राज्यात तननाशक निरोधक (राऊंडउपबीटी) बियाणांची अवैद्य विक्रीवर शेतकरी मिशनने सरकारचे वेधले लक्ष
दिनांक - २५मार्च २०१८
मागीलवर्षी महाराष्ट्र सरकारने आज केंद्र सरकारला महाराष्ट्रासह तेलंगण, आंध्र प्रदेश, गुजरात, ओडिशा, कर्नाटक आणी मध्य प्रदेश आदी राज्यांत तननाशक निरोधक बी टी बियाणाची ३५ लाख पाकिटे अवैधरीत्या विकल्या गेल्याचे प्रकरणात सीबीआयमार्फत चौकशी करण्याची विनंती प्रलंबित असतांना पुन्हा एकदा तणनाशक निरोधक कापसाच्या बियाण्याचा समांतर अवैद्य विक्रीचा मुद्दा सध्या ऐरणीवर येत आहे कारण सध्या येत्या खरीप हंगामासाठी गुजराथ व तेलंगण, आंध्र प्रदेश मधुन मोन्सँटो कंपनीचे तननाशक निरोधक(राऊंडउपबीटी ) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले बियाणांची बुकिंग व विक्री होत असल्याची तक्रार वसंतराव नाईक शेती स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी कृषी विभागाकडे केली असुन हा सर्व प्रकार सामन्तर सरकार स्थापनेचा असुन असला गोरखधंदा रोखण्याची जबाबदारी कृषी विभाग ,भारत सरकारच्या कृषी संशोधन परिषद व कापूस संशोधन संस्थेची तसेच कृषी विद्यापीठाची असतांना असे बोगस एच टी बी बियाण्यांना परवानगी देण्यासाठी कायदे, नियम असतांना तसेच केंद्रीय कापूस अनुसंधान परिषद, कृषी परिषदे सह विविध संस्थांचे अशा बियाण्यांवर नियंत्रण असतांना मान्यतेविना असे बियाणे देशात येतात कसे असा मूळ सवाल तिवारी उपस्थित करून अख्ख्या देशात हा गोरखधंदा कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पोलिसांच्या हात मिळवणीमुळेच होत असल्याचा तक्रारी येत असल्यामुळे सरकारने मोन्सँटो कंपनीचे तननाशक निरोधक(राऊंडउपबीटी ) बी जी ३ तंत्रज्ञानाचा नावावर होत असलेली विक्री समुळ बंद करण्याची मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे .
मागील वर्षी मोन्सँटो कंपनीचे तननाशक निरोधक(राऊंडउपबीटी ) बी जी ३ तंत्रज्ञानाचा अवैद्य वापर करून सुमारे ४० लाख पाकीटे ज्याची किंमत सुमारे ४७२ कोटी रुपये आहे व या बियाणांचा वापर करून सुमारे साडे आठ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाल्याचे सत्य समोर आल्यावर तननाशक निरोधक बी टी बियाणे आलेच कसे, असा सवाल उपस्थित करीत या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची अशी मागणी राज्यसरकारने भारत सरकारला केली होती याच दरम्यान महाराष्ट्रातील सुमारे १२ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी मोन्सँटो कंपनीचे गुलाबी बोंडअळी निरोधक बी जी २ तंत्रज्ञान पूर्णपणे निकामी झाल्याने नुकसान भरपाईचा दावा केला असुन मोन्सँटो कंपनीच्या कापसाच्या बियाणांचा नंगा नाच सुरु असुन अशा प्रकारे विना परवानगीने यापूर्वी मोन्सँटो कंपनीचे बी जी १ व २ तंत्रज्ञानाची विक्री झाल्याची माहीती तिवारी यांनी दिली .
गेल्या २-३ वर्षांपासून तणनाशक निरोधक राऊंड उप बी टी बियाण्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे कारण याला शेतकऱ्यांची गावस्तरावर मागणी आहे तसेच तणनाश करण्यासाठी लागणारी भरमसाट मजुरी कारणीभुत आहे मात्र त्याचा परिणाम शेतकऱ्यांचे आरोग्य आणि जमिनीवर होत आहे. पेरणी झालेल्या परिसरात कॅन्सर, किडनीचे आजार होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नमूद आहे. यापूर्वी पांढऱ्या थैलीत आणून त्याची सर्रास विक्री होत होती आणि गावोगावी पेरणी केली जात होती मात्र आता ब्रँड नावासह खुले आम होत असलेली विक्री चिंतेचा विषय आहे कारण सरकारच्या विविध संस्थांचे बियाणे, खत व कीटकनाशक उत्पादक कंपन्यां व कृषी विभागाला याची माहिती होत नाही, हे आश्चर्य आहे. मागीलवर्षी कापूस संशोधन संस्थेने परीक्षण केलेल्या नऊ पैकी सहा बियाणे एचटी म्हणजे तणनाशक निरोधक असल्याचे निष्पन्न होते मात्र त्यानंतरही केंद्रीय कापुस संशोधन संस्थेने राज्य सरकारला कळवण्याचे साधे सौजन्य दाखविले नव्हते ही गंभीर बाब आहे. कापूस संशोधन संस्थे सह केंद्र व राज्य सरकारच्या कृषी विभागाचा मोन्सँटो कंपनीचे तननाशक निरोधक(राऊंडउपबीटी ) बी जी ३ तंत्रज्ञानाचा अवैद्य वापर करून तयार केलेल्या कापसाच्या बियाणांचा होत असलेल्या राजरोस विक्रीमध्ये संपुर्ण सहभाग लक्षात घेता सरकारने यावर कडक उपाययोजना करण्याची मागणी किशोर तिवारी यांनी यांनी केली आहे .
===================================
No comments:
Post a Comment