Sunday, October 2, 2022

भारत मातेची नवरत्न संपत्ती विकणाऱ्या भाजपचे "वंदे मातरम"चे प्रेम एक थोतांड-"फोनवर "हॅलो"ऐवजी"वंदे मातरम"सह "जय किसान" व "जयसेवा " बोलण्याची मोहीमही चालवावी- शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी यांची मागणी

भारत  मातेची नवरत्न संपत्ती विकणाऱ्या भाजपचे "वंदे मातरम"चे प्रेम एक थोतांड-"फोनवर "हॅलो"ऐवजी"वंदे मातरम"सह "जय किसान" व "जयसेवा " बोलण्याची मोहीमही चालवावी- शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी यांची मागणी 

मुंबई, दि.२ ऑक्टोबर,


फोनवर हॅलो ऐवजी  "जय महाराष्ट्र " सह "वंदे मातरम"च बोला निर्णय भाजपचे भारत माते विषयी प्रेम दाखविण्याचे  एक थोतांड आहे एकीकडे भारताच्या संपत्तीची लुट व विक्री सुरु असुन देशातली सर्व संपत्ती फक्त 'अडाणी व अंबानी ' या दोनच भांडलवलदारांकडे एकवटली मोदी सरकारने घाण ठेवली असून भाजपच्या महाराष्ट्र सरकारने राज्यात होत असलेल्या प्रचंड प्रमाणातील शेतकरी आत्महत्या व सरकारमधील अनियंत्रित भ्रष्टाचारामुळे प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये वंचित जनतेची सेवा न करण्याची वृत्ती यावर काम करण्यासाठी "फोनवर "हॅलो" ऐवजी "वंदे मातरम" सह "जय किसान" व "जयसेवा " बोलण्याची मोहीमही चालवावी अशी मागणी शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी यांनी एका निवेदनामार्फत केली आहे . 

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने राज्य शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना "नमस्कार" ऐवजी "वंदे मातरम" हा शब्द वापरण्याचा जीआर जारी काढला आहे महाराष्ट्रात अधिकारी कर्मचारी 'जय महाराष्ट्र्र ''जय हिंद ' 'जय भीम 'हॅल्लो ठिकाणी बोलतात आता  "वंदे मातरम"चा वापर करावा अशी सरकार  मोहीम राबवत आहे,त्या प्रमाणे  महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांच्या  हजारो दुर्दैवी घटनांच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने "जय किसान" ची जाहीर मोहीम राबवून शेतकऱ्यांचे मनोबल वाढवायला हवे, तसेच प्रत्येक सरकारी कार्यालयात व्याप्त बाबूराज व  सरकारला व्यापक दिरंगाईची आठवण करून देण्यासाठी ‘जय सेवा’ वरून फोन हॅल्लो  ऐवजी मिशन मोडमध्ये सुरू करावे, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.

किशोर तिवारी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आज महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या ज्वलंत समस्यांवर चर्चा करण्याऐवजी आता केंद्र आणि राज्य सरकारने लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ‘वंदे मातरम’चा अवलंब करीत आहे  त्यामागे सरकारचे अपयश लपलेले आहे , सरकारला राष्ट्रवादाच्या नावाखाली जनतेला जोडायचे असेल, तर आजच्या वर्तमान समस्या लक्षात घेऊन समाजवादाचा आधार घेऊन ‘जय किसान’ आणि ‘जय सेवा’च्या घोषणाही प्रचारात जोडल्या गेल्या पाहिजेत.यामुळे बळीराज्याला प्रत्येक वेळी आठवण समाजाला होईल व "जय सेवा"चा नारा देऊन गेली हजारो वर्षे प्रचलित असलेली आदिवासी आणि आदिम जमातीची मोहीम जय सेवेच्या माध्यमातून जनमानसात पोहोचवता येईल. 

या जि आर च्या कायदेशीर बाबी विषयी  तिवारी यांनी   निवेदनात या वस्तुस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधले आहे की, राज्य सरकारने भारतीय राज्यघटनेच्या कलम ५१अ(२) चा आधार घेऊन "वंदे मातरम" मोहिमेचा जीआर/अधिकृत आदेश काढला आहे. भारतीय राज्यघटनेचा एक भाग आहे. हा लेख नागरिकांच्या "कॅडर मूलभूत कर्तव्ये" शी संबंधित आहे आणि सरकारची जबाबदारी नाही. त्यामुळे या कलम  ५१अ च्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा GR/आदेश जारी करणे आणि "वंदे मातरम" ची मोहीम करणे पूर्णपणे घटनाबाह्य आहे! राज्यघटनेच्या रचनाकारांनी किंवा संबंधित सरकारांनी 'नागरिकांच्या कर्तव्या' संदर्भात घटनेत कलम ५१अ जोडले आहे, ते सरकारच्या जबाबदारीच्या संदर्भात नाही, तर लोकांच्या मूलभूत  कर्तव्यांच्या संदर्भात आहे, ज्यासाठी कायदेशीर जीआर सक्ती करता येणार नाही. कोणतीही मोहीम चालवता येणार नाही. सरकारला वंदे मातरमची मोहीम चालवायची असेल तर "जय किसान" आणि "जय सेवा" मोहीम चालवण्याचा जीआर/आदेश काढावा किंवा वंदे मातरमच्या जीआर/आदेशात योग्य ती दुरुस्ती करावी अशी मागणी  शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी केली आहे 

========================================================

No comments: