मोदीलाटेत केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांचा पराभवाचे चिंतन करणे गरजेचे -किशोर तिवारी
दिनांक -२४ मे २०१९
संपुर्ण देशात मोदींच्या लाटेने विरोधकांचा पुर्णपणे सफाया केल्यानंतर त्यातच महाराष्ट्रात काँग्रेसला जनतेने पूर्णपणे नाकारल्यानंतर मात्र चंद्रपूर लोकसभा मतदार संघात प्रत्येक घराघरात संपर्क ठेवणारे केंद्रीय गृह राज्यमंत्री मा हंसराज अहीर यांचा झालेला पराभव सर्वांना धक्का देणारा आहे व सर्वानी आप आपल्या परीने कारणमीमांसा सुद्धा सुरु केली आहे कारण हंसराज अहीर यांचा पराभव बाळू धानोरकर यांनी केला त्यांना जेमतेम प्रचाराला १० दिवसही मिळाले नाही मात्र त्यातच त्यांना १) राजुरा विधानसभेत सुमारे ३६०००लीड २) बल्लारपूर विधानसभेत ३०५०० ची लीड ३) चंद्रपूर विधानसभा सुमारे २५००० ची लीड ४) वरोरा विधानसभा १२००० ची लीड तर हंसराज अहीर यांना ५) वणी विधानसभेत फक्त २००० ची लीड आहे मात्र आदीवासी बहुल ६) आर्णी -केळापुर विधानसभेत - ५९००० मतांची निर्णायक लीड मात्र त्याचा उपयोग पराभव टाळण्यासाठी अपुरा पडला आहे पराभवासाठी अनेक कारणे समोर करण्यात येत आहे मात्र या ऐतिहासिक निकालाचे प्रमुख कारण कुणबी , मुस्लिम व दलित मतांची मागील दोन लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेली विभागनी यावेळी न झाल्यामुळे त्यातचं भाजपला मागील दोन लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माळी समाज एकसंघ दूर केल्यामुळे झालेला तोटा असल्याचे मत शेतकरी नेते किशोर तिवारी व्यक्त केले आहे . मागील दोन दिनांक -२४ मे २०१९
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी नेते वामनराव चटप यांनी काँग्रेसच्या बरोबरीचे मतदान घेतले होते त्यामध्ये कुणबी , मुस्लिम व दलित मतांचा समावेश होता यावेळी हे विभाजन झाले नाही त्याच बरोबर बाळू धानोरकर हे मूळचे शिवसैनिक व लढाऊ नेता यामुळे युवा व शेतकऱ्यांनी त्यांना मतदान केले त्याचवेळी वंचित आघाडीने हंसराज अहीर यांना घरी बसवले हे सत्य अहिरांनी स्वीकारावे व जातीचे राजकारण कसे घातक सिद्ध होते याचा धडा घेण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन किशोर तिवारी यांनी केले .
आपले कार्यक्षेत्र असलेल्या केळापूर -आर्णी तसेच मारेगाव व झरी तालुक्यात भाजपला भरपुर लीड मिळाल्यामुळे पराभवाचे घापर आपल्यावर आता हंसराज अहीर फोडणार नाहीत मात्र आता आपल्याच कार्यक्षेत्र असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला मिळालेली लाखावरची लीड याचे श्रेय त्यांनी घ्यावे असा सल्ला किशोर तिवारी यांनी यावेळी दिला कारण ज्यावेळी एक केंद्रीय मंत्री मुबईवरून अमेठीला जाऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव करतात व त्याचवेळी अख्या महाराष्ट्रात एकुलती एक जागा काँग्रेसला चंपुरात येते अशावेळी आता आपल्या पराभवाचे घापर दुसऱ्यांवर न फोडता पक्ष संघटनेत आलेला दुरावा व गटबाजीचा नंगानाज थांबविण्यासाठी सुरवात करण्याची गरज असुन नाहीतर लोकसभेची पुनरावृत्ती भाजपला विधानसभेत होण्याची भीती किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केली .
No comments:
Post a Comment