Tuesday, February 19, 2019

विदर्भात "मागेल त्याला अनुदानीत भुईमूग बियाणे "-शेतकरी मिशनच्या प्रयन्तांना यश


विदर्भात  "मागेल त्याला अनुदानीत भुईमूग  बियाणे "-शेतकरी मिशनच्या प्रयन्तांना यश
दिनांक -१९ फेबु  २०१९
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य ) सन २०१९-२० अंतर्गत  
अनुदानीत भुईमूंग  प्रमाणीत बियाणे फक्त अनुसुचित जाती जमातीसाठी वाटपाचे आदेश केंद्रातील कृषी विभागाच्या आदेश कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी कृषी सचिव एकनाथ डवले व कृषी आयुक्त सुहास दिवसे  यांचेमार्फत केंद्राशी पाठपुरावा करून आता सर्वांना "मागेल त्याला अनुदानीत भुईमूग  बियाणे "योजने अंतर्गत देण्यात येत असुन गरजूंची तात्काळ फायदा घ्यावा अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे . 
यावर्षी अनुदानीत भुईमूंग  प्रमाणीत बियाणे मागणी  फक्त अनुसुचित जाती जमातीसाठी अनुदानीत  हरभरा प्रमाणीत बियाणे  सुरवातीला देण्यात आले होते मागील चार वर्षात यवतमाळ जिल्हात जलयुक्त शिवाराची तसेच मागेल त्याला शेत तळे योजनेत हजारो  शेततळे निर्माण झाल्यामुळे अनुदानीत भुईमूंग  प्रमाणीत बियानाही मागणी सर्व शेतकऱ्यांकडून वाढली होती यावर्षी  पावसाच्या सप्टेंबरमध्ये  दगा दिल्यामुळे कापसाची झालेली प्रचंड नापीकीमुळे शेतकऱ्यांचा भुईमूंग लागवडीकडे वाढलेला कल  पाहता विदर्भात  अनुदानीत भुईमूंग  प्रमाणीत बियाणे वाटपाचा लक्षांक वाढविण्यासाठी  यावे  अशी मागणी शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी कृषी सचिव एकनाथ डवले व कृषी आयुक्त सुहास डवले  यांना केली होती . 
कृषी सचिव एकनाथ यांनी १५ ऑक्टोबरला किशोर तिवारी यांना कळविले की पश्चिम विदर्भ  माझ्या अत्यन्त जवळचा आहे व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य ) योजनेखाली  बांधवाना राबविण्यासाठी  "मागेल त्याला अनुदानीत भुईमूंग बियाणे " देण्यात येतील अशी माहीती दिली , तरी सर्व शेतकऱ्यांनी "मागेल त्याला अनुदानीत भुईमूंग बियाणे " अनुदानावर उचलावे व  विक्रमी पेरा करावा तसेच यासाठी  सरकारी व सहकारी बँकाकडून पीककर्ज ही मिळणार असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली .  अनुदानीत भुईमूंग बियाणे " अनुदानावर मिळत नसल्यास त्यासाठी पैसे मागण्याची तसेच मस्तवाल  सरकारी व सहकारी बँकाकडून पीककर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्यास आपण आपणास व्हाट्सअप मोबाईल नंबर ९४२२१०८८४६ वर तात्काळ तक्रार करावी अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे . 
=============================================================

No comments: