सार्वजनिक वितरण प्रणालीत अन्नच्या ठिकाणा नगदी अनुदान देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही -किशोर तिवारी
दिनांक - २१फेबु .२०१९
महाराष्ट्रात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत शिधा वाटप म्हणजे राशन दुकानातून अन्नाच्या जागी सरळ नगदी देण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नसल्याचे राज्याचे अन्न पुरवडा सचिव महेश पाठक यांचेशी चर्चा केल्यानंतर दिली अन्नाच्या जागी सरळ नगदी देण्याचा एका महाविद्यालयाच्या प्रकल्पासाठी मुंबईच्या दोन दुकानात हा प्रयोग विद्यापीठाच्या अभ्यासक्रम भाग म्हणून सुरु असल्याचे स्पष्ट केल्याचे अन्न सुरक्षा अधिकाराची लढाई मागील २ दशकापासून लढणारे आदीवासी कार्यकर्ते व महाराष्ट्राच्या कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी कळवीले आहे .
ग्रामीण भागात अन्नाच्या जागी पैसे वाटणे म्हणजे उपासमारीला आमंत्रण देणे असल्याचे मत किशोर तिवारी व्यक्त केले असुन महाराष्ट्र सरकारची प्रत्येक गरीबाला अन्न देणारी 'मागेल त्याला अन्न ' योजचा आपण राबवित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .
यावेळी किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशाची माहीती देतांना विदर्भ व मराठवाड्यात एकही खेड्यातील शेतकरी व शेतमजूर अन्नापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रत्येक ब्लॉक स्तरावर 'मागेल त्याला अन्न ' योजनेचा एक भाग म्हणून अन्न सुरक्षा मेळावे आयोजीत करण्यात येणार आहेत . जिल्ह्यात पॉस मशीन लावल्यावर व आधार लिंकिंग करून महाराष्ट्र सरकारने अन्न सुरक्षा योजनांतर्गत नागरी पुरवडा विभागामार्फत सर्व गरीबांना देण्यात येणारे अन्न खुल्या बाजारात काळा बाजार करून विकणाऱ्या माफियांचा बंदोबस्त करण्याच्या मोहीमेमुळे आता 'मागेल त्याला अन्न ' व ज्या गरीबातल्या गरीब कुटूंबाना अंत्योदय योजना लागु करावी ह्या प्रधान सचिव महेश पाठक यांच्या सर्व जिल्हा पुरवडा अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशावर हा अंत्योदयचे अन्न खुल्या बाजारात काळा बाजार करून विकणाऱ्या माफियां दुकानदाराने सरकार महाराष्ट्रात अंत्योदय योजनाच गुंडाळत अशा बातम्या प्रसारीत केल्यामुळें अन्न सुरक्षा बंद करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही तसेच ही योजना विस्तारीत करीत असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली .
मागील तीन वर्षात शेतकरी मिशनने १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त पश्चिम विदर्भ व मराठवाड्यात ७० लाखावर सात बारा असणाऱ्या शेतकरी कुटुंबाना सरसकट २ रु किलो गहु व ३ रु किलो तांदुळ देणारी अन्न सुरक्षा योजना लागु केल्यानंतर आता ग्रामीण पश्चिम विदर्भ व मराठवाड्यात १०० टक्के अन्न सुरक्षा देण्यात आली असुन खेड्यातील एकही कुटुंब अन्नापासुन वंचित राहणार नाही याची हमी देण्यात आली आहे त्याच वेळेस गावातील श्रीमंत मंडळी ,राजकीय नेते ,नौकरदार ,शिधा वाटप दुकानदार यांनी एकाच कुटुंबात दोन दोन तीन तीन अंत्योदयच्या शिधा वाटप पत्रिका तयार करून अन्नाची उचल करणाऱ्या व खुल्या बाजारात विकण्याचा गोरखधंदा राजरोसपणे चालु असल्याच्या प्रचंड तक्रारी आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने अन्न सुरक्षा योजनांतर्गत नागरी पुरवडा विभागामार्फत सर्व गरीबांना देण्यात येणारे अन्न खुल्या बाजारात काळा बाजार करून विकणाऱ्या माफियांचा बंदोबस्त करण्याच्या मोहीमेचा एक भाग म्हणून एकाच कुटुंबात दोन दोन तीन तीन अंत्योदयच्या शिधा वाटप पत्रिका तयार करून अन्नाची उचल करणाऱ्या स्वत दुकानदारांनी अशी शिधा वाटप पत्रिका गावपातळी रद्द करावी व ज्या गरीबातल्या गरीब कुटूंबाना अंत्योदय योजना लागु करावी असा आदेश दिल्यानंतर आपला गोरखधंदा बंद होणार असल्याने महाराष्ट्रात अंत्योदय अन्न सुरक्षा योजनां प्रेत्येकाच्या घरापर्यंत नेण्याची ग्वाही तिवारी यांनी यावेळी दिली .
========================================================
===============================================
No comments:
Post a Comment