"विदर्भाचे कृषी संकट - यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या सख्या जावयाने केली आत्महत्या":उमरी किन्हाळा येथील भिक्कु जाधव यांच्या घरी किशोर तिवारी भेटी दरम्यान कुटुंबीयांनी मोदी सरकारची पापांची लक्तरे टांगली
दिनांक -१ ऑगस्ट २०२६
https://youtu.be/c831-QvEDP4?si=q9TQsecS9q3MTK-d
विदर्भातील कृषी संकटाचे दाहकता आता सर्व दूर दिसायला लागली आहे यवतमाळ जिल्ह्यात २०२६ आतापर्यंत १४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असुन त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांचे जावई भिक्कू जाधव यांनी मागील आठवड्यात दुबार तिबार पेरणी व कर्ज माफी देण्यास विलंब होत असल्यामुळे शेतामध्ये आत्महत्या केली .आत्महत्यानंतर पालकमंत्री संजय राठोड यांच्या सुविद्य व संवेदनशील पत्नी उमरी किनाळा येथे भेट दिली व दहा हजार रुपयांची मदत केली या हे गाव राळेगाव मतदार संघात येत असल्यामुळें व भिक्कू जाधव हे आदिवासी मंत्री अशोकभाऊ उईके यांचे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांनी तात्काळ भेट दिली व कापूस उत्पादक शेतकर्यांच्या अडचणी सरकार दरबारी रेटण्याचे आश्वासन दिले परंतु यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ,उपविभागीय अधिकारी वा तहसीलदार यापैकी कोणताही अधिकाऱ्याने भेट दिली नाही ते कमिशन खाण्यात व्यस्त असल्याचे शेतकरी नेते रमेश चव्हाण यांनी यावेळी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली .शेतकरी नेते किशोर तिवारी ,आदीवासी नेते संतोष नैताम ,शेतकरी नेते प्रम चव्हाण संतोष नैताम व मोरेश्वर वातीले यांनी भेट दिल्यावर भिक्कू जाधव यांच्या दोन्ही मुलांनी व कुटूंबियांनी कृषी संकटाची वास्तविक कारणे जगासमोर ठेवली त्यांचा संपूर्ण संवाद YOUTUBE वर किशोर तिवारी यांनी टाकला आहे .
किशोर तिवारी यांच्याशी भिक्कु जाधव यांच्या कुटुंबीयांचा संवाद
आपण उमरी किनाळा या गावी आलो आहे. या गावात १० दिवसापूर्वी आत्महत्या झाली शेतकऱ्याची, ज्याच्यावर कर्ज होतं मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज होते व पेरलेले बियाणं बुडालं होतं. डबल बियाणं लावलं तरी बुडालं होतं, तर शेतात त्यांनी आत्महत्या केली. हा त्यांचा मुले नाव विनोद भिक्कू जाधवव मनोज, मनोज भिक्कू जाधव. मनोज भाऊ, लहान मुलगा आहे व आई यांचा पतीने आत्महत्या केली आहे. ..
संजय राठोड जे पालकमंत्री आहे, ते यांचे जावाई लागतात का? भाऊ देवराव राठोड जे संजय राठोडचे भाऊ काका आहे. तर तुमच्या घरी आत्महत्या झाल्यानंतर कोणते कोणते अधिकारी आणि कोणते कोणते मंत्री आले?आदिवासी मंत्री अशोक उईके आले होते. अजून कोण आल होतं?
तहसीलदार आले होते का? मग मदत झाली का? कलेक्टर साहेब आले होते का? नाही, सरकारने नियम केला आहे का उमरी किनाळा r साहेबांना शेतकरी आत्महत्या झाल्यावर याला पाहिजे? आले होते? तहसीलदार नाही आला होता साहेब. पटवारी... पटवारी आला होता. म्हणजे उईके साहेब आले होते, उईके साहेब आले होते. मंत्र्यासोबत पटवारी आला होता. मला एक सांगा, तुम्ही या तिन्ही... आपल्या किनाळा गावातील महीला शेतकरी ज्या आहे, त्या शेती करतात.आणि त्यांना सगळं माहित आहे कीटकनाशक कोणतं टाकायचं, बियाणं कोणतं टाकायचं आणि तुम्ही मला सांगा, या गावाचा मला खूप अनुभव आहे. इथं शेती करणाऱ्या बायांचा अभिमान आहे, पण आता शेतकरी आत्महत्या झाली त्याला काय कारण असल?
