Friday, March 16, 2018

कोलाम विकास अधिकारी व कोलांमाना नौकरीत विषेय आरक्षण देणार - लिंगापुर येथील कोलाम महीला मेळाव्यात घोषणा

कोलाम विकास अधिकारी व कोलांमाना नौकरीत विषेय आरक्षण देणार - लिंगापुर येथील कोलाम महीला मेळाव्यात घोषणा 
दिनांक - १६ मार्च २०१८
महाराष्ट्र राज्यात लगतच्या तेलंगणा व आंध्र राज्याप्रमाणे आदीवासी प्रकल्प कार्यलयामध्ये विषेय कोलाम अधिकारी आदीम जातीसाठी असलेल्या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी व तसेच कोलामांच्या समस्या सोडविण्यासाठी जबाबदार अधिकारी स्वतंत्रपणे  हाताळण्यासाठी राज्य सरकार नियुक्त करणार असुन कोलाम समाजामधून आदीवासी नौकरीत आरक्षणाचा फायदा मागील ६० वर्षात नाममात्र झाला असल्यामुळे आता सरकार कोलाम समाजाकरीता नौकरीत आदीम समाजाचा लोकसंख्येच्या प्रमाणात विषेय आरक्षण देणार असल्याची घोषणा कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी  घाटंजी तालुक्यातील पारवा जवळील लिंगापुर कोलाम पोडावर महीला मेळाव्यात केली . 

घाटंजी तालुक्यातील  कुर्ली  पारवा झटाळा सावंगी सावरखेड परीसरातील लिंगापुर तरोडा चिखलवर्धा वासरी जाम कोलाम पोडावर ,पारधी बेड्यावर  आदिवासी विकास ,ग्राम विकास ,कृषी ,महसुल ,वन ,आरोग्य ,सहकार ,वीज ,सिचन ,शिक्षण ,पोलीस , अन्न  सुरक्षा या विभागाच्या सतत उपक्षेमुळे  प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागत आहे यावर आता कोलाम महिलांनी एल्गार उभारला असुन मागील १० मार्चला  घाटंजी तालुक्यातील पारवा जवळील लिंगापुर कोलाम पोडावर महीला मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला   कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी पं सदयस सुहासभाऊ पारवेकर जीवनभाऊ मुददलवार ,  जी प सदयस रुपेश कल्लमवार ,मोहन जाधव ,सुरेश बोलेनवार धर्मा आत्राम ,कोलाम नेते अर्जुन आत्राम लेतुजी जुनघरे बाबुलाल मेश्राम  मुधुकर घसाळकर ,माजी सैनिक माधवराव टेकाम संजय आरेवार उपस्थित होते . परीसरातील वंचित कोलाम आदीवासी बंधु आणी भगीनींनी या कोलाम महीला मेळाव्यात मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते . कोलाम महीला मेळाव्याचे  संयोजक कुसुम मेश्राम ,सौमित्रा आत्राम .सुनंदा मेश्राम ,इंदु आत्राम ,शशिकला आत्राम ,सावित्री टेकाम ,विमल आत्राम यांनी कोलाम समाजाच्या व कोलाम पोडाच्या समस्या यावेळी मांडल्या . 
केंद्र व राज्य सरकारकडून आदीम जमातीच्या कोलाम बांधवांकरीता आजपर्यंत शेकडो कोटीच्या योजना राबविण्यात आल्या मात्र यावेळी चिखलवर्धा ,तरोडा ,वासरी ,जाम कोलाम पोडावरील नागरीकांनी आम्हाला घरकुल ,रस्ता ,पाणी यासारखे मुलभूत प्रश्न्नाकरीता आजही वंचित रहावे लागत असल्याची वेदना मांडल्या त्याचवेळी आदीवासी प्रकल्प कार्यालयाच्या  अधिकाऱ्यानी लाखो रुपये चिखलवर्धा सारख्या कोलाम पोडासाठी दिल्याची लेखी माहीती यावेळी दिली ,कोलाम आदीम समाजाच्या नावावर येणारा शेकडो कोटीच्या निधी गेलातरी कोणाच्या  घिशात असा सवाल उपस्थित करीत किशोर तिवारी  आदीवासी प्रकल्प कार्यलयामध्ये विषेय कोलाम अधिकारी आदीम जातीसाठी असलेल्या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी व तसेच कोलामांच्या समस्या सोडविण्यासाठी जबाबदार अधिकारी स्वतंत्रपणे  हाताळण्यासाठी राज्य सरकार नियुक्त करणार निर्णयाचे सुतोवात केले . 
==================================================================

No comments: