Monday, February 25, 2019

शाश्वत परंपरागत शेती व पर्यावरणाच्या पुनर्स्थानेकरीता अती पाण्याचे व रासायनिक शेतीप्रधान नगदी पीक घेणाऱ्यांनी नगदी अनुदान सोडावे -किशोर तिवारी


शाश्वत परंपरागत शेती व पर्यावरणाच्या पुनर्स्थानेकरीता अती पाण्याचे व रासायनिक शेतीप्रधान नगदी पीक घेणाऱ्यांनी नगदी अनुदान सोडावे -किशोर तिवारी 
दिनांक -२६ फेबु .२०१९
आज जगातील ७० टक्के प्रदूषण रासायनिक शेतीमुळे होत असुन हरीत क्रांतीच्या नावावर मातीच्या कणाकणात व पाण्याच्या प्रत्येक थेंबात विष ओतणाऱ्या रासायनिक कीटकनाशक व खतांमुळे झाले असुन जगात मूठभर भांडवलदार देशानी पर्यावरणाचे व जीवसृष्टीचे अतोनात नुकसान केले असुन आता पहिल्यांदा राष्ट्रीय स्तरावर मोदी सरकारने  दिलेल्या अंतरीम अर्थ संकल्पात शेतकऱ्यांना २ हेक्टर ची मर्यादित जमीन धारणा असणाऱ्या वार्षिक ६००० रुपये नगदी अनुदानाची  घोषणा केल्यामुळे ही मदत सिंचन क्षेत्रातील ऊस द्राक्ष बी टी कापुस या सारख्या अती पाण्याचे व रासायनिक शेतीप्रधान नगदी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना फारच तोटकी असल्याची होत असलेली प्रचंड ओरड रास्त असुन या सर्व शेतकऱ्यांनी शाश्वत परंपरागत शेती व पर्यावरणाच्या पुनर्स्थानेकरीता अती पाण्याचे व रासायनिक शेतीप्रधान नगदी पीक घेणाऱ्यांनी नगदी अनुदान सोडावे अशी मागणी कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे . 
किशोर तिवारी हे विदर्भातील कोरडवाहू आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या हिताकरिता मागील ३० वर्षांपासून चळवळ आहेत व अती पाण्याच्या व  रासायनिक कीटकनाशक व खतांच्या प्रचंड वापरामुळे जमीनीतील व पर्यावरणातील प्राणवाषूचे व प्रदूषणाचे संकट निर्माण झाले असुन याला भांडवलदार देशानी पर्यावरणातील फरक वा कालयमेट चेंज असे नाव देऊन मूळ विनाशकारी विषयुक्त शेतीपासून कट रचुन दूर ठेवले आहे त्यामुळे मातीमध्ये कार्बन टक्केवारी कमीतकमी ३ ते ४ टक्के व पाणी विषमुक्त करण्यासाठी सरकार सोबत भांडत असुन त्यांनी नगदी अनुदान देतांना एकच नागडी वर्षानुवर्षे घेणाऱ्या अती पाण्याच्या व  रासायनिक कीटकनाशक व खतांच्या प्रचंड करून ऊस द्राक्ष बी टी कापुस या सारख्या अती पाण्याचे व रासायनिक शेतीप्रधान नगदी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी  शाश्वत परंपरागत शेती व पर्यावरणाच्या पुनर्स्थानेकरीता आपले अनुदान सोडावे व सरकारने धान्य ,डाळ व तेलबियाणे तसेच नैसर्गिक शेती करणाऱ्या वाढून द्यावे अशी मागणी पुठे रेटली आहे. 
"आपणास शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने मंत्रिपद देऊन सल्ले देण्यास  नियुक्त केले मात्र शेतीचे सर्व सल्ले सरकारला रासायनिक कीटकनाशक ,जैविक बियाणे व कृषी व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचं देतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली .   अर्थव्यवस्था स्वीकारणाऱ्या भारतात विश्व व्यापार संघटनेच्या करारानुसार सर्व सरळ वा इतर मार्गाने देण्यात शेत असलेले अनुदानात कपात करणाऱ्या सरकारने एक ऐतिहासिक सुरवात केली असुन आता याला सकारात्मक टोकाला घेऊन जाणे अत्यन्त गरजेचे असुन मात्र सर्व राजकीय पक्ष मूळ प्रश्नाला का हात लावत नाहीत "असा सवाल किशोर तिवारी यांनी यावेळी उपस्थित केला . 
विकसित वा विकासशील देशासमोर दररोज उपस्थित होत असलेले आरोग्याचे प्रश्न तसेच पर्यावरण व पाण्याचे गंभीर संकट याचे मूळ मातीच्या कणाकणात व पाण्याच्या प्रत्येक थेंबात विष ओतणाऱ्या रासायनिक शेतीत असुन मात्र यावर सरकार तोडगा का काढत नाही यातच शेतकरी चळवळीच्या नेत्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्यात सतत धान्य ,डाळ व तेलबियाणे तसेच नैसर्गिक शेती नगदी अनुदानाची मागणी रेटली त्यांनी केलेला विरोध अकालनीय असुन  शेतकरी चळवळीच्या नेत्यांचा सरळ अनुदानाला असलेला विरोध दुर्भाग्यपूर्ण असल्याचे मत अध्यक्ष किशोर तिवारी  व्यक्त केले आहे. 
या  शेतकरी चळवळीच्या नेत्यांनी खरतर विदर्भ व मराठवाड्याच्या कोरडवाहू शेतकऱ्यांना २ हेक्टर ची मर्यादा न ठेवता सिक्कम प्रमाणे धान्य ,डाळ व तेलबियाणे तसेच नैसर्गिक शेतीसाठी  सरसकट देण्याची मागणी रेटावी व महाराष्ट्र सरकारने या सोबतच तेलंगाणा सरकारप्रमाणे रयतबंधू योजनेसारखी सरसकट संपुर्ण जमीनधारणेच्या नुसार प्रेतिहेक्टरी प्रति हंगाम रु ६००० रोजगार हमी योजनेच्या मदतीने द्यावी अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे . 
========================================================= 

Saturday, February 23, 2019

२६ फेबु .ला घुबडी येथे 'मागेल त्याला अन्न ' योजनेचा कॅम्प

२६ फेबु .ला घुबडी येथे  'मागेल त्याला अन्न ' योजनेचा कॅम्प 

दिनांक - २३ फेबु .२०१९ 
महाराष्ट्रात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत  महाराष्ट्र सरकारची प्रत्येक गरीबाला अन्न देणारी 'मागेल त्याला अन्न ' योजचा  राबविन्यासाठी किशोर तिवारी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे विदर्भ व मराठवाड्यात एकही खेड्यातील शेतकरी व शेतमजूर अन्नापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रत्येक ब्लॉक स्तरावर 'मागेल त्याला अन्न ' योजनेचा एक भाग म्हणून अन्न सुरक्षा मेळावे आयोजीत करण्यात येत असुन येत्या २६ फेबु .ला केळापूर तालुक्यातील घुबडी येथे जिल्हा पुरवडा विभागामार्फत कोदोरी ,सुकंडी , चनाक्का ,रूढा ,खैरी ,वळवाट , धरमगोटा ,कारेगाव ,दर्यापुर , हिवरी ,पिंपळशेंडा पिठापोंगरी येथील अन्नापासून वंचित असणाऱ्या सर्व आदीवासी ,शेतकरी व शेतमजुरांचा 'मागेल त्याला अन्न ' योजनेचा कॅम्प आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी ,आदीवासी नेते अंकित नैताम ,जिल्हा परीषद सदयस गजानन बेजंकीवार ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगारेड्डी क्यातमवार ,भाजप नेते शिवारेड्डी पाटील येलटीवार ,नरेन्द्ररेड्डी अर्लीकर ,मायाताई बारहाते ,गजानन बोदूरवार ,डॉ दिलीप रेड्डी कुंटावार उपस्थित राहणार आहेत .
यवतमाळ  जिल्ह्यात पॉस मशीन लावल्यावर व आधार लिंकिंग करून महाराष्ट्र सरकारने अन्न सुरक्षा योजनांतर्गत नागरी पुरवडा विभागामार्फत सर्व गरीबांना देण्यात येणारे अन्न खुल्या बाजारात काळा बाजार करून विकणाऱ्या माफियांचा बंदोबस्त केल्यामुळे आता प्रत्येक महिन्याला १  लाख क्विंटल धान्य बजेट आहे त्यामुळे  आता 'मागेल त्याला अन्न ' व ज्या गरीबातल्या गरीब कुटूंबाना अंत्योदय योजना लागु करण्याचे आदेश  प्रधान सचिव महेश पाठक यांच्या सर्व जिल्हा पुरवडा अधिकाऱ्यांना दिले आहेत .यापूर्वी या योजनेचा शुभारंभ यवतमाळ तालुक्यातील बारडतांडा येथील पारधी  बेड्यावर करण्यात आला असुन असे अन्न  सुरक्षा कॅम्प प्रत्येक ब्लॉकस्तरावर आयोजीत करण्यात येणार नाहीत अशी माहीती यावेळी जिल्हा माहीती अधिकारी शालीग्राम भराडी यांनी दिली.  

मागील तीन वर्षात शेतकरी मिशनने  १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त पश्चिम विदर्भ व  मराठवाड्यात ७० लाखावर सात बारा असणाऱ्या शेतकरी कुटुंबाना सरसकट २ रु किलो गहु व ३ रु किलो तांदुळ देणारी अन्न सुरक्षा योजना लागु केल्यानंतर आता ग्रामीण पश्चिम  विदर्भ व  मराठवाड्यात १०० टक्के अन्न सुरक्षा देण्यात आली असुन खेड्यातील एकही कुटुंब अन्नापासुन वंचित राहणार नाही याची हमी देण्यात आली आहे तरी घुबडी येथील अन्न  सुरक्षा कॅम्पचा  फायदा सर्व वंचितांनी घ्यावा अशी विनंती धनंजय झीलपिलवार ,किशोर रासमवार  ,भूमण्णा सरलावार ,जितु मडावी ,वसंतराव कुरवते  ,हनमंतु कोवे ,लक्ष्मण कुरवते ,महादेव मामीडवार ,नरसय्या नागुलवार ,रमेश कोपुलवार .गंगाराम तांडेकर व पुनाजी टापरे यांनी केली आहे ,
=====================================================================

Wednesday, February 20, 2019

सार्वजनिक वितरण प्रणालीत अन्नच्या ठिकाणा नगदी अनुदान देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही -किशोर तिवारी


सार्वजनिक वितरण प्रणालीत अन्नच्या ठिकाणा नगदी अनुदान देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही   -किशोर तिवारी 
दिनांक - २१फेबु .२०१९ 
महाराष्ट्रात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत शिधा वाटप म्हणजे राशन दुकानातून अन्नाच्या जागी सरळ नगदी देण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नसल्याचे राज्याचे अन्न पुरवडा  सचिव महेश पाठक यांचेशी चर्चा केल्यानंतर दिली अन्नाच्या जागी सरळ नगदी देण्याचा एका महाविद्यालयाच्या प्रकल्पासाठी मुंबईच्या दोन दुकानात हा प्रयोग विद्यापीठाच्या अभ्यासक्रम भाग  म्हणून सुरु असल्याचे स्पष्ट केल्याचे अन्न सुरक्षा अधिकाराची लढाई मागील २ दशकापासून लढणारे आदीवासी कार्यकर्ते व महाराष्ट्राच्या कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी कळवीले आहे . 
ग्रामीण भागात अन्नाच्या जागी पैसे वाटणे म्हणजे उपासमारीला आमंत्रण देणे असल्याचे मत किशोर तिवारी व्यक्त केले असुन  महाराष्ट्र सरकारची प्रत्येक गरीबाला अन्न देणारी 'मागेल त्याला अन्न ' योजचा आपण राबवित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले  . 
यावेळी किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशाची माहीती देतांना विदर्भ व मराठवाड्यात एकही खेड्यातील शेतकरी व शेतमजूर अन्नापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रत्येक ब्लॉक स्तरावर 'मागेल त्याला अन्न ' योजनेचा एक भाग म्हणून अन्न सुरक्षा मेळावे आयोजीत करण्यात येणार आहेत . जिल्ह्यात पॉस मशीन लावल्यावर व आधार लिंकिंग करून महाराष्ट्र सरकारने अन्न सुरक्षा योजनांतर्गत नागरी पुरवडा विभागामार्फत सर्व गरीबांना देण्यात येणारे अन्न खुल्या बाजारात काळा बाजार करून विकणाऱ्या माफियांचा बंदोबस्त करण्याच्या मोहीमेमुळे आता 'मागेल त्याला अन्न ' व ज्या गरीबातल्या गरीब कुटूंबाना अंत्योदय योजना लागु करावी ह्या प्रधान सचिव महेश पाठक यांच्या सर्व जिल्हा पुरवडा अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशावर हा  अंत्योदयचे अन्न खुल्या बाजारात काळा बाजार करून विकणाऱ्या माफियां दुकानदाराने सरकार महाराष्ट्रात अंत्योदय योजनाच गुंडाळत अशा बातम्या प्रसारीत केल्यामुळें अन्न सुरक्षा  बंद करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही तसेच ही योजना विस्तारीत करीत असल्याची माहीती  किशोर तिवारी यांनी यावेळी दिली .
मागील तीन वर्षात शेतकरी मिशनने  १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त पश्चिम विदर्भ व  मराठवाड्यात ७० लाखावर सात बारा असणाऱ्या शेतकरी कुटुंबाना सरसकट २ रु किलो गहु व ३ रु किलो तांदुळ देणारी अन्न सुरक्षा योजना लागु केल्यानंतर आता ग्रामीण पश्चिम  विदर्भ व  मराठवाड्यात १०० टक्के अन्न सुरक्षा देण्यात आली असुन खेड्यातील एकही कुटुंब अन्नापासुन वंचित राहणार नाही याची हमी देण्यात आली आहे त्याच वेळेस गावातील श्रीमंत मंडळी ,राजकीय नेते ,नौकरदार ,शिधा वाटप दुकानदार यांनी एकाच कुटुंबात दोन दोन तीन तीन अंत्योदयच्या शिधा वाटप पत्रिका तयार करून अन्नाची उचल करणाऱ्या व खुल्या बाजारात विकण्याचा  गोरखधंदा राजरोसपणे चालु असल्याच्या प्रचंड तक्रारी आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने अन्न सुरक्षा योजनांतर्गत नागरी पुरवडा विभागामार्फत सर्व गरीबांना देण्यात येणारे अन्न खुल्या बाजारात काळा बाजार करून विकणाऱ्या माफियांचा बंदोबस्त करण्याच्या मोहीमेचा एक भाग म्हणून एकाच कुटुंबात दोन दोन तीन तीन अंत्योदयच्या शिधा वाटप पत्रिका तयार करून अन्नाची उचल करणाऱ्या स्वत दुकानदारांनी अशी शिधा वाटप पत्रिका गावपातळी रद्द करावी व ज्या गरीबातल्या गरीब कुटूंबाना अंत्योदय योजना लागु करावी असा आदेश दिल्यानंतर आपला गोरखधंदा बंद होणार असल्याने महाराष्ट्रात अंत्योदय अन्न सुरक्षा योजनां प्रेत्येकाच्या घरापर्यंत नेण्याची  ग्वाही तिवारी यांनी यावेळी  दिली . 
========================================================
===============================================

Tuesday, February 19, 2019

विदर्भात "मागेल त्याला अनुदानीत भुईमूग बियाणे "-शेतकरी मिशनच्या प्रयन्तांना यश


विदर्भात  "मागेल त्याला अनुदानीत भुईमूग  बियाणे "-शेतकरी मिशनच्या प्रयन्तांना यश
दिनांक -१९ फेबु  २०१९
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य ) सन २०१९-२० अंतर्गत  
अनुदानीत भुईमूंग  प्रमाणीत बियाणे फक्त अनुसुचित जाती जमातीसाठी वाटपाचे आदेश केंद्रातील कृषी विभागाच्या आदेश कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी कृषी सचिव एकनाथ डवले व कृषी आयुक्त सुहास दिवसे  यांचेमार्फत केंद्राशी पाठपुरावा करून आता सर्वांना "मागेल त्याला अनुदानीत भुईमूग  बियाणे "योजने अंतर्गत देण्यात येत असुन गरजूंची तात्काळ फायदा घ्यावा अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे . 
यावर्षी अनुदानीत भुईमूंग  प्रमाणीत बियाणे मागणी  फक्त अनुसुचित जाती जमातीसाठी अनुदानीत  हरभरा प्रमाणीत बियाणे  सुरवातीला देण्यात आले होते मागील चार वर्षात यवतमाळ जिल्हात जलयुक्त शिवाराची तसेच मागेल त्याला शेत तळे योजनेत हजारो  शेततळे निर्माण झाल्यामुळे अनुदानीत भुईमूंग  प्रमाणीत बियानाही मागणी सर्व शेतकऱ्यांकडून वाढली होती यावर्षी  पावसाच्या सप्टेंबरमध्ये  दगा दिल्यामुळे कापसाची झालेली प्रचंड नापीकीमुळे शेतकऱ्यांचा भुईमूंग लागवडीकडे वाढलेला कल  पाहता विदर्भात  अनुदानीत भुईमूंग  प्रमाणीत बियाणे वाटपाचा लक्षांक वाढविण्यासाठी  यावे  अशी मागणी शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी कृषी सचिव एकनाथ डवले व कृषी आयुक्त सुहास डवले  यांना केली होती . 
कृषी सचिव एकनाथ यांनी १५ ऑक्टोबरला किशोर तिवारी यांना कळविले की पश्चिम विदर्भ  माझ्या अत्यन्त जवळचा आहे व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य ) योजनेखाली  बांधवाना राबविण्यासाठी  "मागेल त्याला अनुदानीत भुईमूंग बियाणे " देण्यात येतील अशी माहीती दिली , तरी सर्व शेतकऱ्यांनी "मागेल त्याला अनुदानीत भुईमूंग बियाणे " अनुदानावर उचलावे व  विक्रमी पेरा करावा तसेच यासाठी  सरकारी व सहकारी बँकाकडून पीककर्ज ही मिळणार असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली .  अनुदानीत भुईमूंग बियाणे " अनुदानावर मिळत नसल्यास त्यासाठी पैसे मागण्याची तसेच मस्तवाल  सरकारी व सहकारी बँकाकडून पीककर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्यास आपण आपणास व्हाट्सअप मोबाईल नंबर ९४२२१०८८४६ वर तात्काळ तक्रार करावी अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे . 
=============================================================