काय कारण असल? म्हणून दोन-तीन वेळ... दोन-तीन वेळा पेरणी केलं, ते बियाणं काही उगवलं नाही. हा, मग तो शेतामध्ये जाऊन त्याच्या म्हणजे विचारामध्ये होता तो. म्हणजे माल उगवला नाही बा. पण परिवार हे एकत्र कुटुंब, सर्व कुटुंब एकत्र... तेच चालवत होते ना. परिवार त्यांच्याच हातात होतं, कुटुंब त्यांना चालवायचं होतं. तीन पोरं, नातू शिकत होते. मोठा नातू इंजिनियरिंग करत आहे. दोन पोरं इथं शिकत... दोन नातू इंजिनियरिंग करत आहे? करत आहे. दोन लहान आहे, एक मुलगी, एक मुलगा मोठा. पैसा नाही, पण आता बंजारा समाज शेती करणार आहे. हो, आणि मागचं काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा सुद्धा अडचणीत होता. १२ वर्षापासून नवीन सरकार आलं, तर काही परिस्थिती बदलली आहे का? काहीच नाही, काहीच नाही परिस्थिती. कापसाला भाव नाही, कशालाच भाव नाही. कोणत्याच शेतीत... कोणत्याच पिकाला भाव नाही. आपल्या पिकाला भाव राहिला नाही. खताचे २००० झाले, बियाण्याचे आकाशाला भिडला आहे
खताचे भाव, बियाण्याचे भाव वाढू नये. कापसाला... कापसाला भाव नाही, भाव नाही.बियाणे जे रुपये ३५० भाव आहे, २२०० बॅग वर गेली, २२००...
मला एक सांगा, तुम्ही गावात शेतकरी म्हणून कोणी सुखी आहे का? काहीच नाही त्याच्यामध्ये. नाही, या जिल्ह्यात दोन मंत्री आहे बंजारा समाजाचे. एक आहे इंद्रनील नाईक, दुसरा तुमचा जवळचा नातलग संजय राठोड. याच्यामुळे बंजारा समाज, शेतकरी अडचणीत आहेत. त्याचा काय फायदा होत आहे का? तुम्हाला वाटते का काही फायदा... काहीच फायदा होत नाही. मला एक सांगा...संजय राठोड साहेबाला निरोप दिला होता का? बाई आली होती, बाई आली होती, बाई आली होती. त्याच्या मुलीची काहीतरी डिग्री भेटली, ते वकील मुलीची डिग्री भेटली, वकील झाली. तिथं जाऊन होते मामी आली होती भेटायसाठी. मामा म्हणजे संजय राठोड...तिथे जाऊन होते. मामी आली होती भेटायला. मामीने काही मदत केली? किती केली? दहा हजार रुपये मामीने दिली. पण मामा कोट्यवधी रुपये कमवत आहे, हे माहित आहे का तुम्हाला?नाही माहित आहे, पालकमंत्री आहे तो. नातवाला शिक्षणाला पैसे नाही, आम्हाला बसा... नातवाला शिक्षणाला पैसे नाही. नातवाला शिक्षणाला किती पैसे लागतील इंजिनियरिंग करायसाठी? किती पैसे लागतात? अडीच ते तीन लाख रुपये कमीत कमी. नाही, तुम्ही सांगा ना, तुम्ही विषय काढला ना, बोला ना आता.
] नाही, मला सांगितलं तर मी मदत करणाऱ्याला बोलू शकतो. नाव काय पोराचं? शिवम. कोणत्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये? वैनगंगा भेटलं होतं, काही चांगलं कॉलेज नाही भेटलं, चांगलं... पैसे जास्त. किती फी भरली? कमी आहे. किती फी भरली? फी भरायचं नको, ती आता वार्षिक खर्च पूर्ण एक-दोन लाख रुपये लागते. हो, काय खोलीचे भाडे राहते? कुठं रूम करून? रूम करून. रूमचा भाडा किती आहे? रूमचा भाडा ३००० रुपये, ३००० रुपये रूमचा भाडा. मेसचा ३५०० रुपये. मेस..., येण्या-जाण्याचा खर्च १०,००० झाले. म्हणजे पूर्ण १०,००० रुपये महिना पाठवावा लागतोय. १०,००० रुपये या पोराला लागते. अजून या दोन्ही पोराला म्हणजे आत्महत्या करायला शिक्षण, खाजगी शिक्षणच कारणीभूत होऊन जाते? नाही, खाजगी... खाजगी शिक्षण आणि दवाखाना होऊन जाते यांच्या... कमीत कमी ३५,०००...
गाडीत जाते किलोमीटर मधेच, नाही का १५,००० रुपये... १५,०००.
एकदम चांगला विषय काढला. शिक्षणामुळे, शेतकरी खाजगी शिक्षणामुळे त्रासून गेला आहे, आणि खाजगी दवाखान्यामुळे गेला. आणि मागच्या १२ वर्षात जेवणाचा खर्च घरात वाढला का? वाढला खर्च वाढला. तेलाचे भाव वाढले, साखरेचे भाव वाढले, सगळ्याच किमती वाढल्या. पण आपल्या कापसाला, तुरीला कशाला भाव नाही आहे. आमचे शेतात पिकवतो, त्याच्यापेक्षा डबल खर्च आम्हाला लागत आहे. शेतात पहिले जेवढा खर्च लागता, त्याच्यापेक्षा डबल खर्च लागत आहे शेतीवर लागत. आता तुमचं शिक्षण किती झालंय? बारावी. करू नका तुम्ही. जर आहे ना, हो. जरंगले चांगली शेती करणारे आहेत, परंतु जरंग मध्ये कधी सुखी आहे का? परिस्थिती आहे, परिस्थिती तिथं पण आहे. हीच परिस्थिती कास्तकार लोकांनी सगळीकडे हीच परिस्थिती आहे.
मला एक सांगा तुम्ही... आता तुमच्या घरावर आत्महत्येचं संकट आलं आणि पुष्कळ लोकांवर आत्महत्येचं संकट येत आहे. शेतकऱ्यांनी अशी आत्महत्या करायला पाहिजे का घराने?
तर नाही पाहिजे. पण ज्यांना ज्याच्यावर जास्त हे राहते लेन-देन, त्यांना समजते का एवढं? तुम्हाला एकूण शेती किती आहे?
तीन लोक आहे, तीन-तीन एकर शेती आहे. तीन एकर शेतीमध्ये काही होते का? आता... जर सरकारला सांगायचं राहिलं, काका तुमचा हे जवळचा माणूस संजय राठोड मंत्री आहे, तर राहू द्या त्यांना, पण बंजारा समाजाकडून, शेतकरी समाजाकडून सरकारला काय सांगावं लागल? कारण त्याच्या हातात तर नाही आहे, तो दुसरा मंत्री आहे, पण केंद्रात मोदीचं सरकार आहे, त्याला काय बोला... बोला, तर त्या सरकारने लागवडीचा खर्च कमी करायला पाहिजे, पत पुरवठा कमी करायला पाहिजे, शेती मालाला भाव द्यायला पाहिजे. याच्यापैकी काय बोला... कापसाला भाव वाढला पाहिजे, तुरीला भाव वाढला पाहिजे, गव्हाचे शेतीत जे पीक आहे, त्याचे सगळ्याचे भाव वाढले पाहिजे. गहू निघला तर यंदा गहू नाही, डायरेक्ट १५०० न १६०० घेऊन आले. गहू १५०० रुपये क्विंटलने गेला तुमचा? हो, गहू लावता तुम्ही इथं? गहूही लावता, १५०० रुपये क्विंटलने गहू गेला. त्याचा गहू घ्यायला गेला तर ३५००... ३५०० किलो? तुम्ही बाजारात घ्यायला गेले तर ३२०० च्या भावाने भेटतील. हो, आम्ही विकलो तर १५०० च्या भावाने. तुम्ही विकला तर १५०० भाव.
करताना कस आहे माल? माल आहे, साखर... सर्व माल आपलं जे आहे ते कमी-जास्त करा. पण मला एक सांगा...
