Shiv Sena (UBThakrey) Petitioned ECI to take action against Bosses of Central Government Departments and PSU undertakings and Direct to stop such planted & politically motivated Rojgar Melas being organised by Army, Govt Departments & PSU unlawfully for the political agains to only ruling BJP members!
Friday, October 28, 2022
Shiv Sena (UBThakrey) Petitioned ECI to take action against Bosses of Central Government Departments and PSU undertakings and Direct to stop such planted & politically motivated Rojgar Melas being organised by Army, Govt Departments & PSU unlawfully for the political agains to only ruling BJP members
Thursday, October 20, 2022
विदर्भात २ दिवसात ४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या-चालू वर्षात विदर्भात १११६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या-यवतमाळ जिल्ह्यात ४० दिवसात ४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली
चालू वर्षात विदर्भात १११६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या-यवतमाळ जिल्ह्यात ४० दिवसात ४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली
दिनांक २० ऑक्टोबर २०२२
https://www.youtube.com/watch?v=fDCmNOsjMbw
विजय जावंधिया यांनी सुधारीत पीक विमा व तेलंगणा पॅटर्न लागु करण्याची मागणी
जेष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी विदर्भातील कृषी संकटावर बोलताना सरकारने घोषित केलेली मदत अपुरी असुन सध्या शेतकऱ्यांचे १ लाख रुपये प्रति एकर नुकसान झाले आहे व सरकारने घोषित केलेली रक्कम फारच अल्प असुन महाराष्ट्रात कोरडवाहू शेतकऱ्यांना तात्काळ तेलंगणा पॅटर्न प्रमाणे खरीप व रबी साठी प्रति एकरी सरसकट अनुदान देण्याची मागणी केली आहे . केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना मोफत संपुर्ण शासकीय गावस्तरावरील पीक विमा योजना लागू करण्याची मागणी यावेळी केली.
किशोर तिवारी यांनी सरकारला दिला कृषी संकटाचा तोडगा
कृषी संकटाला वाढलेला लागवडीचा खर्च ,शेतीमालाचा भाव ,जमीन व पाण्याचे पुनर्जीवन ,उत्पादकता ,बियांचे स्वातंत्र्य 'पीक पद्धती व अन्न ,डाळी ,तेलबीया या पिकांचे नगदी पिकाच्या ठिकाणी नियोजन व त्यासाठी अनुदान 'सहज मुबलक पतपुरवठा धोरण' नुकसान भरपाई शेतकरी यांना वाचविणारी पीकविमा योजना ,प्रशासकीय ,राजकीय ,सामाजिक भ्रष्टाचाराचे ग्रामीण भागातून निर्मुलन या पाच मुद्दयांवर एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम सरकारने प्रायोगिक तत्वावर सर्वात जास्त आत्महत्या होत असलेल्या अमरावती ,यवतमाळ जिल्ह्यात लागू करावा अशी मागणी किशोर तिवारी केली असुन जोपर्यन्त लागवडी खर्च कमी होत नाही ,नवीन विकसित तंत्र ,जमिनीचे आरोग्य ,पाण्याचे नियोजन व त्याचे आरोग्य दुरुस्त होत नाही तोपर्यंत उत्पादकता वाढणार नाही त्यावर सर्वात पहिले काम करण्याचे शेतकरी मिशनने सुचविले आहे .पीक पद्धती व अन्न ,डाळी ,तेलबीया या पिकांचे नगदी पिकांच्या ठिकाणी नियोजन व त्यासाठी अनुदान यावर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी करीत सहज मुबलक पंचवार्षिक पतपुरवडा देणारे धोरण तसेच सततची नापीकी पुरबुडी दुष्काळ यासाठी नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या हिताची असणे गरजेचे झाले आहे यावर सुधारणा करून शेतकऱ्यांचे प्राण वाचविणारी पीकविमा योजना तात्काळ लागू करण्याची सूचना किशोर तिवारी यांनी केली होती मात्र फडणवीस सरकारने द्वेषापोटी त्याला केराची टोपली दाखविली त्यामुळेच शेतकरी आत्महत्या वाढल्याचा आरोपही किशोर तिवारी यांनी केला .
==============================
Tuesday, October 11, 2022
10 Farmers commit suicide in 3 days in Vidarbha-227 Farmers commit suicide in Yavatmal District alone this year-These are victims of the incompetence of the Hostile Government.
10 Farmers commit suicide in 3 days in Vidarbha-227 Farmers commit suicide in Yavatmal District alone this year-These are victims of the incompetence of the Hostile Government.
Dated 11 October 2022
In the last three days where vidarbha reported 10 farmers suicide v.i.z.1. Ganesh Ade Res. Sakhara taluka .Digras dist.Yavatmal
2. Sagar Dhole Res. Morshi dist. Amravati
3. Lata Dahule Res. Mhaisdodka Maregaon District Yavatmal
4. Swapnil Pacchbhai Res. Kegaon Maregaon Dist. Yavatmal
5. Bhaskar Pardhi Res. Manded T. Lakhandur dist.. Bhandara
6. Satish Mohod Res. two hours Achalpur dist. Amravati
7. Mangesh Khatkhide Res. Dabhada dist.. Amravati
8. Vijesh Ade Res. Wardali hrs. Digras dist.. Yavatmal
9. Shankar Dhanke Res. Ner dist.. Yavatmal
10. Sriram Ghode Res. Dhanora Taluka Ralegaon dist. Yavatmal
Kishore Tiwari, an activist of the farmers' movement, who kept a record of farmer suicides in Vidarbha since 1996, informed today .
This year, a record 1105 farmers have committed suicide in the first nine months of Vidarbha. This number will increase enormously from 1231 in 2006. Continuous heavy rains, barrenness, decline in production and administrative policies, depression and corruption are the reasons. In 2022, these farm suicide have increased tremendously due to continuous drought, heavy rains, infertile agriculture land , increased costs and reduction in production . Maharashtra Chief Minister Eknathrao Shinde's promise to make Maharashtra farmers suicide-free, Kishore Tiwari has demanded an immediate intervention by the Central Govt. to prevent the daily farm suicides in Vidarbha. .
Among the 10 farmers who committed suicide in the last three days, 6 farmers from Yavatmal district are included. From the last 3 months, an average of 1 farmer is committing suicide in Yavatmal district. This year alone, 227 farmers have committed suicide in Yavatmal district. From the last three-four months, the government in Maharashtra has been almost in non-existentance. Kishore Tiwari has alleged that the situation has deteriorated due to the fact that no declared relief has not been paid , new-old crop loan waiver is not being implemented , and officials from top to bottom are involved in taking bribe wherever they can, while people's representatives are busy in rampant corruption .
Agrarian crisis increased due to uncontrolled cost of cultivation, prices of input agricultural commodities, fertility land lost and water quality, poor quality seeds .mono crop system ,drop in crops like food, pulses, oilseeds in dry lane areas and reforms in farm credit policies ,faculty company friendly crop insurance scheme . Kishore Tiwari has demanded that the government should implement the Integrated save Farmer Program to address core issues of crisis. The policy as well as compensation for continuous barrenness and drought should be in the interest of the farmers should be implemented immediately by stop ongoing farmers suicide in vidarbha.
=================================================
Monday, October 10, 2022
विदर्भात ३ दिवसात 10 शेतकऱ्यांच्या आत्महत्या-चालू वर्षात एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २२७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या - हे तर वांझोट्या सरकारच्या नाकर्तेपणाचे बळीच
विदर्भात ३ दिवसात १० शेतकऱ्यांच्या आत्महत्या-चालू वर्षात एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २२७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या - हे तर वांझोट्या सरकारच्या नाकर्तेपणाचे बळीच
दिनांक ११ ऑक्टोबर २०२२
"आपण प्रचंड अडचणीत व अवसादात असलेल्या शेतकऱ्यांच्या घरी भेट देऊन सरकारला वारंवार सुचना देऊनही मस्तवाल अधिकाऱ्यांनी परीस्थितीचे गांभीर्य वेळेवर दाखविलें नाही त्यामूळे हा शेतकऱ्यांचा नरसंहार होत असुन यवतमाळ जिल्ह्यात बहुतेक सर्वच आमदार सरकारी पक्षाकडे असल्यामुळे व त्यांच्या दिसत असलेली अभुतपुर्व उदासीनता दररोज होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांसाठी कारणीभूत ठरत आहे त्यातच एखादा आमदार चुकुन शेतकऱ्याच्या दारावर जाऊन कुटुंबाची थट्टा केल्याच्या तक्रारी सुद्धा येत आहेत . आपण राज्याचे डमी मुख्यमंत्री एकनाथ शींदे ,सर्व आदेश देणारे खरे मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी १२ सप्टेंबरला मुंबईला गेलो होतो व मात्र त्यांनी भेट नाकारली तेंव्हा आपण आपले निवेदन डमी मुख्यमंत्र्याचे सचिव भूषण गगराणी तसेच खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव डॉ शिखर परदेसी यांना भेटून निवेदन दिले मात्र डमी मुख्यमंत्री वा रिअल डिफेकटो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२७ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या एकाही कुटुंबाला भेट दिली नाही मात्र आपण सरकारला अडचणीत आणत असल्याचा ठपका ठेवत शेतकरी मिशन वरून तातडीने हकालपट्टी केल्याची खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली कारण आपणास देवेंद्र फडणवीस यांनी निमंत्रीत करून शेतकरी मिशन वर काम करण्यास सांगीतले होते व त्यांनी राजीनामा देण्यास सांगीतले असते तर आपली हकालपट्टीची बातमी वहकाल पट्टीचे श्रेय घेण्यामधील चढाओढ टाळली गेली असती मात्र राजकारणात मतभेद हे समाजातील समस्या व सामाजिक न्याय यापेक्षा वरचढ झाल्याने हे होत आहे .
कृषी संकटाला वाढलेला लागवडीचा खर्च ,शेतीमालाचा भाव ,जमीन व पाण्याचे पुनर्जीवन ,उत्पादकता ,बियांचे स्वातंत्र्य 'पीक पद्धती व अन्न ,डाळी ,तेलबीया या पिकांचे नगदी पिकांच्या ठिकाणी नियोजन व त्यासाठी अनुदान 'सहज मुबलक पतपुरवडा धोरण' नुकसान भरपाई शेतकरी यांना वाचविणारी पीकविमा योजना ,प्रशासकीय ,राजकीय ,सामाजीक भ्रष्टाचाराचे ग्रामीण भागातून निर्मुलन या पाच मुद्दयांवर एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम सरकारने प्रायोगिक तत्वावर सर्वात जास्त आत्महत्या होत असलेल्या अमरावती ,यवतमाळ जिल्ह्यात लागू करावा अशी मागणी किशोर तिवारी केली असुन जोपर्यन्त लागवडी खर्च कमी होत नाही ,नवीन विकसित तंत्र ,जमिनीचे आरोग्य ,पाण्याचे नियोजन व त्याचे आरोग्य दुरुस्त होत नाही तोपर्यंत उत्पादकता वाढणार नाही त्यावर सर्वात पहिले काम करण्याचे शेतकरी मिशनने सुचविले आहे .पीक पद्धती व अन्न ,डाळी ,तेलबीया या पिकांचे नगदी पिकांच्या ठिकाणी नियोजन व त्यासाठी अनुदान यावर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी करीत सहज मुबलक पंचवार्षिक पतपुरवडा देणारे धोरण तसेच सततची नापीकी पुरबुडी दुष्काळ यासाठी नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या हिताची असणे गरजेचे झाले आहे यावर सुधारणा करून शेतकऱ्यांचे प्राण वाचविणारी पीकविमा योजना तात्काळ लागू करण्याची सूचना किशोर तिवारी यांनी केली होती मात्र फडणवीस सरकारने द्वेषापोटी त्याला केराची टोपली दाखविली त्यामुळेच शेतकरी आत्महत्या वाढल्याचा आरोपही किशोर तिवारी यांनी केला .
