महाराष्ट्रातील ३ लाख कोटीच्या सहकारी बँका बंद पाडण्याचा अमित शहा यांचा कट :शिवसेना नेते किशोर तिवारी कै बाबाजी दाते महिला बँकेग्रस्त ठेवीदार ग्राहक व कर्मचाऱ्यांशी ११ डिसेंबरला संवाद साधणार
Thursday, December 9, 2021
महाराष्ट्रातील ३ लाख कोटीच्या सहकारी बँका बंद पाडण्याचा अमित शहा यांचा कट :शिवसेना नेते किशोर तिवारी कै बाबाजी दाते महिला बँकेग्रस्त ठेवीदार ग्राहक व कर्मचाऱ्यांशी ११ डिसेंबरला संवाद साधणार
Friday, November 26, 2021
वीज तोडणी सुरूच राहिलं ही उर्जामंत्री नितीन राऊत यांची भुमिका नापिकीग्रस्त भागातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारी-शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवा किशोर तिवारींचे ऊर्जामंत्र्याना निवेदन
वीज तोडणी सुरूच राहिलं ही उर्जामंत्री नितीन राऊत यांची भुमिका नापिकीग्रस्त भागातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारी-शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवा किशोर तिवारींचे ऊर्जामंत्र्याना निवेदन
दिनांक -१८ डिसेंबर २०२१
Sunday, June 20, 2021
प्रताप सरनाईक यांचे प्रेमपत्र - भाजपने शिवसेनेच्या फारकत घेण्याचे आत्मचिंतन करण्याची गरज -किशोर तिवारी
प्रताप सरनाईक यांचे प्रेमपत्र - भाजपने शिवसेनेच्या फारकत घेण्याचे आत्मचिंतन करण्याची गरज -किशोर तिवारी
दिनांक २१ जुन २०२१
मागील १८ महिन्यात ही इतकी जुनी मैत्री का तुटली यावर सत्य परिस्थितीचे व वास्तविकतेचे आत्मचिंतन न करता ही युती मुख्यमंत्री पदावरूनच तुटली यावर जोर देण्यात आला मात्र खरी परिस्थितीचे अवलोकन करणे अत्यंत आवश्यक झाले आहेत ते असे कीं २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपने आपल्या एनडीए मधील घटक पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात संपविण्याचा प्रयन्त सुरु केला त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युती तोडुन स्वबळावर निवडणूक लढविली मात्र पूर्ण बहुमत न आल्यामुळे व पोडापोडी न जमल्यामुळे शिवसेनेच्या घुबडया घेतल्या व सत्तेत आले मात्र २०१४ ते २०१९ च्या काळात भाजपच्या वागणुक फारच बदलेली होती त्याचा अनुभव वारंवार उद्धवजींना आला मात्र २०१९ निवडणुकीमध्ये मोदी -अमित शाह यांनी लहान भाऊ मोठा भाऊ करीत पुन्हा युती केली मात्र २०१९ मध्ये जशी एकखांबी सत्ता भाजपाला आली त्याचवेळी शिवसेनेला कट टू साईज करण्यासाठी सर्व कारस्थान रचण्यात पुन्हा सुरवात समसमान जागेच्या नांवावर १२० जागा त्यातही त्याठिकाणी बहूतेक आपले बंडखोर उभे करून कोट्यवधी रुपये फडणवीस साहेबांनी फेकले मात्र तरीही बहुमत मिळाले नाही त्यानंतरही दिलेले सारे वचन धाब्यावर ठेवत अभद्रपणे सरकार स्थापन करण्याचा लाजिरवाणा प्रयन्त देवेन्द्रजीनी केला व आपली फजीती करून घेतली माञ मागील १८ महिन्यात आपला सखा शिवसेना ज्याच्या कुबडया घेत आपण महाराष्ट्रात अस्तिव निर्माण केले तो एकेकाळचा मोठा भाऊ दूर का गेला यावर एक दिवसही आत्मचिंतन न करता ,आपली सत्ता कशी येणार याचा प्रयन्त करणाऱ्या चिल्लर अल्पबुद्धीधारक भाजपच्या नेत्यांना कसा कळेल कारण आज सर्वांना घेऊन चालणारे महाजन मुंडे नाहीत तर जे समेट आणण्यात सक्षम आहेत अशा नितीन गडकरी यांना भाजपने कट टू नागपुर केले आहे असा टोमणा किशोर तिवारी यांनी मांडला आहे .
आज रोज भाजप शिवसेना संबंधामह्ये हळू हळू विष कालविणारे देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला शिवसेनेच्या युतीमध्ये रस नाही अशी प्रतिक्रिया दिली तर भाजपामध्ये देवेन्द्र टीम चे सर्वात सक्रीय किरीट सोमय्या यांनी विष कालविणारी प्रतिक्रिया दिली आता देवेंद्र टीमचे राणे पिता पुत्र प्रवीण दरेकर राम कदम आशिष शेलार अतुल भातखळकर कोणतीही आवश्यकता नसतांना मागील १८ महिन्यांपासून जशा प्रकारे एकही संधी न गमावता ज्या प्रकारे विकृत प्रतिक्रिया देत आहेत त्याचप्रमाणे प्रतिक्रिया देतील असा विश्वास किशोर तिवारी प्रगट केला .
मागील दीड वर्षापासुन देवेंद्र टीमने केंद्राच्या NIA CBI ED NCB चा वापर करून शिवसेनेला वा महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचा सपाटा लावला आहे वा ज्याप्रकारे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शिवसेनेचा "शवसेना सोनीयासेना" असा उल्लेख करतात त्यामुळे शिवसेने-भाजपा सम्बंधामध्ये दुरावा निर्माण होत आहे मात्र या मुर्खांना महाराष्ट्रात भाजपा सोबत शिवसेना नसली तर लोकसभेत व विधानसभेत खासदार आमदारांची मोठी घसरण होणार हे कळत नाही . शिवसेनेनी महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत जाऊन सत्ता स्थापन केली आहे व उध्दवजी प्रशासनाचा कोणताही अनुभव नसतांना मुख्यमंत्री म्हणुन ज्याप्रकारे या विषम विचारांच्या पक्षासोबत व भाजपच्या केन्द्र सरकार सोबत अतिशय प्रेमाने कोरोना संकटात काम करीत आहेत त्याची नोंद जागतिक पातळीवर झाली आहे व याचा इतिहास साक्षीदार राहणार . शिवसेनेच्या या महाविकास आघाडी मध्ये जाण्याच्या निर्णयावर मतदार कौल देतील मात्र ज्या प्रकारचे सुडाचे व व्यक्तिगत चारीत्र्य हनन बदनामी करण्याचे अत्यंत घाणेरडे प्रकार भाजपच्या देवेंद्र टीमने केले त्याचा साक्षी सुद्धा इतिहास राहणारच असा इशारा भाजपला किशोर तिवारी यावेळी दिला .
आपला भाजपावारी अनुभव सांगताना किशोर तिवारी म्हणाले की "मी २०१२ च्या डिसेंबर मध्ये त्यावेळचे राष्ट्रीय अध्यक्ष वं माझे १९७७ पासुन मित्र नितीन गडकरी यांच्या विनंतीला मान देऊन फक्त त्यांना पंतप्रधान पाहण्याच्या दृष्टीने भाजपसोबत काम करणे सुरु केले मात्र माझा २०१२ ते २०१९ चा अनुभव विश्वासघातांचा राहीला व मी लोकसभेत भाजपाची एकखांबी सत्ता आल्यानंतर त्यांच्याशी फारकत घेत कोणतीही अट वा मागणी न करता माझे १९९९ पासून चे मित्र उद्धवजी ठाकरे यांच्या सोबत सामाजिक चळवळ करण्यासाठी सोबत काम करण्याचे ठरविले मी त्यांच्या पेक्षा थोरला असल्यामुळें त्यांच्याशी फारच अधिकाराने जवळुन चर्चा करण्याची संधी मिळाली . मला त्यांच्या बोलण्यात २०१४ ते २०१९ भाजपच्या वेळोवेळी दिलेल्या वागणुकीचा वा प्रादेशिक पक्ष कट टू साईज करण्यासाठी होत असलेल्या प्रयन्ताचा त्यांचा साक्षात्कार जाणवत होता त्यातच ऐन दिवाळीत आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचा करारच झाला नाही अशी अकालनीय देवेंद्र घोषणेमुळे त्यात प्रचंड भर पडली मात्र आज शिवसेनेचा प्रवास जसा भारतात जसा बंगाल ओरीसा तेलंगाणा आंध्रप्रदेश तामिळनाडू सारख्या एकखांबी सत्ता गाजविणाऱ्या प्रादेशिक पक्षासारखा झाला त्यातच उद्धवजींना राष्ट्रवादीचे शरद पवार सारख्या भारताच्या राजकारणातील पितामह व्यक्तीचा आशीर्वाद मिळाला आहे मला तर असे वाटत २०२४ मध्ये सगळे हे प्रादेशिक पक्ष काँग्रेस व डावे यांना सोबत घेऊन उद्धवजींच्या नेतृत्वात भारताच्या सत्तेवर येतील व २०२४ ते २०२९ या काळात भारताला "भाजपा मुक्त " करून खऱ्या अर्थाने चांगले दिवस आणतील .
किशोर तिवारी
संपर्क -९४२२१०८८४६
===================================================
Thursday, June 17, 2021
सेवा किचन व आभा प्रकल्पा मार्फ़त १८ जूनला घोंसी कोलाम पोडावर कोरोना लसीकरण व खावटी वाटप कार्यक्रम
सेवा किचन व आभा प्रकल्पा मार्फ़त १८ जूनला घोंसी कोलाम पोडावर कोरोना लसीकरण व खावटी वाटप कार्यक्रम
दिनांक -१७ जुन २०२१
नागपूरच्या खुशरु पोचा या रेल्वे मध्ये कर्मचारी असलेल्या व मागील २० वर्षापासुन रुग्णांना व त्यांच्या नातलगांना नागपूर प्रत्येक दवाखान्यात जेवण देण्याचा सेवा किचन या नावाने कोणतीही देणगी न घेता सुरु केलेल्या प्रकल्पाद्वारे मागीलवर्षी १० हजारावर कुटुंबाना तीन महिने अन्नाच्या किट वाटप केले होते व त्यांच्या कामाचे कौतुक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सरळ फोन करून केली होती व महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी मागीलवर्षी पदमश्री पुरस्कारासाठी शिफारस सुद्धा केली होती .यावर्षी सुद्धा पहिल्या टप्प्यात २० मे रोजी सकाळी पांढरकवडा १५०० कुटुंबांना "अन्ना व किराणा " कीट वाटप करण्यात आले व दुसऱ्या टप्प्यात १००० कुटुंबांना "अन्ना व किराणा " कीट वाटप करण्यात आले आहे हा प्रकल्प शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते नामदार एकनाथ शिंदे ,लोकनेते आमदार संजय राठोड , खुशरू पोचा यांच्या सेवा किचन विलु पूनावाला फाउंडेशन , रोहित शेलटकर यांच्या ग्रँड मराठा फाउंडेशन,सलीम खेतानी यांच्या खेतानी फाउंडेशन,जगदंबा देवस्थान ट्रस्ट तसेच शेकडो दात्यांच्या सहकार्याने चालविला जात आहे अशी माहिती "आधार उद्भवाचा " प्रकल्पाच्या संयोजिका स्मिता तिवारी तसेच क्रांतिवीर बिरसा मुंडा ट्रस्टचे आदिवासी नेते अंकित नैताम यांनी कळविले आहे.
गेल्या वर्षभरापासून कोरोना संक्रमणामुळे संपूर्ण जनजीवन, उद्योग व्यवसाय, अर्थव्यवस्थेला ग्रहण लागले असताना माझ्या कार्यालयामार्फत वर्षभरात उपाययोजना व अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या दरम्यान आलेल्या अनुभवांवरून काही व्यवस्था या दीर्घ कालावधीसाठी उपलब्ध झाल्या पाहिजेत व या संकटाचा सामना करताना कोणत्याही अडचणी समोर उभ्या राहू नयेत. भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने आरोग्याच्या सुविधांमध्ये नागपूर-विदर्भ आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने प्रयत्नही करण्यात येत आहेत. यासाठी केंद्र शासन, राज्य शासन, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, आरोग्य सेवेतील तज्ञ डॉक्टरांचे बहुमोल सहकार्यही मिळत असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली .
===========================================================
Monday, May 31, 2021
Saturday, May 22, 2021
विदर्भातील अति दुर्गम भागात कोरोनाग्रस्तांसाठी शिवसेना भाजपा अफलातुन युती - पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाला नितीन गडकरीं कडुन ५ ऑक्सिजन काँसंट्रेटरचे लोकार्पण
विदर्भातील अति दुर्गम भागात कोरोनाग्रस्तांसाठी शिवसेना भाजपा अफलातुन युती - पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाला नितीन गडकरीं कडुन ५ ऑक्सिजन काँसंट्रेटरचे लोकार्पण
दिनांक २२ मे २०२१
एकीकडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच त्यांचे चार सहकारी किरीट सोमैया प्रवीण दरेकर राम कदम अतुल भातखळकर महाविकास आघाडी सरकारला त्यातल्या त्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कोरोना काळात कसे अडचणीत येतील याचा २४ तास प्रयन्त करीत असतात व भाजप सेनेचे संबंध विकोपास नेण्यात प्रयन्तशील असतात त्याचवेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी कोणताही पक्ष जातीभेद न ठेवता कोरोना काळात मदत करीत आहेत व सर्वांना यावेळी घाणेरडे राजकारण करू नका असा निरोप त्यांच्या राज्यातील भाजपा नेत्यांना देत आहेत याच त्यांच्या अविरत प्रयन्तांचा भाग म्हणुन त्यांनी शिवसेना नेते किशोर तिवारी यांच्या मार्फत पांढरकवड्याच्या उपजिल्हा रुग्न्यालयात पाच ऑक्सिजन कॉन्सोन्ट्रेटर देण्यात आले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ वैशाली सातुरवार डॉ संजय तोडासे डॉ. माधुरी कांबळे डॉ. अश्वनी काळे सौ राजेश्री बोबडे प्रभारी सिस्टर अर्चना तोडेकर संजीवनी वंजारी सिस्टर माया खाडे सिस्टर संतोष भाऊ दत्ता येनगंट्टीवार विशाल सिडाम लोहार प्रकाश तायपेल्लीवार तसेच सामाजिक कार्यकर्ते अंकित नैताम नंदकिशोर जैस्वाल बाबू जैनकर संतोष नेताम गणेश कोल्हे विक्रम धुर्वे सुजल गेडाम गणेश तलमले उपस्थित होते .
यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात शिवसेने वतीने शेकडो कोलाम पोडावर व पारधी बेड्यावर तसेच आदिवासी व गरिबांच्या वस्तीत कोरोना लसीकरण कोरोना चाचणी व जाणीव जागरूकता अभियान "आधार उद्भवाचा " प्रकल्पात सुरू करण्यात आला आहे. दिनांक 20 मे रोजी सकाळी पांढरकवडा 1500 denyकुटुंबांना "अन्ना व किराणा " कीट वाटप करण्यात आले. पुढील टप्प्यात दररोज 1000 कुटुंबांना आधार म्हणजे कीट जाणीव जागरूकता शिक्षण देण्यात येणार आहे. हा प्रकल्प शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते नामदार एकनाथ शिंदे ,लोकनेते आमदार संजय राठोड , खुशरू पोचा यांच्या सेवा किचन विलु पूनावाला फाउंडेशन , रोहित शेलटकर यांच्या ग्रँड मराठा फाउंडेशन,सलीम खेतानी यांच्या खेतानी फाउंडेशन,जगदंबा देवस्थान ट्रस्ट तसेच शेकडो दात्यांच्या सहकार्याने चालविला जात आहे अशी माहिती "आधार उद्भवाचा " प्रकल्पाच्या संयोजिका स्मिता तिवारी तसेच क्रांतिवीर बिरसा मुंडा ट्रस्टचे आदिवासी नेते अंकित नैताम यांनी कळविले आहे.