तुमचं लग्न होऊन किती दिवस झाले? १० वर्ष. १० वर्षात तुम्ही किनाळा पाहिला, या १० वर्षात तुम्हाला काही फरक वाटताय का?
नाही, तेच परिस्थिती आहे, कास्तकाराची परिस्थिती तेच आहे. आता अजून वाढली, कास्तकाराची परिस्थिती अजून बेकार झाली. खताचे भाव वाढले,
बियाणाचे भाव वाढले, पण आपल्या कापसाचे भाव अजून कमी झाले. १० वर्षापूर्वी ८ हजाराने विकलं होतं, यावर्षी किती विकलं?
दरवर्षी कापसावर बोंडअळी येते. काय फायदा? काहीच फायदा नाही. यावर्षी तुम्हाला १० एकरात किती क्विंटल झाला कापूस? ३० क्विंटल.
३० क्विंटल. बोंडअळी आली? बोंडअळी आली.
यावर्षी किती वेळा पेरणी करायला लागली? तीन वेळा... तीन वेळा. तुम्हाला पीक विमा भेटला का यावर्षाला? एकही वर्षी नाही भेटत आहे.
गेल्या वर्षी नाही... गेल्या वर्षी नाही भेटले. नुकसान भरपाई काय आली होती? नाहीच नाही. आमच्या वावरातून पूर जाते, आम्हाला नाही भेटत, आणि ज्याच्या वावरातून पूर नाही जात, त्याला पैसे भेटते. म्हणजे तुमच्या वावरातून पूर जाते... पूर जाते, वाहून चालले जाते पराठ्या, पण आम्हाला काहीच लाभ भेटत नाही. आणि ज्याच्या शेतात जात नाही, वाहून जात नाही, यांना नाला बी नाही... त्याला भेटते... त्याला भेटते. हा न्याय कोण करताय असा? म्हणजे उलट-सीध ते आम्हाला काहीच माहित नाही. आता आम्ही कास्तकार लोक, आम्हाला काय घरी... ते वावरात येते, पाहून चालले जाते, लिहून चालले जाते. आम्हाला काहीच कळत नाही, तिथे जाऊन आम्ही ते पाहत नाही, आम्हाला काही वेळ भेटत नाही. मग याला तर म्हणते आंधळा राजा, हे आंधळा राजा आहे का सगळं?
पण आता परिस्थिती कशी बदलल? हे शिक्षणावर एवढा खर्च होतय, आरोग्यावर एवढा खर्च होत आहे, करता करता धरता माणूस आत्महत्या करून घेत आहे. तुम्हाला याला कारण काय वाटते? एक कर्ज पाहिजे, तर देवाच्या शपथेने सांगा कारण काय आहे, याची परिस्थिती काहून झाली? खर्च... खर्च वाढले, शेतीचे खर्च वाढले, शिक्षणाचे खर्च वाढले आणि गव्हर्नमेंट कडून काहीच फायदा नाही आहे आपल्याला. आपल्या मालाला कमी भाव भेटते, त्याच्या मालाला जास्त भाव आहे. आता सुरुवातीला कास्तकार विकले, ७००० ने विकते, नंतर भाव वाढून जाते. कास्तकाराचा माल नंतर १०,०००... पण मला एक सांगा, सरकार म्हणते चांगले दिवस आले, तर चांगले दिवस कोणाचे आले आहे? सरकारचे... सरकारचे आले आहे.
सरकारचे चांगले दिवस आले. सरकारचे चांगले दिवस...
सरकारमध्ये कोण आहे?
सरकारमध्ये सर्व गद्दार लोक आहे. गद्दार नाही मानत आहे, मोदी साहेब आहे, ते राम मंदिर बांधलं त्यांना, तर झालं ना?
आता राम मंदिर बनल्यावर तुमचे चांगले दिवस नाही आले का? मंदिर दान भेटत आहे ना, ते दान चोरी चालला ना? आपण जे दान करतो ना, ते दान पण नाही का चोरून घेऊन चालले. उईके साहेबांना काही मदत दिली नाही? आदिवासी मंत्री उईके साहेब या मतदारसंघाचे आमदार आहे, त्यांनी शेतकरी आत्महत्या झाल्यावर तुमच्या घरी भेट दिल्यावर काही मदत दिली का?
कर्ज माफ करून देतो म्हणे ते, असही होत आहे तसही होत... कर्ज माफ करून देते म्हणे? हो, ते असही होत आहे.
नाही, पण झालं का कर्ज माफ? अजून नाही झालं. बाबाचं त्याच्यामध्ये आलं आहे, त्या लिस्ट मध्ये आलं, त्या यादीमध्ये त्याचं नाव आलंय. त्याचं नाव... कोणाचं नाव? भिक्कू पांडू जाधव याचं नाव आलंय. पण त्याला कर्जमाफीत नाव आलं आहे आता?
आलंय... आत्महत्या केल्यानंतर, दिवसानंतर. उशीर झाला, म्हणजे पहिले नाव आलं असतं तर वाचले असते ना? वाचले... वाचले. पण आता सरकारला काय बोला? हे तर जगात जाईल तुमचं.
पत्तरची लकीर... आता हे तुम्ही जे मूळ मुद्दे मांडले, की सरकारनं धोरणं बदलली पाहिजे. तुम्हाला घाम फुटला होता, म्हणून मी फॅन लावला.
तुमच्या परिस्थितीमुळे घाम फुटला, म्हणून मी म्हणलं फॅन लावून द्यायला पाहिजे. तुम्ही आता उठा मशाल घेऊन...
तुम्ही लावा मशाली. या गावात कडून मला खूप अपेक्षा आहे. रमेश चव्हाण मला सांगितलं, की तुमचा जो कार्यकर्ता होता, त्यानं आत्महत्या केली जाधव. नको, मी म्हणलं अरे मला तर माहित नाही पडलं, तर आपण प्रयत्न करू त्या पोराचा. माझा नंबर त्या पोराला देऊन द्या. शिक्षणासाठी जेवढी मदत होऊ शकते, ते आपण करू. चला माझा ... नमस्कार.
संवाद पुर्ण
-------------------------------------
भाडउमरीच्या रुपेश अचलेवार यांची आत्महत्या मात्र मंत्री आमदार जिल्ह्याधिकारी उपविभागीय अधिकारी यांनी भेट दिली नाही
केळापुर तालुक्यातील भाडउमरीच्या ३५ वर्षाचा रूपेश नरसिंग अचलेवार यांनी मागील आठवड्यात आत्महत्या केली शेतकरी नेते किशोर तिवारी ,आदीवासी नेते संतोष नैताम ,शेतकरी नेते प्रम चव्हाण संतोष नैताम मनोजभाऊ गावंडे व मोरेश्वर वातीले यांनी भेट दिल्यावर त्यांच्या निराश आई वडील व काकांनी आपल्याकडे मंत्री आमदार जिल्ह्याधिकारी उपविभागीय अधिकारी यापैकी कोणीही भेट दिली नाही भाजपचे मालक सुद्धा आले नाही कोणतीच मदत मिळाली माही अशी तक्रार केली .कापसाला भाव मिळाला नाही बाजारातुन पैसे घेऊन बँक ऑफ महाराष्ट्र याचे पीककर्ज भरले व बियाणे आणुन दोन वेळा पेरले मात्र पाऊस वेळेवर आला नाही म्हणुन प्रचंड तोटा झाला ,कर्ज माफीच्या यादीत नाव नसल्यामुळे आत्महत्या केली असल्याची तक्रार नरसिंग आचलेवार केली .
२००४ सारखी कृषी संकटाची परिस्थिती -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमरी किन्हाळा येथे भेट द्यावी -किशोर तिवारी
शेतकरी आत्महत्या व विदर्भाचे कृषी संकट तसेच अती भ्रष्ट कोलमडलेले प्रशासन मस्तवाल अधिकारी २० ते ३० टक्के कमीशन उघड उघड पाने घेणारे मंत्री आमदार यान जाब विचारण्यासाठी आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रमाणे आता पंतप्रधान नरेंद्र मोहिम यांनी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याला भेट देऊन विशेष पॅकेज द्यावे अशी मागणी शेतकरी नेते कीअशोर तिवारी यांनी आज उमरी किन्हाळा येथे केली
---------------------------------------------------------------------


No comments:
Post a Comment