Thursday, October 20, 2022

विदर्भात २ दिवसात ४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या-चालू वर्षात विदर्भात १११६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या-यवतमाळ जिल्ह्यात ४० दिवसात ४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली

चालू वर्षात विदर्भात १११६  शेतकऱ्यांच्या आत्महत्या-यवतमाळ जिल्ह्यात ४० दिवसात ४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली 

दिनांक २० ऑक्टोबर २०२२

https://www.youtube.com/watch?v=fDCmNOsjMbw

 
 विदर्भात मागील दोन दिवसात ४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर आल्या असुन या शेतकऱ्यांची नावे 
१. संजय दिगांबर भागडे रा. तरोडा ता आर्णी 
२. प्रेम पवार रा. मालेगाव ता. आर्णी जी. यवतमाळ 
३.संतारम ढवळे रा. केसलवाडा ता. लाखनी जी. भंडारा
४. मधुकर चौधरी रा. सरई ता. राळेगाव जी. यवतमाळ असुन यापुर्वी ८ दिवसात १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या दुर्देवी घटना समोर आल्या आहेत यामध्ये 
१. गणेश ठाकरे रा. रुईखेड ता. अकोट जी. अकोला
२. विकास सहारे रा. वेणी ता. बाभुळगाव जी. यवतमाळ
३. बालाजी अंभोरे रा. मांडवा ता. दिग्रस् जी. यवतमाळ
४. सुरेंद्र बळी रा. शिवणी ता. नांदगाव खंडेश्वर जी.अमरावती
५. मनोहर पवार रा. दहीवड ता. महागाव जी. यवतमाळ
६. अशोक आडे रा. भंडारी ता.पुसद जी. यवतमाळ
७. दशरथ मोहूरले रा.दहेगाव ता. घाटंजी जी. यवतमाळ
८. निखिल तट्टे रा.जामदोल ता.जी.अमरावती
९.गणेश आडे रा. साखरा ता.दिग्रस जी. यवतमाळ
१०.सागर ढोले रा. मोर्शी जी.अमरावती
११.लता डाहुले रा. म्हैसदोडका ता. मारेगाव जि. यवतमाळ  
१२.स्वप्निल पाचभाई रा. केगांव ता. मारेगाव जी.यवतमाळ
१३.भास्कर पारधी रा. मांदेड ता. लाखांदूर जी. भंडारा
१४.सतिष मोहोड रा. दोनोडा ता. अचलपूर जी. अमरावती
१५.मंगेश खातखीडे रा. दाभाडा जी. अमरावती
१६.विजेश आडे रा. वरदळी ता. दिग्रस  जी. यवतमाळ
१७.शंकर ढानके रा. नेर जी.यवतमाळ
१८.श्रीराम घोडे रा .धानोरा तालुका राळेगाव जी. यवतमाळ 
या शेतकऱ्यांनी केल्याची आत्महत्या माहीती शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते व शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते  किशोर तिवारी  यांनी दिली व  यावर्षी विदर्भा विक्रमी १११२  शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत  हा आकडा २००६ मध्ये १२३१ पेक्षा प्रचंड प्रमाणात वाढणार आहे सतत अतिवृष्टी नापिकी उत्पादनात झालेली घट व प्रशासकीय धोरण,उदासीनता प्रचंड भ्र्ष्टाचार कारणीभुत असुन २०२१ च्या दुष्काळी वर्षातच विदर्भात ११८० कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर आली होत्या मात्र २०२२ मध्ये हे आत्महत्या सत्र सततची पुरबुडी अतिवृष्टी नापिकी शेती वाढलेला खर्च यामुळे प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत व  किशोर तिवारी यांनी  जेष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया यांची मुलाखात असलेला विडीओ प्रसारीत केला असुन दिलेल्या माहीती मध्ये केली  आहे . 
यावर्षी एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असुन मागील तीन-चार महिन्यापासुन महाराष्ट्रामध्ये सरकार जवळ जवळ नसल्यासारखे असुन एकीकडे सरकारी मदत ,अनुदान ,प्रोसाहन भत्ता ,नवीन- जुनी पीक कर्ज माफी यावर कोणतेच काम होत नसुन वर पासून खाल पर्यंत अधिकारी कर्मचारी ज्या ठिकाणी जसे जमेल तसे पैसे खाण्यात तर लोकप्रतिनिधी मिळेल ते कमीशन घेण्यात गुंतले असल्यामुळे परिस्थिती विदारक झाल्याचा आरोप  किशोर तिवारी यांनी केला आहे . 

 विजय जावंधिया यांनी सुधारीत पीक विमा व तेलंगणा पॅटर्न लागु करण्याची मागणी 

जेष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी विदर्भातील कृषी संकटावर बोलताना सरकारने घोषित केलेली मदत अपुरी असुन सध्या शेतकऱ्यांचे १ लाख रुपये प्रति एकर नुकसान झाले आहे व सरकारने घोषित केलेली रक्कम फारच अल्प असुन महाराष्ट्रात कोरडवाहू शेतकऱ्यांना तात्काळ तेलंगणा पॅटर्न प्रमाणे खरीप व रबी साठी प्रति एकरी सरसकट अनुदान देण्याची मागणी केली आहे . केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना मोफत संपुर्ण शासकीय गावस्तरावरील पीक विमा योजना लागू करण्याची मागणी यावेळी केली. 

किशोर तिवारी यांनी सरकारला दिला कृषी संकटाचा तोडगा 

कृषी  संकटाला वाढलेला लागवडीचा खर्च ,शेतीमालाचा भाव ,जमीन व पाण्याचे पुनर्जीवन ,उत्पादकता ,बियांचे स्वातंत्र्य 'पीक पद्धती व अन्न ,डाळी ,तेलबीया या पिकांचे नगदी पिकाच्या ठिकाणी नियोजन व त्यासाठी अनुदान 'सहज मुबलक पतपुरवठा धोरण'  नुकसान भरपाई शेतकरी यांना वाचविणारी पीकविमा योजना ,प्रशासकीय ,राजकीय ,सामाजिक भ्रष्टाचाराचे ग्रामीण भागातून निर्मुलन या पाच मुद्दयांवर एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम सरकारने प्रायोगिक तत्वावर सर्वात जास्त आत्महत्या होत असलेल्या अमरावती ,यवतमाळ जिल्ह्यात लागू करावा अशी मागणी किशोर तिवारी केली असुन जोपर्यन्त लागवडी खर्च कमी होत नाही ,नवीन विकसित तंत्र ,जमिनीचे आरोग्य ,पाण्याचे नियोजन व त्याचे आरोग्य दुरुस्त होत नाही तोपर्यंत उत्पादकता वाढणार नाही त्यावर सर्वात पहिले काम करण्याचे शेतकरी मिशनने सुचविले आहे .पीक पद्धती व अन्न ,डाळी ,तेलबीया या पिकांचे नगदी पिकांच्या ठिकाणी नियोजन व त्यासाठी अनुदान यावर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी करीत सहज मुबलक पंचवार्षिक पतपुरवडा देणारे  धोरण  तसेच सततची नापीकी पुरबुडी दुष्काळ यासाठी नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या हिताची असणे गरजेचे झाले आहे यावर सुधारणा करून शेतकऱ्यांचे प्राण वाचविणारी पीकविमा योजना तात्काळ  लागू करण्याची सूचना किशोर तिवारी यांनी  केली होती मात्र फडणवीस सरकारने द्वेषापोटी त्याला केराची टोपली दाखविली त्यामुळेच शेतकरी आत्महत्या वाढल्याचा आरोपही किशोर तिवारी यांनी केला . 

====================================================================

No comments: