प्रसिद्धीसाठी -तात्काळ
ना. रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी -महाराष्ट्रात महाविकास आघाडीला नाहीतर भाजपला फुटीचा फटका बसणार - किशोर तिवारी
दिनांक १० मार्च २०२०
मध्यप्रदेशातील युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्ष सोडुन भाजपमध्ये प्रवेश केल्यांनतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी मध्य प्रदेशात झालेल्या मोठया राजकीय भूकंपाचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटतील असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी सांगितल्यावर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांचे कृषी सल्लागार शेतकरी नेते किशोर तिवारी त्यांची प्रतिक्रियेची री ओढत मध्यप्रदेशच्या उलथा पालथी सारखी उलध पूलध व लवकरच सत्ताधारी महाविकास आघाडीची आमदार संख्या पंधरा ने वाढण्याची शक्यता असुन महाराष्ट्रात सध्या अगदी विरूध्द परिस्थिती असल्याचे विश्वासाने म्हटले आहे कारण कारण पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे जे लोक भाजपमधून निवडून आलेत, ते सतत महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत असा दावा किशोर तिवारी आईनी केला आहे .
आपल्या दावा मजबूत करतांना तिवारी भाजप फुटीचे संकेत देतांना याचं मोठं उदाहरण म्हणजे आज पर्यंत झालेल्या तिन्ही विधानसभा अधिवेशनात भाजपला सभागृहात कधीही मतविभाजन घडवून आणता आलं नाही. कारण त्यांची कागदावरील आमदार संख्या १०५विधानसभेच्या पटलावर १०५ कधीच नव्हती......मत विभाजन केले असते तर ८५ ते ९० आमदार भाजपच्या पारड्यात आले असते. कारण सुमारे २० भाजप आमदार काँग्रेस राष्ट्र्वादी व शिवसेनेत परतीसाठी संपर्कात आहेत व हीच परिस्थिती टाळण्यासाठी आज पर्यंत मत विभाजन न करता विधानसभेत चक्क बहिष्काराचा मार्ग अवलंबण्याची व "झाकली मूठ , सवा लाखाची !" ही म्हण साकारण्याची नामुष्की भाजप वर आलेली आहे, ही सत्य परिस्थिती कोणीही नाकारू शकत नाही.
दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष पदी नाना भाऊ पाटोळे सारखा मात्तबर व मुर्रब्बी नेता असल्याने, कोणतीही खेळी सहज खेळता येणार नाही त्या उपरही , विधानसभेत सात आमदार असे आहेत ते कधीही भाजपा सोबत जाऊ शकत नाही. त्यात एम.आय.एम(२), समाजवादी पार्टी(२), माकपा(१), शेकाप(१) व १ फुटीर अपक्ष ( असे एकूण : ७) यांचा समावेश जगजाहीर आहे ! म्हणूनच, मध्यप्रदेश चा फॉर्म्युला आज तरी किंवा निकट भविष्यात महाराष्ट्रात शक्यच नाही हे ना. रामदास आठवले यांनाही माहीत आहे मात्र ते आजकाल भाजप वा खुर्चीच्या प्रेमात भाजप अघोषित प्रवक्ते बनले आहेत याची वंचित समाजाला होत आहे असा दावाही किशोर तिवारी यांनी केला
सध्या भाजप यामधील महाराष्ट्रातली होत असलेली फूट टाळण्याकरीता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या किचन कॅबिनेटचे मंत्री या पार्शवभूमीवर जेंव्हा "दोन महिन्यात महा विकास आघाडी पडणार!!" च्या पाट्या लावून फिरतात तेंव्हा फार नवल वाटत नाही मात्र ना. रामदास आठवले यांच्या सारख्या मात्तबर नेत्यांनी असे दावे करने जरा न पचणारे वाटते कारण जेंव्हा ते महाविकास आघाडीचा एक मोठा नेता आमच्या संपर्कात असल्याचा मोठा खुलासा करतात त्याचवेळी त्यांच्या राज्यसभेच्या नामांकनाच्या घोषणेमुळे भाजपमध्ये फूट पाडण्यासाठी भाजप २० आमदार गट तयार करतात हे त्यांना काळात नाही का असा सवाल किशोर तिवारी यांनी उपस्थित केला .
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
किशोर तिवारी
kishortiwari@ gmail.com
०९४२२१०८८४६
No comments:
Post a Comment