Sunday, February 17, 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवडा मेळावा :महीला व कोलाम -पारधी यांना दिलेल्या पॅकेजचे स्वागत मात्र दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा न दिल्यामुळे निराशा -किशोर तिवारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवडा मेळावा :महीला व कोलाम -पारधी यांना दिलेल्या पॅकेजचे स्वागत मात्र दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा न दिल्यामुळे निराशा -किशोर तिवारी 

दिनांक -१७ फेबु .२०१९
स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम शेतकरी आत्महत्याग्रस्त आदिवासी भागात  महीला  व  आदिवांसीचा मेळावा घेऊन महीला बचत गटांचे   फिरते भांडवल १५ हजार कमीतकमी १ लाख करण्याची त्यांना बिनव्याजी पतपुरवडा  देण्याच्या तसेच स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर पहील्यांदा आदीम जातीसाठी विषेय पॅकेज देऊन कोलाम व पारधी यांना पहील्यांदा दिल्ली व मुंबईच्या मंत्रालयात विषेय विकास अधिकारी तसेच स्वतंत्र डेस्क निर्माण करण्याचा ऐतिहासिक निर्णयाच्या सोबतच मागील दहावर्षाच्या आदिवासींच्या ३६० कोटी रुपयाच्या खावटी कर्जाची माफी देऊन नव्याने खावटी कर्ज सर्व आदिवासींना देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी  व  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांचा पांढरकवडा येथील घोषणेचे स्वागत  कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे व मिशनच्या मागील तीन वर्षाच्या सतत पाठपुराव्याला सरकारने  पॅकेज देऊन दिलासा दिल्यामुळे विदर्भातील ७०लाखावर कोलाम व पारधी तसेच जिल्ह्यातील १७  हजार  बजतगटाच्या २ लाखावर  महीला यांची मागणी पूर्ण झाली आहे यामुळे या अतिमागास भागात विकासाला नवीन दिशा मिळेल असा विश्वास किशोर यांनी यावेळी  व्यक्त केला . 
भारताचे परीवहन व सिंचन मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस -राष्ट्रवादीच्या काळात सतत १३ वर्षांनी रखडलेले बेंबळा , महादापूर ,कोची ,पाचपोर धरणाचे काम तसेच राष्ट्रीय महामार्गासह या भागात ३००० हजार कोटीच्या कामाची सुरुवात केल्याबद्दल त्यांचे विषेय धन्यवाद यावेळी केले .

मात्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कृषी मूल्य ,पतपुरवडा व अपुरे नगदी अनुदान ,पीकपद्धती बदलण्याच्या मूळ मागण्या त्यामध्ये नवीन पीककर्ज वाटप ,कृषी कर्जमाफीची अंबालबजावणीच्या प्रचंड तक्रारी ,कापसाच्या तसेच सोयाबीन व तुरीच्या हमीभावाच्या प्रश्न्नावर मौन पाळल्याबद्दल किशोर तिवारी यांनी आपली नाराजी सरकारला कळवीली आहे कारण यावेळी  पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेटण्यासाठी यावेळी १ लाखावर शेतकरी  सुद्धा आले होते आपण यासर्व मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या समोर मांडणार असुन तोडगा काढण्यासाठी प्रयन्तशील असल्याचे यावेळी  किशोर तिवारी यांनी सांगीतले .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम रद्द झाला आहे अशी अफवा विरोधकांनी सोशल मीडियावर सतत पसरवील्याने सुमारे १ लाखावर महीला व आदीवासी या मेळाव्याला सम्पूर्ण तयारी असूनही येऊ शकले नाही 
अशी माहीती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली  . या मेळावा अभुतपुर्व यशस्वी करण्यासाठी पालकमंत्री मदन येरावार आमदार संजीव रेड्डी डॉ अशोक उईके  प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी भाजप नेते नितीन गिरी बंटी जुवारे तसेच  सामाजिक कार्यकर्ते सतीश झाझरिया रवी नसकुलवार , आदिवासी कार्यकर्ते अंकित नैताम सुरेश बोलेनवर मोहन जाधव बाबुलाल मेश्राम भीमराव नैताम  यांनी अहोरात्र परीश्रम घेतले  या मेळाव्याला यशस्वी पांढरकवडा नगरीच्या व्यापाऱ्यांनी सर्व सामाजिक संस्था जनता व  सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच  जिल्हयातील सर्व तालुक्यातील सर्व महीला बचत  गटाच्या सहयोजणींचा व  संघटन  प्रमुख यांनी केलेल्या सहकार्य अतुलनीय असल्याचे मत किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केली . 
===================================================
===============================================

Thursday, February 14, 2019

१६ फेबु.चा पांढरकवडा मेळावा :यवतमाळ जिल्ह्यातील १७ हजार बचतगटाच्या २ लाखावर महीला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी हितगुज करणार : मेळावा तयारीपुर्व सभेत निर्धार

१६ फेबु.चा पांढरकवडा मेळावा :यवतमाळ जिल्ह्यातील १७  हजार  बचतगटाच्या २ लाखावर  महीला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी हितगुज करणार : मेळावा तयारीपुर्व सभेत निर्धार 
दिनांक -१४ फेबु. २०१९
स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम शेतकरी आत्महत्याग्रस्त आदिवासी भागात  महीला  व  आदिवांसीचा मेळावा घेऊन त्यांच्या वेदना व पॅकेज देण्यासाठी येत्या १६  फेबु .ला पांढरकवडा येत आहेत या संधीचे सोने करण्यासाठी केळापूर ,झरी ,घाटंजी ,राळेगाव ,मारेगाव तालुक्यातील सर्व जनता आतुरतेनी वाट पहात आहे . यावेळी जिल्ह्यातील १७  हजार  बजतगटाच्या २ लाखावर  महीला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेटण्यासाठी संपुर्ण तयारी केली असुन यावेळी १ लाखावर शेतकरी व आदीवासी सुद्धा येत असल्याची माहीती कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सुमारे ३ हजारांवर  महीला बचत  गटाच्या सहयोजणींचा व  संघटन  प्रमुख यांचा मेळावापूर्व बैठकीनंतर ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी यांनी दिली .यावेळी  फिरते भांडवल १५ हजार कमीतकमी १ लाख करण्यात यावे तसेच यावेळी  अशी मागणी करण्यात आली . 
यवतमाळ जिल्हयात महीला बजत गटाची चळवळ आता एका सामाजीक क्रांतीकडे पुढे जात असुन मागील तीन वर्षांत बँकांनी सुमारे १०० कोटीच्या वर पतपुरवडा उपलब्ध करून दिला असुन १६ फेबु.ला पंतप्रधान  नरेंद्र मोदी यवतमाळ जिल्ह्यातील १७  हजार  बजतगटाच्या २ लाखावर  महीलाना ३०० कोटीचे भरीव पॅकेज देणार अशी माहीती जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केल्यावर सर्व  वंचित ,दलीत व आदीवासी महिलांमध्ये नवा जोश  संचारला असुन उमरखेड ,पुसद, दारव्हा, दिग्रस  नेर , महागाव ,यवतमाळ कळंब तालुक्यातील बचत गटाच्या महिलांची हजारोच्या संख्येत येण्याची तयारी कळवली असुन त्याच वेळीळापूर ,झरी ,घाटंजी ,राळेगाव ,मारेगाव तालुक्यातील  गावच्या गाव १६ तारखेला पांढरकवड्याला येणार असल्याची माहिती यावेळी किशोर तिवारी दिली . 
यापूर्वी २००६मध्ये तात्कालीन पंतप्रधान मन मोहनसिंग कोळझरीला येणार होते मात्र त्यांना त्यावेळचे महाराष्ट्राच्या  मंत्र्यांनी येऊ दिले नाही याची खंत आज पर्यंत येथील महिलांना आहे मात्र यावेळी ही आलेली संधी साधून महीला बचत गट कोलाम पारधी तसेच दलितांना विशेष भरीव मदतीचे पॅकेज घेण्याचा विश्वास कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केले . या भागातील सर्व आदिवासी कार्यकर्ते अंकित नैताम सुरेश बोलेनवर मोहन जाधव बाबुलाल मेश्राम भीमराव नैताम यांच्या नेतृत्वात कामाला लागले आहेत. या मेळाव्यात हजारो आदीवासी उपस्थित राहणार अशी माहीती तिवारी यांनी यावेळी दिली . या मेळाव्याला अभूतपूर्व करण्यासाठी जिल्हयातील सर्व तालुक्यातील सर्व महीला बचत  गटाच्या सहयोजणींचा व  संघटन  प्रमुख यांचा सर्व लोकप्रतिनिधी उपस्थितीत तयारीसाठी हजारो कार्यशाळा आयोजित करण्यात येत असल्याची माहीती ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी यांनी दिली  .
===============================================================

Monday, February 11, 2019

"मागेल त्याला अन्न" योजनेचा यवतमाळ जिल्ह्यातील बारडतांडा पारधी बेड्यावरून शुभारंभ -प्रत्येक खेड्यात मोहीम राबविणार -किशोर तिवारी

"मागेल त्याला अन्न" योजनेचा यवतमाळ जिल्ह्यातील बारडतांडा पारधी बेड्यावरून शुभारंभ -प्रत्येक खेड्यात मोहीम राबविणार -किशोर तिवारी 
दिनांक -११ फेबु .२०१९ 

यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम बारडतांडा पारधी बेड्यातुन महाराष्ट्र सरकारची प्रत्येक गरीबाला अन्न देणारी 'मागेल त्याला अन्न ' योजनेचा शुभारंभ अन्न सुरक्षा अधिकाराची लढाई मागील २ दशकापासून लढणारे आदीवासी कार्यकर्ते व महाराष्ट्राच्या कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आला . या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पुरवडा अधिकारी शालीग्राम भराडी यांच्या नेतृत्वात अन्न पुरवडा विभागाच्या सर्व चमू केला होता . कार्यक्रमाला फासेपारधी समाजाचे नेते मतीनभाऊ भोसले ,जिल्हापरिषद सदयस संजय शिंदे ,मोहन जाधव ,आदीवासी नेते अंकितभाऊ नैताम विषेय अतिथी म्हणून उपस्थित होते .यावेळी ५२ पारधी कुटुंबाला अंत्योदय योजनेचे रेशन पत्रिकेचे वाटप करण्यात आले व ह्या महिन्याचे ३५ किलो धान्य देण्यात आले . 
यावेळी किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशाची माहीती देतांना विदर्भ व मराठवाड्यात एकही खेड्यातील शेतकरी व शेतमजूर अन्नापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रत्येक ब्लॉक स्तरावर 'मागेल त्याला अन्न ' योजनेचा एक भाग म्हणून अन्न सुरक्षा मेळावे आयोजीत करण्यात येणार आहेत . जिल्ह्यात पॉस मशीन लावल्यावर व आधार लिंकिंग करून महाराष्ट्र सरकारने अन्न सुरक्षा योजनांतर्गत नागरी पुरवडा विभागामार्फत सर्व गरीबांना देण्यात येणारे अन्न खुल्या बाजारात काळा बाजार करून विकणाऱ्या माफियांचा बंदोबस्त करण्याच्या मोहीमेमुळे आता 'मागेल त्याला अन्न ' व ज्या गरीबातल्या गरीब कुटूंबाना अंत्योदय योजना लागु करावी ह्या प्रधान सचिव महेश पाठक यांच्या सर्व जिल्हा पुरवडा अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशावर हा  अंत्योदयचे अन्न खुल्या बाजारात काळा बाजार करून विकणाऱ्या माफियां दुकानदाराने सरकार महाराष्ट्रात अंत्योदय योजनाच गुंडाळत अशा बातम्या प्रसारीत केल्यामुळें अन्न सुरक्षा  बंद करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही तसेच ही योजना विस्तारीत करीत असल्याची माहीती  किशोर तिवारी यांनी यावेळी दिली .
मागील तीन वर्षात शेतकरी मिशनने  १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त पश्चिम विदर्भ व  मराठवाड्यात ७० लाखावर सात बारा असणाऱ्या शेतकरी कुटुंबाना सरसकट २ रु किलो गहु व ३ रु किलो तांदुळ देणारी अन्न सुरक्षा योजना लागु केल्यानंतर आता ग्रामीण पश्चिम  विदर्भ व  मराठवाड्यात १०० टक्के अन्न सुरक्षा देण्यात आली असुन खेड्यातील एकही कुटुंब अन्नापासुन वंचित राहणार नाही याची हमी देण्यात आली आहे त्याच वेळेस गावातील श्रीमंत मंडळी ,राजकीय नेते ,नौकरदार ,शिधा वाटप दुकानदार यांनी एकाच कुटुंबात दोन दोन तीन तीन अंत्योदयच्या शिधा वाटप पत्रिका तयार करून अन्नाची उचल करणाऱ्या व खुल्या बाजारात विकण्याचा  गोरखधंदा राजरोसपणे चालु असल्याच्या प्रचंड तक्रारी आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने अन्न सुरक्षा योजनांतर्गत नागरी पुरवडा विभागामार्फत सर्व गरीबांना देण्यात येणारे अन्न खुल्या बाजारात काळा बाजार करून विकणाऱ्या माफियांचा बंदोबस्त करण्याच्या मोहीमेचा एक भाग म्हणून एकाच कुटुंबात दोन दोन तीन तीन अंत्योदयच्या शिधा वाटप पत्रिका तयार करून अन्नाची उचल करणाऱ्या स्वत दुकानदारांनी अशी शिधा वाटप पत्रिका गावपातळी रद्द करावी व ज्या गरीबातल्या गरीब कुटूंबाना अंत्योदय योजना लागु करावी असा आदेश दिल्यानंतर आपला गोरखधंदा बंद होणार असल्याने महाराष्ट्रात अंत्योदय अन्न सुरक्षा योजनां प्रेत्येकाच्या घरापर्यंत नेण्याची  ग्वाही तिवारी यांनी यावेळी  दिली . 
========================================================
===============================================

Saturday, February 2, 2019

शेतकऱ्यांना सरळ नगदी अनुदान एक ऐतिहासिक निर्णय -शेतकऱ्यांचा अपमान संबोधित करणे दुर्भाग्यपूर्ण -किशोर तिवारी

शेतकऱ्यांना सरळ नगदी अनुदान एक ऐतिहासिक निर्णय -शेतकऱ्यांचा अपमान संबोधित करणे दुर्भाग्यपूर्ण -किशोर तिवारी 
दिनांक ०२ फेबु २०१९
मोदी सरकारने  दिलेल्या अंतरीम अर्थ संकल्पात शेतकऱ्यांना २ हेक्टर ची मर्यादित जमीन धारणा असणाऱ्या वार्षिक ६००० रुपये नगदी अनुदानाची केलेल्या घोषणेमुळे  खुल्या अर्थव्यवस्था स्वीकारणाऱ्या भारतात विश्व व्यापार संघटनेच्या करारानुसार सर्व सरळ वा इतर मार्गाने देण्यात शेत असलेले अनुदानात कपात करणाऱ्या सरकारने एक ऐतिहासिक सुरवात केली असुन नापिकीच्या समस्येला तोंड देणाऱ्या देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा करण्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केलीली घोषणा त्यामध्ये  दोन हेक्टरपर्यंत शेतजमिनीची मालकी असलेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार असून एकूण १२ कोटी शेतकऱ्याना याचा लाभ देण्यात येणार आहे तसेच   १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना लागू होणार असून लवकरच पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाईल मात्र काँग्रेससह विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे म्हणत आपला निषेध नोंदविला हे पटण्यासारखे आहे मात्र अनेक शेतकरी चळवळीच्या नेत्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्यात सतत नगदी अनुदानाची मागणी रेटली त्यांनी केलेला विरोध अकालनीय असुन  शेतकरी चळवळीच्या नेत्यांचा सरळ अनुदानाला असलेला विरोध दुर्भाग्यपूर्ण असल्याचे मत महाराष्ट्राच्या  शेतकरी मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी एन्जॉय व्यक्त केले आहे. 
या  शेतकरी चळवळीच्या नेत्यांनी खरतर विदर्भ व मराठवाड्याच्या कोरडवाहू शेतकऱ्यांना २ हेक्टर ची मर्यादा न ठेवता सरसकट देण्याची मागणी रेटावी व महाराष्ट्र सरकारने या सोबतच तेलंगाणा सरकारप्रमाणे रयतबंधू योजनेसारखी सरसकट संपुर्ण जमीनधारणेच्या नुसार प्रेतिहेक्टरी प्रति हंगाम रु ६००० रोजगार हमी योजनेच्या मदतीने द्यावी अशी मागणी करण्याची गरज आहे मात्र सरकारने जे चांगले केले तरी त्याला विरोधासाठी विरोध करणे चुकीचे असुन सरळ अनुदानाला विरोध हाच खरे तर  शेतकऱ्यांचा अपमान असुन आता एकदा केंद्राने सरळ नगदी अनुदान देण्याची केलेल्या सुरुवातीचे स्वागत करून टायची व्याप्ती व मर्यादा वाढविण्यासाठी शेतकऱ्यांचा रेटा वाढविणे गरजेचे असल्याचे मत किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे . 
गेल्या साडेचार वर्षांत सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र त्यात खुल्या बाजार व्यवस्थेमुळे  व  चुकीच्या धोरणामुळे यश आले नाही आता उत्पन्नवाढीचा प्रयत्नांचा एक  भाग म्हणून पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्येही वाढ करण्यात आली होती मात्र त्यामुळेही उत्पन्न व शेतकऱ्यांच्या अडचणी कमी झाल्या नाहीत  आता वर्षाला थेट सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा घेण्यात आल्यामुळे हे कृषी मंत्रालयाचे तसेच नीती आयोगाचे स्पेशल अपयश असुन आता   दोन-दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ने देता संपूर्ण ६ हजार रुपये एकरकमी निवडणुकीपूर्वी जमा  करावे तसेच जर सध्या ८६ टक्के शेतकरी या योजनेत येत असतील तर उरलेले १४ टक्के २ हेक्टरची अट टाकून का वंचित ठेवता असा सवालही किशोर तिवारी यांनी केला आहे . 
=========================================================================