====================================================================
Sunday, October 2, 2022
भारत मातेची नवरत्न संपत्ती विकणाऱ्या भाजपचे "वंदे मातरम"चे प्रेम एक थोतांड-"फोनवर "हॅलो"ऐवजी"वंदे मातरम"सह "जय किसान" व "जयसेवा " बोलण्याची मोहीमही चालवावी- शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी यांची मागणी
भारत मातेची नवरत्न संपत्ती विकणाऱ्या भाजपचे "वंदे मातरम"चे प्रेम एक थोतांड-"फोनवर "हॅलो"ऐवजी"वंदे मातरम"सह "जय किसान" व "जयसेवा " बोलण्याची मोहीमही चालवावी- शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी यांची मागणी
मुंबई, दि.२ ऑक्टोबर,
फोनवर हॅलो ऐवजी "जय महाराष्ट्र " सह "वंदे मातरम"च बोला निर्णय भाजपचे भारत माते विषयी प्रेम दाखविण्याचे एक थोतांड आहे एकीकडे भारताच्या संपत्तीची लुट व विक्री सुरु असुन देशातली सर्व संपत्ती फक्त 'अडाणी व अंबानी ' या दोनच भांडलवलदारांकडे एकवटली मोदी सरकारने घाण ठेवली असून भाजपच्या महाराष्ट्र सरकारने राज्यात होत असलेल्या प्रचंड प्रमाणातील शेतकरी आत्महत्या व सरकारमधील अनियंत्रित भ्रष्टाचारामुळे प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये वंचित जनतेची सेवा न करण्याची वृत्ती यावर काम करण्यासाठी "फोनवर "हॅलो" ऐवजी "वंदे मातरम" सह "जय किसान" व "जयसेवा " बोलण्याची मोहीमही चालवावी अशी मागणी शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी यांनी एका निवेदनामार्फत केली आहे .
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने राज्य शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना "नमस्कार" ऐवजी "वंदे मातरम" हा शब्द वापरण्याचा जीआर जारी काढला आहे महाराष्ट्रात अधिकारी कर्मचारी 'जय महाराष्ट्र्र ''जय हिंद ' 'जय भीम 'हॅल्लो ठिकाणी बोलतात आता "वंदे मातरम"चा वापर करावा अशी सरकार मोहीम राबवत आहे,त्या प्रमाणे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांच्या हजारो दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने "जय किसान" ची जाहीर मोहीम राबवून शेतकऱ्यांचे मनोबल वाढवायला हवे, तसेच प्रत्येक सरकारी कार्यालयात व्याप्त बाबूराज व सरकारला व्यापक दिरंगाईची आठवण करून देण्यासाठी ‘जय सेवा’ वरून फोन हॅल्लो ऐवजी मिशन मोडमध्ये सुरू करावे, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.
किशोर तिवारी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आज महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या ज्वलंत समस्यांवर चर्चा करण्याऐवजी आता केंद्र आणि राज्य सरकारने लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ‘वंदे मातरम’चा अवलंब करीत आहे त्यामागे सरकारचे अपयश लपलेले आहे , सरकारला राष्ट्रवादाच्या नावाखाली जनतेला जोडायचे असेल, तर आजच्या वर्तमान समस्या लक्षात घेऊन समाजवादाचा आधार घेऊन ‘जय किसान’ आणि ‘जय सेवा’च्या घोषणाही प्रचारात जोडल्या गेल्या पाहिजेत.यामुळे बळीराज्याला प्रत्येक वेळी आठवण समाजाला होईल व "जय सेवा"चा नारा देऊन गेली हजारो वर्षे प्रचलित असलेली आदिवासी आणि आदिम जमातीची मोहीम जय सेवेच्या माध्यमातून जनमानसात पोहोचवता येईल.
या जि आर च्या कायदेशीर बाबी विषयी तिवारी यांनी निवेदनात या वस्तुस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधले आहे की, राज्य सरकारने भारतीय राज्यघटनेच्या कलम ५१अ(२) चा आधार घेऊन "वंदे मातरम" मोहिमेचा जीआर/अधिकृत आदेश काढला आहे. भारतीय राज्यघटनेचा एक भाग आहे. हा लेख नागरिकांच्या "कॅडर मूलभूत कर्तव्ये" शी संबंधित आहे आणि सरकारची जबाबदारी नाही. त्यामुळे या कलम ५१अ च्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा GR/आदेश जारी करणे आणि "वंदे मातरम" ची मोहीम करणे पूर्णपणे घटनाबाह्य आहे! राज्यघटनेच्या रचनाकारांनी किंवा संबंधित सरकारांनी 'नागरिकांच्या कर्तव्या' संदर्भात घटनेत कलम ५१अ जोडले आहे, ते सरकारच्या जबाबदारीच्या संदर्भात नाही, तर लोकांच्या मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात आहे, ज्यासाठी कायदेशीर जीआर सक्ती करता येणार नाही. कोणतीही मोहीम चालवता येणार नाही. सरकारला वंदे मातरमची मोहीम चालवायची असेल तर "जय किसान" आणि "जय सेवा" मोहीम चालवण्याचा जीआर/आदेश काढावा किंवा वंदे मातरमच्या जीआर/आदेशात योग्य ती दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी केली आहे
========================================================