२६ फेबु .ला घुबडी येथे 'मागेल त्याला अन्न ' योजनेचा कॅम्प
दिनांक - २३ फेबु .२०१९
महाराष्ट्रात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत महाराष्ट्र सरकारची प्रत्येक गरीबाला अन्न देणारी 'मागेल त्याला अन्न ' योजचा राबविन्यासाठी किशोर तिवारी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे विदर्भ व मराठवाड्यात एकही खेड्यातील शेतकरी व शेतमजूर अन्नापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रत्येक ब्लॉक स्तरावर 'मागेल त्याला अन्न ' योजनेचा एक भाग म्हणून अन्न सुरक्षा मेळावे आयोजीत करण्यात येत असुन येत्या २६ फेबु .ला केळापूर तालुक्यातील घुबडी येथे जिल्हा पुरवडा विभागामार्फत कोदोरी ,सुकंडी , चनाक्का ,रूढा ,खैरी ,वळवाट , धरमगोटा ,कारेगाव ,दर्यापुर , हिवरी ,पिंपळशेंडा पिठापोंगरी येथील अन्नापासून वंचित असणाऱ्या सर्व आदीवासी ,शेतकरी व शेतमजुरांचा 'मागेल त्याला अन्न ' योजनेचा कॅम्प आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी ,आदीवासी नेते अंकित नैताम ,जिल्हा परीषद सदयस गजानन बेजंकीवार ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगारेड्डी क्यातमवार ,भाजप नेते शिवारेड्डी पाटील येलटीवार ,नरेन्द्ररेड्डी अर्लीकर ,मायाताई बारहाते ,गजानन बोदूरवार ,डॉ दिलीप रेड्डी कुंटावार उपस्थित राहणार आहेत .
यवतमाळ जिल्ह्यात पॉस मशीन लावल्यावर व आधार लिंकिंग करून महाराष्ट्र सरकारने अन्न सुरक्षा योजनांतर्गत नागरी पुरवडा विभागामार्फत सर्व गरीबांना देण्यात येणारे अन्न खुल्या बाजारात काळा बाजार करून विकणाऱ्या माफियांचा बंदोबस्त केल्यामुळे आता प्रत्येक महिन्याला १ लाख क्विंटल धान्य बजेट आहे त्यामुळे आता 'मागेल त्याला अन्न ' व ज्या गरीबातल्या गरीब कुटूंबाना अंत्योदय योजना लागु करण्याचे आदेश प्रधान सचिव महेश पाठक यांच्या सर्व जिल्हा पुरवडा अधिकाऱ्यांना दिले आहेत .यापूर्वी या योजनेचा शुभारंभ यवतमाळ तालुक्यातील बारडतांडा येथील पारधी बेड्यावर करण्यात आला असुन असे अन्न सुरक्षा कॅम्प प्रत्येक ब्लॉकस्तरावर आयोजीत करण्यात येणार नाहीत अशी माहीती यावेळी जिल्हा माहीती अधिकारी शालीग्राम भराडी यांनी दिली.

मागील तीन वर्षात शेतकरी मिशनने १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त पश्चिम विदर्भ व मराठवाड्यात ७० लाखावर सात बारा असणाऱ्या शेतकरी कुटुंबाना सरसकट २ रु किलो गहु व ३ रु किलो तांदुळ देणारी अन्न सुरक्षा योजना लागु केल्यानंतर आता ग्रामीण पश्चिम विदर्भ व मराठवाड्यात १०० टक्के अन्न सुरक्षा देण्यात आली असुन खेड्यातील एकही कुटुंब अन्नापासुन वंचित राहणार नाही याची हमी देण्यात आली आहे तरी घुबडी येथील अन्न सुरक्षा कॅम्पचा फायदा सर्व वंचितांनी घ्यावा अशी विनंती धनंजय झीलपिलवार ,किशोर रासमवार ,भूमण्णा सरलावार ,जितु मडावी ,वसंतराव कुरवते ,हनमंतु कोवे ,लक्ष्मण कुरवते ,महादेव मामीडवार ,नरसय्या नागुलवार ,रमेश कोपुलवार .गंगाराम तांडेकर व पुनाजी टापरे यांनी केली आहे ,
=====================================================================
No comments:
Post a Comment