दूध भेसळ करणाऱ्यांवर आता आजन्म कारावासाची शिक्षा - शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार : किशोर तिवारी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकार चे आभार ...!
भेसळयुक्त रासायनिक दूध बनवून समाजाचे शोषण करणाऱ्या समाजकंटकांना आळा बसणार ....!!
नागपूर, देि.६डिसेंबर २०१८
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकार चे आभार ...!
भेसळयुक्त रासायनिक दूध बनवून समाजाचे शोषण करणाऱ्या समाजकंटकांना आळा बसणार ....!!
नागपूर, देि.६डिसेंबर २०१८
दुधामधील भेसळ थांबविण्यासाठी अाजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्या साठी राज्य सरकारने केलेल्या कठोर कारवाईचे स्वागत स्व. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष व शेतकरी नेते श्री किशोर तिवारी यांनी केले आहे. शेतकरी मिशन ने या कठोर कायदयासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व प्रथम हा कायदा अमलात आणून एक भक्कम उदाहरण जगा समोर ठेवले होते. त्याच धर्तीवर आता आपल्या राज्यातही हा कठोर कायदा अस्तित्वात आला आहे.
शेतीसाठी पूरक उद्योग असलेल्या दुग्ध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे व ग्रामीण अर्थव्यवस्थेला कृत्रिम रासायनिक दूध हा एक अत्यंत मोठा धोका सध्याच्या परिस्थितीत निर्माण झालेला असून भेसळयुक्त व रासायनिक पदार्थ वापरून तयार करण्यात आलेले भेसळयुक्त दूध समाजासाठी एक फार मोठे आव्हान ठरले आहे. मोठे मोठे खाजगी दूध विक्रेते व कंपन्या गेल्या चार दशकांपासून समाजाचे शोषण करीत असून सामान्य माणसाला एकी कडे फटका बसत आहे दुसरी कडे भेसळीचे गंभीर परिणाम आरोग्य व जीवन मानावर होत आहे. दुधाचे खरे उत्पादक शेतकरी योग्य भाव न मिळाल्या ने हवालदिल झाले आहेत. ग्रामीण क्षेत्रातील अर्थ व्यवस्था कोलमडून शेतकरी आत्महत्या वाढण्याचे दुर्दैवी प्रकार गेल्या दोन / तीन दशकांत दिसून येत आहेत. दूध व दुग्धजन्य पदार्थांची भेसळ करणारे समाजकंटक या साठी प्रामुख्याने जबाबदार आहेत व सरकारी अधिकारी सुध्दा आज पर्यंत डोळेझाक करीत होते.
त्यामुळे दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे व ग्रामीण अर्थव्यवस्थेचे फार मोठे नुकसान होत असून खऱ्या दुधाचे रास्त भाव न मिळत असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था संपूर्णपणे कोलमडून पडली होती. यासाठी राज्य सरकारने आता अत्यंत धाडसी व स्वागत पूर्ण निर्णय घेऊन दुधात होणारी भेसळ ही एक गंभीर व दखलपात्र अजामीनपात्र अपराध घोषित करण्यात आला असून त्यासाठी आजन्म कारावास ठोठावण्या ची तरतूद करणारा नवीन कायदा महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाने पारित केला असल्यामुळे आता शेतकऱ्यांचे व ग्रामीण अर्थव्यवस्थेला पूरक असे स्वागतार्ह पाऊल सरकारने विधिमंडळाच्या एकमताने उचलले आहे.
दुधात होणारी भेसळ नागरिकांच्या शरीरास अपायकारक अशी आहे. परंतु पैसे कमावण्याच्या लालसेपोटी खाजगी कंपन्यांनी रासायनिक दूध उत्पादन करून शेतकऱ्यांना व ग्रामीण अर्थव्यवस्थेला वेढीस धरले होते . संपूर्ण भारतात होणारे खरे दुग्ध उत्पादन व प्रत्यक्षात होणारी दुग्ध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री यामध्ये दहा पटी पेक्षा जास्त अशी प्रचंड तफावत दिसून येत असून ही कठोर शिक्षा असलेला कायदा पूर्वी नसल्याने हा गोरख धंदा राज रोस पणे सुरू होता . ग्रामीण क्षेत्रातील खरे दुग्ध उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. त्यामुळे राज्य सरकारने कठोर पावले उचलून आता या अपराध्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी कायद्यात सकारात्मक परिवर्तन करून एक फार मोठे धाडसी पाऊल उचलले असल्याने शेतकरी व ग्रामीण जनतेने सहर्ष स्वागत केले आहे.
दुधातील भेसळ अन्न विषबाधा आणि इतर जठरांच्या समस्या निर्माण करीत आहे. त्याचे उच्च क्षारीय स्तर शरीराच्या अवयवाना देखील नुकसान करून प्रथिने नष्ट करीत आहे. इतर कृत्रिम घटक अनेक विकार, हृदय समस्या, कर्करोग किंवा मृत्यू देखील ओढावित आहेत. युरियासह मिसळलेले दूध पिण्याचे तत्काळ प्रभाव, कॉस्टिक सोडा आणि फॉर्मुलीन गॅस्ट्रोएन्टेरिटिस गंभीर स्वरूपाचे आहे, दीर्घकालीन प्रभाव जास्त गंभीर असून या समस्येवर उपाययोजना करण्यात आली असून या कठोर कायदा मुळे आता शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास शेतकरी जनआंदोलना चे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे.
========================================================
No comments:
Post a Comment