Tuesday, May 14, 2019

रोजगार ,चारा व पाण्यासाठी मराठवाडा व विदर्भात मोठयाप्रमाणात ग्रामीण जनतेची स्थलांतराची शेतकरी मिशनकडून गंभीर दखल

रोजगार ,चारा व पाण्यासाठी मराठवाडा व  विदर्भात मोठयाप्रमाणात ग्रामीण जनतेची स्थलांतराची शेतकरी मिशनकडून गंभीर दखल  
दिनांक -१४ मे २०१९
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील गौरी ,चाफला नाईक तांडा ,ब्राह्मणगुडा ,सुभाषनगर ,शिंदोला ,निराळा ,मांडवी ,वर्धा जिल्ह्यातील आर्वी व कारंजा तालुक्यातील चोपण ,पांजरगोंडी ,धामकुंड ,दानापूर ,चांदणी बोथली गारपीट ब्राह्मणवाडा रगडगाव हेटी तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व नेर तालुक्यातील पारध व मुकिंदपूर बेडा या तांड्या बेड्यातून मोठयाप्रमाणात रोजगार ,चारा व पाणी या समस्यांमुळे मोठ्याप्रमाणात गावकऱ्यांनी गावसोडून स्थलांतर केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर याची गंभीर दखल घेत विदर्भ व मराठवाड्यातील एकूण स्थलांतराची संपूर्ण माहीती  वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सर्व विदर्भ व मराठवाड्यातील जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन  अधिकाऱ्यांना लिहलेल्या पत्रात विचारली आहे व या स्थलांतराची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी यावेळी दिले . 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडीओ व्हिडीओ ब्रीज सिस्ट‍िमद्वारे मोबाईलवरुन सर्व विदर्भ मराठवाड्यातील अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून दुष्काळी उपाय योजनांचा आढावा घेतला असून यावेळी दुष्काळग्रस्त  गावांमधील जनतेनी टँकर, पाण्याच्या टाक्या, चारा छावण्या, प्रलंबीत पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, जनावरांसाठी पाणी, रोहयोची कामे, जलसंधारणाची कामे, पाणी पुरवठा योजनांसाठी विजेचा प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर थेट मुख्यमंत्र्यांशी बोलून गावातील परिस्थिती त्यांना विशद केली. या मुद्यांची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, बीडीओ यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत  गावामध्ये वयक्तिक शौचालय, घरकुल योजना, वृक्ष लागवड, वयक्तिक सिंचन विहीर, गुरांचे गोठे, राजीव गांधी भवन, सार्वजनीक विहीर, भूमिगत गटारे,पांदण रस्ते, डाळीचे बांध खालील कामे सुरु करण्याचे आदेश दिले असतांना अनेक ठिकाणी कामे अडल्याची व मस्टर बंद असल्याची प्रचंड तक्रारी येत असल्याचे शेतकरी मिशनने सर्व विदर्भ व मराठवाड्यातील जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन  अधिकाऱ्यांना कळविले आहे . जनावरांनाही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गावातील जनावरांची संख्या लक्षात घेऊन त्याआधारे टँकरच्या पाण्यात वाढ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यावरही चाऱ्यासाठी स्थलांतर का असा सवाल किशोर  तिवारी यांनी उपस्थित केला आहे . 
मनरेगातून ‘मागेल त्याला रोजगार’ द्या -किशोर तिवारी 
अनेक दुष्काळग्रस्त गावात रोजगाराची वाणवा आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, मनरेगा योजनेंतर्गत ‘मागेल त्याला रोजगार’ देण्यात येत आहे. मनरेगा योजनेतून मोठ्या प्रमाणात कामे मंजूर करण्यात आली असून ती गावात राबवून लोकांना रोजगार मिळवून द्यावा. मनरेगाअंतर्गत विविध २८ प्रकारची कामे वाढविण्यात आली आहेत. यामध्ये शाळेच्या कंपाऊंडपासून विविध कामे करता येतात. याचा लाभ घेऊन लोकांना रोजगार देण्याबरोबर गावात पायाभूत सुविधांची शाश्वत कामे तयार करण्यात यावीत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी  केले असुन सर्व विदर्भ व मराठवाड्यातील जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन  अधिकाऱ्यांनी  यामुळे स्थलांतर होणार नाही याची दखल घ्यावी अशी स्पष्ट सूचना वजा ताकीद शेतकरी मिशनने दिली असल्याची किशोर  तिवारी यांनी यावेळी दिली . 
 सर्व विदर्भ व मराठवाड्यातील जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन  अधिकाऱ्यांनी प्रचंड प्रमाणात मनरेगा योजनेंतर्गत ‘मागेल त्याला रोजगार’ देण्यात येत असल्याचे आढावा बैठकीत सांगीतले तसेच चारा ,पाणी मुबलक असल्याचे प्रशासन सरकारला सांगत आहे मग रोजगार ,चारा व पाण्यासाठी मराठवाडा व  विदर्भात मोठयाप्रमाणात ग्रामीण जनतेची स्थलांतराची आवश्यकता का असा सवाल किशोर  तिवारी यांनी उपस्थित करीत रोजगार ,चारा व पाण्यासाठी समस्यांना तांडा देत असलेल्या दुष्काळग्रस्तांनी शेतकरी मिशनशी मोबाईल ०९४२२१०८८४६ वर संपर्क करण्याचे जाहीर आवाहन वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले आहे 
==============================================================

No comments: