कारेगाव बंडलची आश्रमशाळा सुरू करण्याची मागणीसाठी
सरकार जागरण आंदोलनात शेकडो आदिवासी सहभागी - १५ जुलै पासून आमरण उपोषणाची घोषणा
कारेगाव दि. ४ जून
कारेगाव दि. ४ जून
महाराष्ट्रात
आदिवासी समाजावर होत असलेला अन्याय आता असंतोषाचे रूप घेत असून सरकार व
अधिकारी मात्र याकडे पाठ करत आहेत . राज्यात चार हजार कोटी रुपये
आदिवासीवर सरकार खर्च करीत आहे मात्र हजारो आदिवासी मुलभूत सवलती पासून
वंचित आहेत आणि यवतमाळ जिल्हय़ातील अति दुर्गम आंध्रप्रदेश
सीमेलगतच्या
नक्षलग्रस्त आदिवासी भागात सरकारने १९८२ ला कारेगाव बंडल येथे आश्रमशाळा
उघडली हि एक उदाहरण आहे कारण ही आश्रमशाळा १९९६ मध्ये झटाळा येथे
स्थलांतरित करण्यात
आली मात्र नवीन वास्तू २००१ पासून तयार असून हि सुध्या
अधिकाऱ्यांनी तबल १२ वर्ष लोटूनही हि शाळा सुरु केली नाही, त्यामुळे
या भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना
शैक्षणिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे.अति दुर्गम आंध्रप्रदेश सीमेलगतच्या
नक्षलग्रस्त आदिवासी भागातील जनतेनी कारेगाव बंडल येथील आश्रमशाळा
त्वरित सुरू करावी सुरु करा या साठी मागील तेरा वर्षापासून पाठपुरावा केला परंतु पोटभरू नेते व झारीतील भ्रष्ट अधिकारी यांनी आश्रमशाळा आजमतिला सुरु केली नाही यामुळे शेकडो आदिवासी कारेगाव
बंडल येथील आश्रमशाळा
त्वरित सुरू करावी, या मागणीसाठी विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी
यांच्या नेतृत्वात ४ जूनला सरकार जागरण आंदोलन करण्यात येणार आले व मागणी
झाली तर आमरण
उपोषणही करण्याची घोषणा या वेळी करण्यात आली ,या आंदोलनात आदिवासी नेते
भीमराव नैताम ,अंकित नैताम , मोहन जाधव , सुरेशभाऊ बोलेनवार ,दलित नेते
मनोजभाऊ मेश्राम ,नितीन कांबळे ,मोरेश्वर वातीले ,नंदकिशोर जैस्वाल आदी
नेते शामिल झाले होते .
महाराष्ट्राचे आदिवासी सचिव प्रवीण परदेसी यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन किशोर तिवारी याने या वेळी दिले मात्र प्रकल्प कार्यालयाचे कोणताही अधिकारी कारेगावला आला नाही
कारेगाव बंडल येथील आश्रमशाळा सरकारच्या उदासीन धोरणामुळे १९९६ मध्ये झटाळा येथे स्थलांतरित केली. या भागात आदिवासी जनतेला शिक्षमासाठी कोणतीच निवासी शाळा नसल्यामुळे सरकारने आदिवासींच्या मागणीवरून १९९७ मध्ये नवीन वास्तुचे काम सुरू केले. तसेच सन २00२ मध्ये कारेगाव बंडल येथे आश्रमशाळा सुरू करण्याची तयारीसुद्धा केली. मात्र आदिवासी प्रकल्प कार्यालयातील अधिकार्यांनी शिक्षकांच्या दबावाखाली मागील १२ वर्षांपासून ही शाळा झटाळा येथून कारेगाव बंडल येथे पुन्हा सुरू होऊ दिली नाही. याचा फटका आदिवासी विद्यार्थ्यांना बसला आहे. कारेगाव बंडल येथे शैक्षणिक सुविधा नसल्यामुळे अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागत आहे. येथील नागरिकांच्या समस्यांची अधिकार्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. विशेष म्हणजे कारेगाव बंडल येथील आश्रमशाळेमध्ये सर्व व्यवस्था असूनही शाळा सुरू करण्यास मात्र विलंब करण्यात येत आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य लक्षात घेऊन ४ जून रोजी आंदोलन करण्यात येत असून यामध्ये राजेंद्र कोडापे, झिबलाबाई तुमरा, माणिक पेंदोर, श्रीकृष्ण आडे, शंकर अंधारे, अरुण मेश्राम, देविदास कुमरे, कृष्णा शेडमाके, नरसिंग गणाजीवार, रुपेश चिंतलवार, गजानन सातपुते, विजय नैताम यांच्यासह घुबडी, चनाखा, दर्यापूर, पिटापुंगरी, खैरी, वडवाड, हिवरी, ठाणेगाव, कोदूरी, सावरगाव, सावंगी, रामनगर, वघारा आदी गावातील नागरिक सहभागी झाले होते

No comments:
Post a Comment