------------------------------ ----------
*येणारे नवीन वर्ष आपणांस व आपल्या परिवारास सुख समृद्धीचे व यशाचे जावो हीच प्रार्थना!*
तेलंगणाच्या शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत वीज देण्याच्या घोषणेचे महाराष्ट्राच्या शेतकरी मिशनकडून स्वागत
दिनांक १ जानेवारी २०१८

अखंड आंध्रप्रदेश असतांना तेलंगणा राज्याची सतत विजेबाबत उपेक्षा होत होती व ४ वर्षांपूर्वी तेलंगणा राज्याची निर्मितीच्या वेळेस विजेचे संकट व वीज कपात प्रचंड प्रमाणात होती मात्र अवघ्या साडे तीन वर्षात स्वतंत्र तेलंगानाने वीजेच्या क्षेत्रात केलेली प्रगती कौतुकास्पद असुन विदर्भ व मराठवाड्यातील कोरडवाहु शेतकऱ्यांना असा दिलासा मिळणे काळाची गरज आहे .
भारत सरकारचे सिंचन मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भ व मराठवाड्यातील कोरडवाहु शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी सर्व प्रलंबित सिंचन प्रकल्पासाठी २० हजार कोटी दिले असुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे सर्व कृषी वीज पंप सौर उर्जेवर चालविण्यासाठी सौरउर्जेचे वीज निर्मिती प्रकल्प सुरु केले असुन यामुळे आम्ह्चे सुद्धा तेलंगाणाच्या शेतकऱ्यानंसारखे चांगले दिवस येणार अशी आशा विदर्भ व मराठवाड्यातील कोरडवाहु शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे मात्र सध्या वीज विभागाकडुन जुलमी मोगलाई पद्धतीने वसुली सुरू असुन प्रत्येक खेड्यात घरात एक व दोन दिवे असतांना हजाराच्या घरात बिल येत आहे तर कृषी विजेचे बिल अनेकांचे लाखाच्या घरात जात आहे ,ग्रामीण जनता वीज वितरण कंपनीच्या त्रासाने वैतागली असुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज विभागाचा इलाज करण्याची मागणीच किशोर तिवारी यांनी केली आहे .
जशी अखंड आंध्रप्रदेश असतांना तेलंगणा विभागाची सतत विकास बाबत उपेक्षा होत होती आता स्वतंत्र तेलंगाणा राज्याने सुरु केलेला विकास आणि विजेच्या क्षेत्रात केलेली घोषणा यावरून महाराष्ट्रात विदर्भ विभागाचा विकास व सिंचन ,वीज , उद्योग व रोजगाराच्या क्षेत्रात चांगले दिवस आणण्याकरीता वेगळ्या विदर्भ राज्यशिवाय पर्याय नसल्याचा विस्वास किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे .
========================================