गेल्या वर्षभरापासून कोरोना संक्रमणामुळे संपूर्ण जनजीवन, उद्योग व्यवसाय, अर्थव्यवस्थेला ग्रहण लागले असताना माझ्या कार्यालयामार्फत वर्षभरात उपाययोजना व अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या दरम्यान आलेल्या अनुभवांवरून काही व्यवस्था या दीर्घ कालावधीसाठी उपलब्ध झाल्या पाहिजेत व या संकटाचा सामना करताना कोणत्याही अडचणी समोर उभ्या राहू नयेत. भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने आरोग्याच्या सुविधांमध्ये नागपूर-विदर्भ आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने प्रयत्नही करण्यात येत आहेत. यासाठी केंद्र शासन, राज्य शासन, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, आरोग्य सेवेतील तज्ञ डॉक्टरांचे बहुमोल सहकार्यही मिळत असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली
नितीन गडकरी यांनी मागील वर्षांपासुन कोरोनग्रस्तांसाठी केलेल्या कामाचा आढावा
Saturday, May 8, 2021
लॉक डाऊन काळात मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या वसुलीसाठी हैदौस - उपाशी मरत असलेल्या गरीबांवर होत असलेले अत्त्याचारा रोखा -किशोर तिवारी
लॉक डाऊन काळात मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या वसुलीसाठी हैदौस - उपाशी मरत असलेल्या गरीबांवर होत असलेले अत्त्याचारा रोखा -किशोर तिवारी
Sunday, January 31, 2021
Maharashtra farmers’ Mission seeks special package in Budget
Maharashtra farmers’ Mission seeks special package in Budget
Dated-31 Jan 2021
late Vasantrao Naik sheti Sawalaban Mission {VNSSM} Farmers Body in the Mahrashtra region has demanded a Rs 50,000 crore development package from the upcoming Union Budget.
In view of the plight of the farmers, it was high time that the central government looks at agrarian crisis seriously in Mahashtra and announces a hefty development package, VNSSM President Kishore Tiwari said in a statement on Monday.
VNSSM, an official state govt. advocacy group for farmers, said they have demanded a Rs.50,000 crore package which would take care of the huge backlog for the region, help sustainable crop promotion, support mega micro irrigation schemes and other infrastructure development in the region.
VNSSM has also urged the government to constitute a national-level Commission, which looks into measures to prevent farmer suicides.
Recent reforms introduced by centre failed to address agrarin crisi of mahrashtra ,hence demand specail relief is must in the budget ,tiwari ueged .
Since 2006, the state government has announced two separate packages worth Rs 5,825 crore. This was followed by a loan waiver of Rs 4,600 crore from the central government and Rs 1,100 crore in 2009 by the state government, added Tiwari.
“Yet, suicides have not stopped and the region continues to be backward and the sentiments are strongly in favour of a special package is must ,” Tiwari pointed out.
The major demands of the farmers include- minimum support price (MSP) for cotton and soybean to match the cost of production with a 50 per cent profit margin, new crop loan to farmers after waiving their existing debt dues, bringing new technology in agriculture and irrigation.
Financial assistance for farm widows and higher education facilities to their wards.
Finance Minister Ms.Nirmala Sitaraman is likely to present the union budget of 1st feb,2021.
==============================================