Monday, October 10, 2022

विदर्भात ३ दिवसात 10 शेतकऱ्यांच्या आत्महत्या-चालू वर्षात एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २२७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या - हे तर वांझोट्या सरकारच्या नाकर्तेपणाचे बळीच

विदर्भात ३ दिवसात १० शेतकऱ्यांच्या आत्महत्या-चालू वर्षात एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २२७  शेतकऱ्यांच्या आत्महत्या - हे तर वांझोट्या सरकारच्या नाकर्तेपणाचे बळीच 

दिनांक ११ ऑक्टोबर  २०२२

परतीच्या पाऊसाचा कहर त्यापूर्वी जुलै पासुन सुरु अतिवृष्टी व नापीकीचा सर्वात जास्त फटका बसलेल्या विदर्भात मागील तीन दिवसात १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या दुर्देवी घटना समोर आल्या आहेत यामध्ये 

१.गणेश आडे रा. साखरा ता.दिग्रस जी. यवतमाळ
२.सागर ढोले रा. मोर्शी जी.अमरावती
३.लता डाहुले रा. म्हैसदोडका ता. मारेगाव जि. यवतमाळ  
४.स्वप्निल पाचभाई रा. केगांव ता. मारेगाव जी.यवतमाळ
५.भास्कर पारधी रा. मांदेड ता. लाखांदूर जी. भंडारा
६.सतिष मोहोड रा. दोनोडा ता. अचलपूर जी. अमरावती
७.मंगेश खातखीडे रा. दाभाडा जी. अमरावती
८.विजेश आडे रा. वरदळी ता. दिग्रस  जी. यवतमाळ
९.शंकर ढानके रा. नेर जी.यवतमाळ
१०.श्रीराम घोडे रा .धानोरा तालुका राळेगाव जी. यवतमाळ 
यांचा समावेश आहे, अशी माहिती विदर्भातील शेतकरी आत्महत्यांची १९९६ नोंद ठेवणारे शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी दिली . 
यावर्षी विदर्भात पहिल्या नऊ  महिन्यात विक्रमी ११०५  शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत  हा आकडा २००६ मध्ये १२३१ पेक्षा प्रचंड प्रमाणात वाढणार आहे सतत अतिवृष्टी नापिकी उत्पादनात झालेली घट व प्रशासकीय धोरण,उदासीनता प्रचंड भ्र्ष्टाचार कारणीभुत असुन २०२१ च्या दुष्काळी वर्षातच विदर्भात ११८० कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर आली होत्या मात्र २०२२ मध्ये हे आत्महत्या सत्र सततची पुरबुडी अतिवृष्टी नापिकी शेती वाढलेला खर्च यामुळे प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करणार असा प्रण घोषित केल्यामुळे विदर्भातील आत्महत्यांचे पीक व दररोज होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी तात्काळ केंद्राने हस्तक्षेप करण्याची मागणी किशोर तिवारी यांनी केली  आहे . 
मागील तीन दिवसात आत्महत्या करणाऱ्या १० शेतकऱ्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील ६ शेतकऱ्यांचा समावेश असुन मागील ३ महीन्यापासून यवतमाळ जिल्ह्यात दररोज सरासरी १ शेतकरी आत्महत्या करीत असुन यावर्षी एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असुन मागील तीन-चार महिन्यापासुन महाराष्ट्रामध्ये सरकार जवळ जवळ नसल्यासारखे असुन एकीकडे सरकारी मदत ,अनुदान ,प्रोसाहन भत्ता ,नवीन- जुनी पीक कर्ज माफी यावर कोणतेच काम होत नसुन वर पासून खाल पर्यंत अधिकारी कर्मचारी ज्या ठिकाणी जसे जमेल तसे पैसे खाण्यात तर लोकप्रतिनिधी मिळेल ते कमीशन घेण्यात गुंतले असल्यामुळे परिस्थिती विदारक झाल्याचा आरोप  किशोर तिवारी यांनी केला आहे . 

 "आपण प्रचंड अडचणीत व अवसादात असलेल्या शेतकऱ्यांच्या घरी भेट देऊन सरकारला वारंवार सुचना देऊनही मस्तवाल अधिकाऱ्यांनी परीस्थितीचे गांभीर्य वेळेवर दाखविलें नाही त्यामूळे हा शेतकऱ्यांचा नरसंहार होत असुन यवतमाळ जिल्ह्यात बहुतेक सर्वच आमदार सरकारी पक्षाकडे असल्यामुळे व त्यांच्या दिसत असलेली अभुतपुर्व उदासीनता दररोज होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांसाठी कारणीभूत ठरत आहे त्यातच एखादा  आमदार चुकुन शेतकऱ्याच्या दारावर जाऊन कुटुंबाची थट्टा केल्याच्या तक्रारी सुद्धा येत आहेत . आपण राज्याचे डमी मुख्यमंत्री एकनाथ शींदे ,सर्व आदेश देणारे खरे मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी १२ सप्टेंबरला मुंबईला गेलो होतो व मात्र त्यांनी भेट नाकारली तेंव्हा आपण आपले निवेदन डमी मुख्यमंत्र्याचे सचिव भूषण गगराणी तसेच खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव डॉ शिखर परदेसी यांना भेटून निवेदन दिले मात्र डमी मुख्यमंत्री वा रिअल डिफेकटो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२७ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या एकाही कुटुंबाला भेट दिली नाही मात्र आपण सरकारला अडचणीत आणत असल्याचा ठपका ठेवत शेतकरी मिशन वरून तातडीने  हकालपट्टी केल्याची खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली कारण आपणास देवेंद्र फडणवीस यांनी निमंत्रीत करून शेतकरी मिशन वर काम करण्यास सांगीतले होते व त्यांनी राजीनामा देण्यास सांगीतले असते तर आपली हकालपट्टीची बातमी वहकाल पट्टीचे श्रेय घेण्यामधील चढाओढ टाळली गेली असती मात्र राजकारणात मतभेद हे समाजातील समस्या व सामाजिक न्याय यापेक्षा वरचढ झाल्याने हे होत आहे . 

कृषी  संकटाला वाढलेला लागवडीचा खर्च ,शेतीमालाचा भाव ,जमीन व पाण्याचे पुनर्जीवन ,उत्पादकता ,बियांचे स्वातंत्र्य 'पीक पद्धती व अन्न ,डाळी ,तेलबीया या पिकांचे नगदी पिकांच्या ठिकाणी नियोजन व त्यासाठी अनुदान 'सहज मुबलक पतपुरवडा धोरण'  नुकसान भरपाई शेतकरी यांना वाचविणारी पीकविमा योजना ,प्रशासकीय ,राजकीय ,सामाजीक भ्रष्टाचाराचे ग्रामीण भागातून निर्मुलन या पाच मुद्दयांवर एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम सरकारने प्रायोगिक तत्वावर सर्वात जास्त आत्महत्या होत असलेल्या अमरावती ,यवतमाळ जिल्ह्यात लागू करावा अशी मागणी किशोर तिवारी केली असुन जोपर्यन्त लागवडी खर्च कमी होत नाही ,नवीन विकसित तंत्र ,जमिनीचे आरोग्य ,पाण्याचे नियोजन व त्याचे आरोग्य दुरुस्त होत नाही तोपर्यंत उत्पादकता वाढणार नाही त्यावर सर्वात पहिले काम करण्याचे शेतकरी मिशनने सुचविले आहे .पीक पद्धती व अन्न ,डाळी ,तेलबीया या पिकांचे नगदी पिकांच्या ठिकाणी नियोजन व त्यासाठी अनुदान यावर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी करीत सहज मुबलक पंचवार्षिक पतपुरवडा देणारे  धोरण  तसेच सततची नापीकी पुरबुडी दुष्काळ यासाठी नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या हिताची असणे गरजेचे झाले आहे यावर सुधारणा करून शेतकऱ्यांचे प्राण वाचविणारी पीकविमा योजना तात्काळ  लागू करण्याची सूचना किशोर तिवारी यांनी  केली होती मात्र फडणवीस सरकारने द्वेषापोटी त्याला केराची टोपली दाखविली त्यामुळेच शेतकरी आत्महत्या वाढल्याचा आरोपही किशोर तिवारी यांनी केला . 

====================================================================


No comments: