विदर्भातील आदीवासी व दलीत शेतकऱ्यांच्या आत्त्महत्या सरकारला चिंतेचा विषय:सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा -किशोर तिवारी
दिनांक -१० डिसेंबर २०१८
यवतमाळ जिल्हातील पाथरी येथील दलीत कोरडवाहू शेतकरी प्रेमदास ताकसांडे यांच्या या पंढरवाड्यातील आत्महत्येनंतर आठवड्यात या घाटंजी तालुक्यातील जाम येथील आदीवासी कोरडवाहू शेतकरी मारोती आडे व मारेगाव तालुक्यातील बामबर्डा येथील दलीत कोरडवाहू शेतकरी शनिदास वाघमारे यांची झालेली आत्महत्या राज्यात विदर्भ मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवरील प्रचंड नापिकीचे संकटाचा परिणाम असुन सरकारला चिंतेचा विषय असल्याने या दुष्काळग्रस्त व नापिकीग्रस्त अडचणीच्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी जाम , वडकी व बामबर्डा आत्महत्याग्रस्त परिवारांना भेट दिल्यांनतर व्यक्त केली आहे .
जाम व बामबर्डा येथील शेतकऱ्यांनी किशोर तिवारी संवाद साधल्यानंतर दुष्काळग्रस्त व नापिकीग्रस्त अडचणीच्या शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा ,आरोग्य सुरक्षा , पाल्याना शिक्षण सुविधा वारंवार सूचना देऊनही प्रशासन देत नसल्याचे सत्य समोर आले आहे यावर्षी या दशकातील सर्वात कमी कापसाचे पीक कोरडवाहु क्षेत्रात झाले असुन दिवाळीपूर्वीच सर्व कापसाची उलंगवाडी झाली आहे सर्वच शेतकऱ्यांना सरासरी कापसाचे उत्पन्न दिलेल्या माहीती नुसार २ ते ३ क्विंटल आले असल्याने सरकारने त्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असतांना रोजगार हमी योजनेची ,कृषी ,वन व ग्रामविकास विभागाची एकही रोजगाराची संधी देणारी कामे सुरु नसुन मस्तवाल अधिकारी परीस्थितीचे गांभीर्य जाणून बुजून सरकारला मांडत नसल्याची तक्रार किशोर तिवारी यांनी मुख्य सचिव महाराष्ट्र यांनी केली आहे .
दुष्काळग्रस्त व नापिकीग्रस्त भागात आदिवासींना तात्काळ खावटी कर्ज वाटप करण्यात यावे ,मागेल त्याला काम तसेच सर्व दलीत आदीवासी मागासवर्गीय कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रत्येक कुटुंबाला ३५ किलो धान्य अन्नपूर्णा योजनेत देण्यात यावे . सर्व शेतकऱ्यांना नवीन पिक कर्ज
थकीत सर्व कृषी कर्ज विनाअटीने सरसकट माफ करून देण्यात यावे ,सर्व दुष्काळग्रस्त व नापिकीग्रस्त पाल्यांचे संपूर्ण शिक्षण शुल्क व शिक्षण खर्ज ,सर्वांना सरसकट पुढच्या खरीप हंगामासाठी प्रति एकरी कमीतकमी ५ हजार नगदी अनुदान व वीज वितरण विभागाकडून थकीत माफीसह मुंबई व नागपूर सारखा २४ तास अखंडित वीज पुरवढा देण्याची शिफारस कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशन करणार असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी दिली .
सध्या ष्काळग्रस्त व नापिकीग्रस्त कापूस या पिकाखाली ४४ लाख हेक्टरचे क्षेत्र असून मागील वर्षी सर्वच ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता त्यामुळे कापसाचे उत्पन्न प्रचंड प्रमा णात घटले होते यावर्षी मात्र मान्सुनने दिलेला धोका ,पर्यावरणात झालेला प्रचंड बदल ,रासायनिक शेतीने जैविक तत्वे गमावलेली जमीन ,निकामी झालेले बी टी बियाणांचे तंत्रद्यान ,जमिनीमध्ये ओलावा रोखण्यासाठी सेंद्रिय शक्तीची क्षमता नसल्यामुळे ५० लाखावर कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा प्रचंड आर्थिक अडचणीत आल्याची माहीती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली .

. या खरीप हंगामात सुरवातीला ३५० ते ४०० लाख क्विंटल कापसाची विक्रमी उत्पादन राज्यात होणार असा विश्वास होता मात्र पाऊसाने दगा दिल्याने व प्रचंड उन्हामुळे कापसाचे उत्पादन १८० लाख क्विंटलच्या घरात येणार असा अंदाज आहे यामुळे शेतकऱ्यांचे कमीतकमी रु आठ हजार कोटीचे नुकसान होणार अशी भीती तिवारी यांनी व्यक्त केली विदर्भ व मराठवाड्यातील सुमारे ५० लाखावर कापुस उत्पादक शेतकरी दशकातील सर्वात मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत यामुळे या गंभीर प्रश्न्नावर सरकारने दीर्घ व अल्प मुदतीचा पर्याय देण्याची गरज आहे त्यामध्ये संपुर्ण विदर्भ मराठवाड्यातील ४० लाख हेक्टरमध्ये कमी पाण्याचे कापसाचे सरळ वाण ,तुरी ,ज्वारी अशा अन्न जातीय पिकांना सरळ नगदी अनुदान देऊन लावण्याचा कार्यक्रम लागु करण्याची मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.
= ======================================
No comments:
Post a Comment