत  शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आपल्या तक्रारीत केली आहे . 
यापूर्वीही मागील वर्षी ऑक्टोबर महीन्यात यवतमाळ जिल्हात ५० च्या वर शेतकरी व शेतमजुरांचे कीटकनाशंकांच्या विषबाधेमुळे मृत्यु झाल्यांनतर ज्या अतिविषारी प्रोफिनोफोस, सायपरमेथ्रीन  एसिटामिफ्रिड , इमिडाकलोप्रिड या कीटकनाशकांच्या अनियंत्रित वापराचा मुद्दा समोर आला होता त्यांची कापुस व सोयाबीन  सारख्या पिकांसाठी भारत सरकारच्या केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता नसल्याचे सत्य समोर आले होते यावर या सर्व विक्री करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची घोषणाच त्यावेळी सरकारने केली होती मात्र आजपर्यंत एकाही  कीटकनाशक  निर्माण कंपन्यांविरुद्ध साधी कारवाई तर सोडा नोटीसही देण्यात आली या उलट कीटकनाशक  निर्माण कंपन्यांचे मालक भाजप मंत्र्यासोबत कृषी प्रदर्शनींमध्ये आमच्या शेतकऱ्यांवर या पापाचे खापर फोडत होते असा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे . 
अमेरीकेच्या तणनाशक निरोधक म्हणजे हर्बीसाईड रेसीटन्स एच टी कापसाच्या बियाणांचे तंत्र राउंड उप फ्लक्स चे निर्माते मोनसँट्रो कंपनीच राउंड उप तणनाशकांची विक्री वाढविण्यासाठी अवैद्य  तणनाशक निरोधक म्हणजे हर्बीसाईड रेसीटन्स एच टी कापसाच्या बियाणांची विक्री  राशी ,निजिऊड ,कावेरी व माहिको या कंपन्यांमार्फत करीत असल्याच्या गंभीर आरोपाची तसेच  आरोग्याला धोका असणाऱ्या ग्लायफोसेट सारख्या  तणनाशकांची भारत सरकारच्या केंद्रीय कीटकनाशक मंडळाची पिकांच्या मधील गवत नष्ट करण्यासाठी परवानगी नसतांना होत असलेली अनियंत्रित विक्रीची चौकशी करण्याची मागणी सरकारला तिवारी यांनी केली आहे .
================================================================





No comments: